D.B. Cooper आज आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो (D.B. Cooper) अमेरिकन इतिहासातील सर्वात चतूर आणि हुशार गुन्हेगार मानला जातो. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनाही आजपर्यंत D.B. Cooper या गुन्हेगाराचा शोध लावता आलेला नाही. या गुन्हेगाराबाबत असे म्हटले जाते की, आजपर्यंत त्याचा चेहरा कोणीही पाहिला नाही किंवा पोलिसांच्या कोणत्याही रेकॉर्डमध्ये D.B. Cooper आढळला नाही.
हा ब्लॉग आहे अमेरिकेतील प्रसिद्ध रहस्यमय गुन्हेगार D.B. कूपरच्या बाबतीत, हा एक अतिशय हुशार विमान अपहरणकर्ता होता. ज्याचा पत्ता आजतागायत कोणालाही लागला नाही.
काय घडले होते ?
ही गोष्ट आहे, 24 नोव्हेंबर 1971 ची. डॅन कूपर नावाच्या अज्ञात व्यक्तीने सिएटलला जाण्यासाठी नॉर्थवेस्ट ओरिएंट एअरलाइन्स फ्लाइट 305 चे तिकीट खरेदी केले. बोईंग ७२७ मध्ये चढल्यानंतर कूपरने सिगारेट पेटवली, बोर्बन आणि सोडा मागवला.
घटनेच्या प्रत्यक्षदर्शीं लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीचे वय 45 ते 50 च्या दरम्यान असेल, बसल्यानंतर काही वेळातच त्याने त्याच्या जवळच्या फ्लाइट अटेंडंट फ्लोरेन्स शॅफनरला एक पार्ट दाखवला आणि तिच्या कानात फुसफुसला, “एका बॉम्बचा पार्ट आहे, आणि तो बॉम्ब माझ्या ब्रिफकेस मध्ये आहे हा पहा”. यानंतर फ्लाइट अटेंडंट घाबरली, व तिच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली.
तेव्हा लगेच कूपरने फ्लॉरेन्सला त्याच्या शेजारी बसण्यास सांगितले. त्याने आपली ब्रीफकेस उघडली आणि ती फ्लॉरेन्सला दाखवली. ज्यामध्ये आठ सिलिंडर एकमेकांना वायरने जोडलेले होते. त्यानंतर कूपरने प्रवाशांच्या जीवाची किंमत म्हणून विमान सिएटलला घेऊन जाणे, रोख US$200,000, चार पॅराशूट आणि तेलाचा टँकर विमानतळावर उपलब्ध हवा, अश्या मागण्या सांगितल्या.
फ्लॉरेन्सने विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेल्या कॅप्टनला कूपरची मागणी कळवली. पायलट विल्यम स्कॉट यांनी सिएटल विमानतळावर माहिती दिली. आणि चक्रे फिरली व प्रवाशांचे प्राण वाचविण्याला प्रथम प्राधान्य होते. म्हणून सिएटलमध्ये विमान उतरल्यानंतर त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर कूपरने सर्व प्रवाशांना उतरण्याची परवानगी दिली.
FBI ने 10,000 $20 च्या नोटांची व्यवस्था केली. कूपरलाही ही रक्कम मिळाली. विमानात इंधन भरल्यानंतर कूपरने क्रू मेंबरला विमान मेक्सिकोला नेण्यास सांगितले, कूपरने सर्व प्रवाशांना पायलट रूममध्ये जाण्यास सांगितले तेव्हा विमान अजूनही हवेतच होते. तसेच दरवाजा आतून लावा, असे सांगितले. काही वेळातच विमानातील हवेचा दाब वाढत असल्याचे पायलटला जाणवले. विमानाच्या सहवैमानिकाने जाऊन पाहिले असता विमानाचा दरवाजा उघडा होता आणि अपहरणकर्ता कूपर बेपत्ता होता.
पायलटच्या लक्षात आले की त्याने दरवाजातून खाली उडी मारली आहे. सिएटल आणि रेनो दरम्यान त्याने पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारली होती, कूपर अपघातातून वाचला की नाही असा प्रश्न तपासकर्त्यांना पडला होता. कूपरने पॅराशूट घालून अंधारात उडी मारली. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, कूपरचा मृत्यू उडी मारल्यानंतर झाला असावा, परंतु एजन्सीकडे याबाबत कोणतेही पुरावे नाहीत.
न सुटलेले रहस्य
अनेक वर्षे अमेरिकन गुप्तचर संस्थेने संपूर्ण देशात शोध घेतला, परंतु डीबी कूपर आणि त्याला दिलेल्या नोटांबद्दल काहीही सापडले नाही. FBI ने त्याचे स्केच बनवले पण आजतागायत उडत्या विमानातून गायब झालेला DB कूपर कोण होता हे आजतागायत कळू शकलेले नाही. विमानाचा पाठलाग करणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या दोन विमानांनाही आकाशात पॅराशूट उडताना दिसले नाही.
या घटनेनंतर 44 वर्षे, सात महिने आणि 18 दिवसांनंतर एफबीआयने कूपरचे प्रकरण बंद करण्याची घोषणा केली, एफबीआयला असेही वाटते की कूपरचा विमानातून उडी मारताना मृत्यू झाला असावा. 1980 मध्ये एका मुलाला सहा हजारांच्या जुन्या नोटांचे पॅकेज मिळाले होते. सर्व प्रत्येकी $20 होते आणि त्यांची संख्या कूपरला दिलेल्या नोटांशी जुळली. या प्रकरणाची अधिक माहिती आजपर्यंत कोणालाही मिळू शकलेली नाही.