26/11 चे मुंबई हल्ला हे समन्वित दहशतवादी हल्ल्यांची मालिका होती जी 2008 मध्ये 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चालली होती. या हल्ल्यांदरम्यान लष्कर-ए-तैयबा या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या १० लोकांनी हा हल्ला केला होता, जे समुद्रमार्गे, मुंबईमध्ये घुसले होते.
त्यांनी मुंबईवर आठ प्राणघातक हल्ले केले ज्यात दोन लक्झरी हॉटेल्स, एक रेल्वे स्टेशन, एक ज्यू सांस्कृतिक केंद्र, एक हॉस्पिटल आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागे असलेली गल्ली आणि मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्स कॉलेज यांना लक्ष्य करण्यात आले.
ह्या आतंकी घटनेत 174 मृत्यू झाले, आणि भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले होते. एकूण, 20 सुरक्षा कर्मचारी आणि 26 परदेशी नागरिकांसह किमान 174 लोकांना आपला जीव गमवावा लागला. 300 हून अधिक लोक जखमी झाले. 10 पैकी नऊ दहशतवादी मारले गेले, आणि एक (अजमल कसाब) पकडला गेला.
या घटनेबद्दल काही कमी ज्ञात तथ्ये:
१. 24 दहशतवाद्यांना, सर्व पाकिस्तानी नागरिकांना हाय प्रोफाईल प्रशिक्षण दिले गेले, ज्यात कमांडो प्रशिक्षण, लढाऊ प्रशिक्षण आणि शिकवण यांचा समावेश होता. त्यापैकी 10 अतिरेक्यांना मुंबईतील प्राणघातक हल्ल्यासाठी निवडण्यात आले होते.
२. दहशतवाद्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर खरेदी केलेले तीन सिमकार्ड वापरले होते, आणि त्यापैकी एक अमेरिकेतील न्यू जर्सी येथील असल्याचे सांगितले जाते.
३. मुंबईत उतरण्यापूर्वी, दहशतवाद्यांनी एलएसजी, कोकेन, स्टेरॉईड्स यांसारख्या बेकायदेशीर ड्रग्सचे सेवन केले, जेणेकरून ते जागृत राहून त्यांच्या मिशनमध्ये सक्रिय राहू शकतील.
४. मोहम्मद अजमल अमीर कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला, त्याला शस्त्रास्त्र कायदा, बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा, स्फोटक कायदा, सीमाशुल्क कायदा, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे आणि रेल्वे कायद्यांतर्गत इतर काही कलमांखाली अटक करण्यात आली. वैध तिकीटाशिवाय रेल्वेच्या आवारात प्रवेश केल्याबद्दलही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
५. नरिमन हाऊसवरील हल्ल्याच्या वेळी, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कमांडोनी हेलिकॉप्टरमधून जलद रस्सीने त्याच्या छतावर प्रवेश केला. मात्र, त्यापूर्वी पायलटने मिळलेल्या माहिती आधारे, त्यांना चुकीच्या इमारतीवर नेले होते.
६. मुंबई पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक, तुकाराम ओंबळे यांनी इतर उच्च अधिकार्यांना एकट्या दहशतवादी कसाबला पकडण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या धाडसी कृत्याबद्दल श्री. तुकाराम ओंबळे अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
७. जमात-उद-दावाचा म्होरक्या अफिज सईद, जो प्रामुख्याने पाकिस्तानातून कार्यरत होता, त्याने या एकूणच दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली आणि अंमलात आणली, ज्यामुळे तो 26/11 चा कथित मास्टरमाईंड मानला जातो. त्यामुळे त्यांना पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली.
८. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाला पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी मदत केली होती.
९. नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यापूर्वी, ह्याच टीमने सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशाची राजधानी दिल्ली ताब्यात घेण्यासाठी आणि उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ल्याची योजना आखली होती, परंतु त्यांची योजना अयशस्वी झाली.
१०. काही भारतीय “लोक” पाकिस्तान च्या ISI ची मदत विविध प्रकारे करत होते ह्याचे पुरावे सापडले आहेत, पण अजून आवश्यक कार्यवाही झाली नाही असे मानले जाते.
११. सुप्रीम कोर्टाने, 29 ऑगस्ट 2012 रोजी मो. अजमल मो. अमीर कसाब विरुद्ध महाराष्ट्र राज्य मधील आपल्या निकालात, मीडियाच्या वर्तनासाठी आणि 26/11 मधील ऑपरेशन्स त्यामुळे कसे धोक्यात आले याबद्दल संपूर्ण एक फाईल आणि अनेक पृष्ठे समर्पित केली आहेत पण… कोणावर ही आरोपपत्र दाखल करण्यात आले ना काही कार्यवाही झाली. का ? माहिती नाही.
26/11. Never forget, never forgive.#MumbaiAttackshttps://t.co/D99tZt3LeK
— Ajit Datta (@ajitdatta) November 26, 2022
#Unforgettable 26/11 life & death moment. Was working wid Mumbai Mirror. Our office at 3rd floor in TOI bdg was opposite to Chhatrapati Shivaji Maharaj terminal (CST) where Pakistani terrorist Azmal Kasab who was member of Lashkar-e-Taiba Islamist org killed 72 people at CST. (1) pic.twitter.com/kG1dOfaC4G
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) November 26, 2022
26/11 2008 Mumbai.
Never Forget Never Forgive, The Moles Within. pic.twitter.com/GGHyRufB0Q
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) November 26, 2022