मोदी पनवती?

मोदी

Click to rate this post!

मोदी पनवती? असे म्हणणाऱ्या ‘जमाती’साठी काही पोस्ट्स टाकून थोडी ‘हटके’ माहिती देत ते कसे ‘पनवती’ आहेत याचे ठोस पुरावेच पुढील काही दिवस देणार आहे.

पोस्ट क्रमांक 1 :

स्वातंत्र्याला 7 दशके उलटून गेली तरी 13 दुर्धर आजारांवर लागणारी औषधे कोट्यावधी रुग्णांना परवडत नव्हती. भारतामध्ये वेगवेगळ्या 13 दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या वेगवेगळ्या स्टेज मधील रुग्णांची संख्या 8.4 कोटी ते 10 कोटींदरम्यान आहे. अशा दुर्धर आजारांपैकी 13 आजारांवरील 13 दुर्मिळ औषधांच्या ‘मेड इन इंडिया’ निर्मितीसाठीचे प्रयत्न मोदी सरकारने गेल्या वर्षी सुरु केले.

यापैकी 4 औषधांची निर्मिती करण्यात भारताला यश आलं आहे. जागतिक स्तरावरील परिस्थिती पाहता भारतासाठी ही फार महत्त्वाची बाब असून यामुळे प्रचंड प्रमाणात परदेशी चलन वाचण्यासच नाही, तर ते मिळविण्यासाठीही मदत होणार आहे. भारताच्या या यशामुळे दुर्धर आजारांसाठी वापरली जाणारी औषधं भारतातच आता निर्माण होणार आहेत.

त्यामुळेच आयात खर्च आणि इतरही खर्च वाचणार असल्याने ही औषधं बऱ्यापैकी स्वस्त होणार आहेत. या दुर्धर आजारांपैकी 80 टक्के आजार हे जेनेटिक आहेत. म्हणजेच हे आजार अनेक मुलांना जन्मापासूनच असतात. या आजारांवर उपचार करायचा झाला तरी तो सर्वसामान्यांना शक्य होत नाही. कोट्यवधी रुपयांची इंजेक्शने आणि औषधं परदेशातून आयात करावी लागतात.

अनेकदा लोकवर्गणीमधून (क्राउड-फंडिंग) किंवा सरकारच्या मदतीने विशेष केस म्हणून असली औषधं मागवली जायची. मात्र आता याची गरज पडणार नाही. भारताने वर्षभरामध्येच या 13 पैकी 4 दुर्धर आजारांवरील औषधं बनवण्यात यश मिळवलं आहे. ही औषधं मोठ्याप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचीही सरकारची योजना कार्यान्वित झाली असून त्यावर काम सुरु आहे. या दुर्धर आजारांवरील औषधं भारताने तयार केली आहेत

1) टायरोसेनिमिया टाइप 1 : वर्षभरासाठी या औषधावर साडेतीन कोटींचा खर्च व्हायचा, आता केवळ 2.5 लाखात ती उपलब्ध होतील.

2) Gaucher (गोशे डिसीज) : आधी या आजाराच्या औषधासाठी अडीच ते 6 कोटी रुपये खर्च व्हायचा. आता 2.5 लाखांमध्ये हे औषध मिळेल.

3) विल्सन डिसीज : आधी या आजाराच्या उपचारासाठी 1.8 ते 3.6 कोटी रुपये वार्षिक खर्च यायचा. आता हे काम 3 लाखांमध्ये होईल.

4) ड्रॅव्हेट सिंड्रोम : आधी याच्या उपचारासाठी लागणारे औषध जवळपास 6 से 20 लाख रुपयांत मिळत असे, हे औषध आत 1 ते 5 लाख रुपयांमध्ये मिळेल.

या 4 आजारांवरील भारताने विकसित केलेल्या औषधांची नावं खालीलप्रमाणे आहेत – 1) Nitisinone 2) Eliglusat (3 कोटींवरुन किंमत 2.5 लाखांना) 3) Trientine (2.2 कोटींवरुन किंमत 2.2 लाखांवर) 4) Cannabidiol (7 ते 34 लाखां वरुन किंमत आता 1 ते 5 लाख) येत्या काही महिन्यांमध्ये 13 पैकी आणखी 4 औषधं (म्हणजे 8 आजारांवर) तयार करुन बाजारात स्वस्तात उपलब्ध करुन दिली जातील. देशाच्या

स्वातंत्र्याला 7 दशके ओलांडून गेली तरी दुर्धर आजारांवर देशांतर्गत औषध निर्मिती करू न देणाऱ्या, व अशी औषधे आयात करून त्यातून स्वतःची खळगी भरणाऱ्या लॉबी ला ‘पनवती’ लावणारे डॉक्टर नरेन्द्र मोदी..

पोस्ट क्रमांक : 2

अंतराळातील इन्फ्रास्ट्रक्चर जमिनीवरील सेवांचा विकास शक्य करते. त्यामुळे हवामानशास्त्र, ऊर्जा, दूरसंचार, विमा, वाहतूक, सागरी, विमान वाहतूक आणि शहरी विकास यासारख्या क्षेत्रांमधील सेवा सक्षम होतात. अंतराळातील इन्फ्रास्ट्रक्चर वाढीचे देशाच्या प्रगती व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आर्थिक आणि सामाजिक योगदान असते.

पीएम मोदी

अंतराळ क्षेत्र हे स्वतःच एक वाढीचे क्षेत्र नाही, तर इतर क्षेत्रांच्या वाढीचेही महत्त्वाचे साधनही आहे. विशेषत: 2020 मध्ये मोदी सरकारने या क्षेत्रातील खाजगी उद्योगाचा सहभाग वाढवण्यासाठी जाहीर केलेल्या सुधारणांनंतर, प्रक्षेपण वाहने किंवा रॉकेट तयार करणे, प्रगत उपग्रहांचे देशांतर्गत उत्पादन अशा विविध क्षेत्रात 100 हून अधिक स्टार्ट-अप्स सक्रिय आहेत.

भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 2040 पर्यंत USD 40-45 बिलियन दरम्यान (सध्याच्या USD 8 बिलियन वरून) पोहोचण्याच्या तयारीत आहे. आपल्या सरकारच्या आणि विविध स्वतंत्र खाजगी परदेशी संस्थांच्या अंदाजानुसार देशात 30 लाखाहून अधिक अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता या क्षेत्रात आहे आणि केवळ एकट्या अंतराळ अर्थव्यवस्थेद्वारे दरवर्षी किमान 0.5% ने जीडीपी वाढीचा दर वाढेल असे नियोजनबद्ध काम सध्या भारतात सुरू आहे.

तरीही तुम्हाला आश्चर्य वाटेल की ‘मोदी पनवती आहेत’ असं जे राष्ट्रद्रोही म्हणत आहेत, त्यांच्याशी मी 100% सहमत आहे. त्याची तशी कारणे आहेत. आधी मी काही उदाहरणे देतो, मग मोदी पनवती कसे आहेत हे तुम्हाला समजेलच..

2017 मध्ये Ormakalude Bhramanapatham हे नंबी नारायणन यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी ग्रेगरी डगलस यांच्या Conversations with the Crow या पुस्तकाचा हवाला दिला आहे ज्यात त्यांनी CIA अधिकारी रॉबर्ट क्रॉली यांनी डॉ.होमी भाभा यांच्या मृत्यूचा थेट संबंध अमेरिका, सीआयए आणि भारत सरकारशी असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सीआयए किंवा अमेरिकेचा हात असेल किंवा नाही, पण आपले सरकार आपल्या शास्त्रज्ञांचे रक्षण करू शकले नव्हते, किंबहुना जाणूनबुजून केले नव्हते हे सत्य नाकारता येणार नाही.

डॉ.होमी भाभा यांच्या नंतर ‘भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार’ डॉ.विक्रम साराभाई यांचा रहस्यमय मृत्यू झाला. त्यातही ‘vested interests’ चा थेट संबंध असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी सरकारने साराभाई यांच्या बॉडीची ऑटोप्सी होऊ दिली नव्हती!

कैगा न्यूक्लियर प्लँट, डीएई मधील, बीएआरसी, इस्रो, इन्स्टिट्यूट ऑफ माथेमॅटीकल सायन्स, हेवी वॉटर प्लांट बरोडा, न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन आणि डीआरडीओ च्या शेकडो शास्त्रज्ञांचा ‘रहस्यमय’ मृत्यु झाला आहे. हे शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या देशांतर्गत टेक्नॉलॉजी विकसित करत होते, ज्या तत्कालीन सरकारे परदेशातून शेकडो पट अधिक रक्कम देऊन मिळवत होत्या.

त्याकाळात (2014 नंतर होतात तसे – उदाहरण राफेल विमाने) थेट सरकारांमध्ये व्यवहार होत नसत. दिल्लीश्वरांच्या जवळचे, बऱ्याचदा घरच्याच दलालांची त्याकाळात या सर्व प्रकारातून चंगळ असे आणि राजकारण्यांना मिळणाऱ्या ‘किक-बॅक’ च्या रक्कमा परदेशातील ‘सेफ हॅवेन्स’ मध्ये परस्पर जमा होत.

डॉ. होमी भाभा आणि डॉ.विक्रम साराभाई यांच्या हत्या फार पूर्वी झाल्या म्हणाल..

तर हल्ली म्हणजे 2009 ते 2013 या काळात 11 ऍटॉमिक एनर्जी क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘अनैसर्गिक’ मृत्यू चे ‘शिकार’ झालेत. त्यातल्या 8 शास्त्रज्ञांचा लॅब मध्ये ब्लास्ट झाल्याने तर 3 शास्त्रज्ञांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असं मनमोहन सिंग सरकारने सांगितलंय! मॉर्निंग वॉक ला गेलेले कैगा न्यूक्लियर प्लँट चे सिनियर शास्त्रज्ञ महालिंगम यांची बॉडी (8.6.2009) 5 दिवसांनी नदीत सापडली!

पार्थ प्रतिम आणि उमंग सिंग हे शास्त्रज्ञ बीएएआरसी च्या मॉड्युलर लॅब मध्ये काही कारण नसताना 30.12.2009 रोजी जळलेल्या अवस्थेत मृत आढळले! अभिष शिवम आणि के के जोशी हे आयएनएस अरीहंत न्यूक्लियर पाणबुडीच्या इंजिनियर्सची विशाखापटनमच्या रेल्वे ट्रॅकवर बॉडी मिळाली!

इस्रोचे सरासरी एक दोन नाही तब्बल 45 शास्त्रज्ञ दरवर्षी युपीए च्या 10 वर्षांच्या काळात रहस्यमय परिस्थितीत ‘मारले गेले’! मोदी सरकार येण्याआधी परिस्थिती इतकी वाईट झाली होती की शेवटी कोर्टाला त्यात लक्ष घालून शास्त्रज्ञांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सरकारला आदेश द्यावे लागले होते!

तरीही भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स यांनी आपलं काम चालू ठेवलं. 2014 मध्ये मोदी सरकार भारतात सत्तेत आले आणि या शास्त्रज्ञांना भरपूर पाठबळ आणि सुरक्षा मिळू लागली. 2014 नंतर या ‘रहस्यमय मृत्यू’ अचानक बंद झाल्या. स्पेस प्रोग्रॅम असो की डिफेन्सशी संबंधित प्रकल्प – ठरलेल्या वेळेत, कमी खर्चात आणि कोणाचे मुडदे न पडता पूर्ण होऊ लागले.

शास्त्रज्ञांना कामाच्या समाधानाशिवाय जिकडे जातील तिकडे ‘रॉक-स्टार’ सारखा सन्मान मिळू लागला आहे. भारताचे अंतराळ क्षेत्राचे बजेट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर 2013-14 मध्ये 5615 कोटी रुपयांपर्यंत आले होते, ते गेल्या 10 वर्षांत 12543 कोटी रुपयांपर्यंत वाढले, जी तब्बल 123% ची वाढ आहे.

विद्यार्थी आता उपग्रह बनवत आहेत आणि ISRO त्यांना स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV-D2) नावाच्या नवीन मिनी-PSLV द्वारे प्रक्षेपित करण्यात मदत करत आहे, तीन विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह – EOS-07, AzaadiSAT-2 आणि Janus-1 ही त्याची उदाहरणे आहेत. यातील AzaadiSAT-2 हा उपग्रह तर 750 शाळकरी विद्यार्थिनींनी बनवलाय!

तर, मुद्दा हा आहे की या सगळ्यात मोदी पनवती कसे? सोप्पं आहे उत्तर. वर ‘दलालांची चंगळ’ कशी होती आणि दलालीतून ‘किक-बॅक’ कमाई कशी होत होती, त्यासाठी देशांतर्गत शास्त्रज्ञांना कसे संपविले जात होते हे सगळं नावं आणि उदाहरणे देऊन सांगितलं आहेच. तेही, ही सगळी माहिती निर्लज्ज मनमोहन सिंग सरकारने संसदेत अथवा RTI मधून दिलेली माहिती आहे. असले सगळे नीच धंदे ज्यांचे बंद झाले, ज्यांची कमाई बंद झाली.. त्यांच्यासाठी मोदी पनवती नाहीत तर काय म्हणायचं मग? म्हणून ते पनवती म्हणत आहेत. भक्तांनी उगीच वाईट वाटून घेऊ नये.

केवळ 10 वर्षांपूर्वीच्या अशा आव्हानात्मक आणि जीवघेण्या (literally) भीतीच्या वातावरणातून आज जी गरुडझेप भारत घेत आहे, ती पाहता भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार डॉ.विक्रम साराभाई यांचे शब्द आठवले : “आजूबाजूला निर्माण केलेल्या प्रचंड गोंगाटातही जो सुरेल संगीताचा आनंद घेऊ शकतो, तोच आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवू शकतो!”

वेद कुमार.

 

बदलत्या भारताची दशकगाथा

Click to rate this post!

Related posts

अनंत – चतुर्दशी ! – कविता

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

१० चविष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्त्याचे पदार्थ