कोकणातील अगदी सुप्रसिद्ध ओल्या काजूची भाजी, काजू गरची रस्सा भाजी किंवा सुखी भाजी अगदी चमचमीत होते. बहुतेक सगळ्यांची आवडती अशी ही भाजी, करताना मात्र थोडी क्लीष्ट वाटते, काजूगर सालीपासून वेगळे करण्यासाठी फार वेळ लागतो. त्यांचा चीक हाताला लागून खाज वगैरे येऊ शकते.
पण इथे आपण हे काजू गरम पाण्यात टाकून ५ मिनिटे वाफवून घेतोय. त्यामुळे वेळ सुद्धा वाचतो आणि चीक सुद्धा निघून जातो. काजू अगदी सहज हाताने सालीपासून वेगळे करता येतात. कापताना योग्य काळजी घ्यावी.
काजूची भाजीसाठी साहित्य
पाव किलो ओले काजू गर, २ छोटे कांदे, २ छोटे टोमॅटो, अर्धी वाटी ओलं खोबरं किसून, ४ लसूण पाकळ्या, आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा, ५-६ कढीपत्त्याची पाने, गरम मसाला पावडर २ चमचे, लाल तिखट २ चमचे, हळद पाव चमचा, २-३ मोठे चमचे भरुन तेल, १ चमचा किंवा चवीनुसार मिठ, मुठभर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती-मंद आचेवर कढई मध्ये एक चमचा तेल गरम करून घ्या.
तयारी
यात कांदा आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये किसलेले ओलं खोबरं घालून ते तेलावर व्यवस्थित भाजून घ्या. गॅस बंद करताना यामध्ये लसूण पाकळ्या मिक्स करून मग हे सर्व साहित्य थंड करून घ्यायच आहे. मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे.
या वाटणामध्ये पाण्याचा वापर अगदी नावापुरता करायचा आहे.एक साईट ला वाटण तयार आहे. वरती वापरलेल्या कढईमध्ये २ चमचे तेल गरम करून यात आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परतावे. त्यावर वरती केलेले कांदा खोबर्याचे वाटप घालून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
मसाल्याला तेल सुटू लागले, की मग लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर, आणि चवीनुसार मीठ घालावे. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून मग यामध्ये ओले काजू गर घालावे. वरुन दोन वाटी गरम किंवा कोमट पाणी घालून चांगले शिजवून घ्या. १०-१५ मिनिटांत मध्यम आचेवर भाजी शिजून तयार होते.
वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी, गरमागरम भाकरी किंवा पोळी बरोबर खायला घ्यावे.
रेसेपी लेखक – शेतकरी
5 (1)