हिंदू धर्मात सर्वच अमावस्या महत्त्वाच्या असतात परंतू दर्श अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, या अमावास्येला चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो. ही अमावस्या कुटुंबातील मृत पूर्वजांसाठी आहे. आणि जर या दिवशी श्राद्ध विधी केले तर त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आत्म्याला शांती मिळते.
दर्श अमावस्या 2022 कॅलेंडर (Darsha Amavasya 2022 Calendar)
दर्श अमावस्या – बुधवार 23 नोव्हेंबर 2022
दर्श अमावस्या – शुक्रवार 23 डिसेंबर 2022
दर्श अमावस्या 2023 कॅलेंडर (Darsha Amavasya 2023 Calendar)
त्यौहार के नाम | दिन | त्यौहार के तारीख |
---|---|---|
दर्श अमावस्या | शनिवार | 21 जनवरी 2023 |
दर्श अमावस्या | सोमवार | 20 फरवरी 2023 |
दर्श अमावस्या | मंगलवार | 21 मार्च 2023 |
दर्श अमावस्या | बुधवार | 19 अप्रैल 2023 |
दर्श अमावस्या | शुक्रवार | 19 मई 2023 |
दर्श अमावस्या | शनिवार | 17 जून 2023 |
दर्श अमावस्या | सोमवार | 17 जुलाई 2023 |
दर्श अमावस्या | मंगलवार | 15 अगस्त 2023 |
दर्श अमावस्या | गुरूवार | 14 सितंबर 2023 |
दर्श अमावस्या | शनिवार | 14 अक्टूबर 2023 |
दर्श अमावस्या | सोमवार | 13 नवंबर 2023 |
दर्श अमावस्या | मंगलवार | 12 दिसंबर 2023 |
कुटुंबातील मृत पूर्वजांसाठी महत्त्वाचे विधी करण्यासाठी साधना केली जाते. श्राद्धविधी करण्यासाठी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. चंद्र देवता ही वनस्पती आणि प्राणी जीवनाचे पालनपोषण करणारा मानली जात असल्याने चंद्र देवतेची पूजा करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. दर्श अमावस्येला व्रत करुन चंद्राची पूजा केल्याने चंद्र देवता कृपा करतात. सौभाग्य- समृद्धीचा आर्शीवाद देतात. चंद्र देव भावना आणि दिव्य अनुग्रहाचे स्वामी आहे. याला श्राद्धाची अमावस्या देखील म्हणतात. कारण या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी पूवर्ज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबाला आर्शीवाद देतात असे मानले गेले आहे.
विधी – (Darsha Amavasya 2022 vidhi)
दर्श अमावस्या पूजन विधी (Darsh Amavasya Pujan Vidhi)
पुराणांनुसार अमावस्येला स्नान-दान करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी गंगा-स्नान करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे, परंतू जी व्यक्ती गंगा स्नानासाठी जाऊ शकत नाही अशा लोकांनी जवळीक नदीत किंवा तलावात जाऊन अंघोळ करावी. हे देखील शक्य नसेल तर घरात अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिसळून अंघोळ करावी. आणि महादेव- पार्वती आणि तुळशीची पूजा करावी.
अमावस्येच्या दिवशी उपवास ठेवावा. आपल्या पूर्वजांना शांतीपूर्ण मोक्ष मिळावे यासाठी गरिबांना वस्तू दान करतात. तिळाचे दान आणि पिंड तर्पण करून श्राद्ध ही घातले जाते. ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणेही लाभदायक असते, असे मानले जाते. तसेच या दिवशी शनिदेवाची निळी फुले, काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाने पूजा केली जाते.