वीर सावरकरांचे विज्ञानवादी विचार आणि देशप्रेमावरील कोट्स आपल्यामध्ये नेहमीच उत्साह आणि देशप्रेम जागवतात. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खूपच मोठा हात होता. अत्यंत प्रेरणात्मक विचार सावरकरांनी रूजवले, असेच काही त्यांचे विचार (कोट्स) तुम्हाला जाणून घ्यायला हवेत.
सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. त्यांच्या “सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते” “तानाजीचा पोवाडा” ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.

वीर सावरकरांचे कोट्स (Veer Savarkar Quotes) तुमच्यासाठी
1. हे मातृभूमि तुझ साठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण
2. अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला
3. कष्टच तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते – स्वातंत्र्यवीर सावरकर
4. जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.
5. (देशहित जपताना) या जगात देवही माणसांच्या तोंडून येणाऱ्या प्रार्थनापेक्षा तोफांच्या तोंडातुन येणाऱ्या प्रार्थनांकडे जास्त लक्ष देतो – विनायक दामोदर सावरकर
6. आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे
7. मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहेत – स्वातंत्र्यवीर सावरकर
8. ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते, त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा बाळगायची असते – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
9. आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे – वीर सावरकर
10. शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसारखे आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिद्ध आहेत – वीर सावरकर
11. अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन! – देशभक्त सावरकर
12. धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत आहेत – सावरकर
13. धर्मग्रंथावर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस आता संपले असून, समाजसंस्था आपल्याला बुद्धिवादाच्या नव्या तत्त्वावर म्हणजे विज्ञान ग्रंथांवर उभी केली पाहिजे. – स्वातंत्र्यवीर सावरकर
14. मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये – विनायक दामोदर सावरकर
15. हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे – वीर सावरकर


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.