ज्ञानेश्वर माऊली
संत ज्ञानेश्वर माऊली या जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवून समाधिस्थ होणार होते. जे महान संताना अशक्य होतं ते शक्य करून हा कोवळा मुलगा संजीवन समाधी घेणार होता. अवघे क्लिष्ट अध्यात्म माय मराठी मधे उतरवून सोपं करणारा ज्ञानेश समाधिस्थ होणार होता. ज्याच्या साठी निर्गुण परब्रम्हाला सगुण रुपात यावं लागलं असा ज्ञानसूर्य समाधिस्थ होणार होता.
संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील एक पूजनीय व्यक्तिमत्त्व असून, राज्याच्या सांस्कृतिक जीवनात त्यांचा परोपकार अद्वितीय आहे. तो त्याच्या करुणा आणि उदारतेसाठी एक आदरणीय व्यक्ती आहे आणि त्याचा प्रभाव संपूर्ण प्रदेशात जाणवतो.
अवघी आळंदी थोर संत महात्म्यांनी गजबजली आणि जो तो आपल्या माऊलीचे शेवटचे दर्शन घ्यायला डोळ्यात पाणी आणून आतुरलेला होता. अवघा आसमंत हरिनाम गजरात न्हाऊन निघाला. स्वतः रुक्मिणी ने पंचपक्वान्ने शिजवली आणि साक्षात पांडुरंगाने ओल्या डोळ्यांनी पंगती वाढल्या.
निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई ची समजूत काढताना पांडुरंग हेलावून गेला. काय ज्ञानोबा चा अधिकार तो की स्वतः परब्रम्ह पांडुरंग पंगत वाढतो आणि समाधीस्थळी सोडवण्यास येतो. आणि कार्तिक वद्य त्रयोदशीला मद्यान्ही – प्रत्यक्षदर्शी नामदेव म्हणतात –
उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥
देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर । निघाला बाहेर योगिराज ॥
साक्षात पांडुरंगाचा हात धरून ज्ञानेश्वर समाधी स्थळाकडे निघाले.आणि प्रत्येक कृष्ण पक्षातल्या एकादशीस पांडुरंगाला आळंदीस येण्यासाठी चे वचन मागून घेऊन ज्ञानेश्वर महाराज समाधीसाठी बसले.
भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥
जगाची माऊली समाधिस्थ झाली.
समाधी सोहळा पार पडला आणि अलंकापुरी रीती झाली. जड अंतकरणाने सगळे चालते झाले!!
पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव जाले ॥
नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥ ?
भागवत धर्माचा पाया रचून ज्ञानोबा ब्रम्ह जाले ? माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय??
७२६ वा संजीवन समाधी सोहळा .🚩
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर.🚩
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏 pic.twitter.com/vcwEzQkt8g
— Dr. Sukrut. (@sukrutdr) November 22, 2022


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.