आय ऑफ द सहारा
आय ऑफ द सहारा – अटलांटिस, जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अटलांटिक महासागरातील एक पौराणिक बेट. दंतकथेचे मुख्य स्त्रोत म्हणजे प्लेटोचे दोन संवाद कथा, टिमायस आणि क्रिटियास. प्लेटोने वर्णन केले आहे की इजिप्शियन धर्मगुरूंनी, अथेनियन कायदेकर्ता सोलोन यांच्याशी संभाषणात, अटलांटिसचे वर्णन आशिया मायनर आणि लिबियाच्या एकत्रित बेटापेक्षा मोठे आणि हर्क्युलसच्या स्तंभांच्या पलीकडे (जिब्राल्टरची सामुद्रधुनी) वसलेले शहर असे आहे.
सोलोनच्या जन्माच्या सुमारे 9,000 वर्षांपूर्वी, अटलांटिस हे एक श्रीमंत बेट होते ज्याच्या शक्तिशाली राजाने भूमध्यसागरीय प्रदेशातील अनेक भूभाग जिंकले होते. एका मोठ्या भूकंपामुळे ते बेट समुद्राने गिळंकृत केले. असा थोडक्यात अटलांटिस चा इतिहास सांगितला जातो.
तुम्ही जर Google मध्ये “Atlantis” हा शब्द टाइप केल्यास, सुमारे 120 दशलक्ष उत्तरे / परिणाम समोर येतात. साहजिकच, प्लेटोच्या अटलांटिसच्या आख्यायिकेने शास्त्रज्ञांपासून ते गूढशास्त्रज्ञांपर्यंत बर्याच लोकांना ह्या शब्दाने भुरळ घातली आहे, या हरवलेल्या आणि बुडलेल्या सभ्यतेचे संभाव्य स्थान म्हणून अनेक जागा / स्थान उद्धृत केले गेले आहे. पण असे शहर कधी अस्तित्वात होते का? आणि जर होय, तर अवशेष कुठे असू शकतात?
ऐतिहासिक ग्रंथांमध्ये अटलांटिसचा फक्त उल्लेख आहे तो प्लेटोच्या संवादांमध्ये (360 ईसापूर्व लिहिलेले), जे अटलांटिस कसे दिसले याबद्दल डझनभर तंतोतंत तपशील देते. आणि प्राचीन जगाच्या इतर खुणांच्या संदर्भात ते कोठे स्थित असावे, याचा एक अंदाज येतो. तपशिलांच्या या माहितीमुळेच अटलांटिस प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, असा विचार अनेकांनी केला. व त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. अटलांटिस ही कदाचित केवळ एक आख्यायिका आहे, परंतु मध्ययुगीन युरोपियन लेखक ज्यांना अरब भूगोलशास्त्रज्ञांकडून कथा प्राप्त झाली, त्यांनी ती खरी असल्याचे मानले.
नंतरच्या लेखकांनी ती वास्तविक देशाशी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, अमेरिका, स्कॅन्डिनेव्हिया आणि कॅनरी बेटांसह अनेक स्थळे अटलांटिस म्हणून ओळखण्याचे प्रयत्न केले गेले. अटलांटिसची कथा, जर प्लेटोने त्याचा शोध लावला नसता तरी, १५०० ईसापूर्व थेरा बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या प्राचीन इजिप्शियन नोंदी शक्यतो ह्यावर प्रकाश टाकू शकतात. हा उद्रेक, ऐतिहासिक काळातील सर्वात आश्चर्यकारक असा भूकंप आणि त्सुनामींच्या मालिकेसह होता ज्याने क्रेटवरील सभ्यतेचा नाश केला, ज्यामुळे कदाचित अटलांटिसच्या आख्यायिकेला जन्म मिळाला किंवा तीच अटलांटिस सभ्यता असावी.
प्लेटोने अटलांटिसचे वर्णन एकाग्र वर्तुळांची एक विशाल निर्मिती, जमीन आणि पाणी यांच्या अनेक वर्तृळानांनी बनेलला भूभाग असे केलेले आहे. अटलांटिस ही एक श्रीमंत सभ्यता होती, ज्याने अथेनियन लोकशाही मॉडेलचा आधार तयार केला, व लोकशाहीवर त्यांनी भर दिला. प्लेटोने ही भूमी सोने, चांदी, तांबे, इतर मौल्यवान धातू आणि रत्नांनी समृद्ध होती असे वर्णन केलेले आहे.

आय ऑफ द सहारा च्या शोधात, अटलांटिसच्या हरवलेल्या शहरासाठी इतिहासातील अगणित स्थाने चिन्हित करण्यात आली, ज्यात भूमध्य समुद्रात किंवा त्याच्या जवळचा भूप्रदेशाचा समावेश आहे (सार्डिनिया, क्रेट, सॅंटोरिनी, सिसिली, सायप्रस आणि माल्टा ही सर्व संभाव्य ठिकाणे मानली गेली आहेत) किंवा अटलांटिक महासागरात (कॅनरी बेटे आणि मडेरा बेटे ही अशी उदाहरणे आहेत). पण २०१७-१८ मध्ये असा एक दृष्टिकोन समोर आला की ज्यात, सहारामधील “रिचॅट स्ट्रक्चर” किंवा “आय ऑफ द सहारा” म्हणून ओळखले जाणारे स्थान, प्लेटोच्या अटलांटिसच्या वर्णनाशी जुळते.
हे आय ऑफ द सहारा १९३० च्या दशकात प्रथम शोधले गेले, रिचॅट स्ट्रक्चर मूळतः एक विवर असल्याचे मानले जात होते. तथापि, १९५० आणि १९६० च्या दशकातील संशोधनामुळे ते स्थलीय कारणांच्या (जसे की ज्वालामुखीय क्रियाकलाप) च्या बाजूने बाह्य प्रभाव (उदाहरणार्थ, उल्का) ने बनण्याची शक्यता नाहीशी झाली आहे. अखेरीस, शास्त्रज्ञांनी एका सिद्धांतावर एकमत केले ज्यानुसार तो वितळलेल्या खडकाचा 100-दशलक्ष वर्ष जुना घुमट / घेरा आहे, जो हजारो वर्ष उन्ह, वारा, पाऊस झेलून सध्याच्या आकारात आला आहे. आणि अटलांटियन लोकांनी त्याचा वापर आपले शहर म्हणून केले असावे, ही एक थेअरी समोर येत आहे.
रिचॅट स्ट्रक्चर ही एक वलयांची मालिका आहे जी प्लेटोच्या अटलांटिसच्या वर्णनाशी अगदी तंतोतंत जुळते, काहींनी असा युक्तिवाद केला की रिचॅट संरचनेचा आकार प्लेटोच्या वर्णनाशी जुळतो, ज्यात आकार हा सुमारे 23 किलोमीटर आहे. पण नासा ह्या संरचनेचा आकार 45 किलोमीटर ठरवतो आहे. ही एक मोठी अडचण ह्या थेरी बद्दल आहे.

“अटलांटिस राज्य, अटलांटिक महासागरातून बाहेर आली आणि लिबिया आणि आशियापेक्षा मोठे बेटावर… एक महान आणि आश्चर्यकारक साम्राज्य होते ज्याचे संपूर्ण बेट आणि आसपासच्या इतर अनेक भागांवर राज्य होते.”
– प्लेटो, टिमायस/क्रिटियास
आय ऑफ द सहारा ज्याला “रिचॅट स्ट्रक्चर” आणि “आफ्रिकेचा डोळा” असेही म्हणतात, वायव्य आफ्रिकेतील इस्लामिक रिपब्लिक, मॉरिटानियामधील सहाराच्या पठारावर आहे. या प्रचंड भूगर्भीय, उलट घुमटात पृथ्वीवरील जीवनापूर्वीच्या काळापासूनचे खडक आणि गाळ आहे. अंतराळातून दिसणारा, सहाराचा डोळा मोठ्या बैलाच्या डोळ्यासारखा दिसतो, जो महाखंड पॅन्गिया तुटल्यावर तयार झाला. आय ऑफ द सहारात अंतर्भूत असलेल्या खडकांमध्ये हवाईच्या बिग आयलंड प्रमाणेच कार्बोनेट आणि काळे बेसाल्ट यांचा समावेश होतो.
Richat Structure – Sahara Desert, Ouadane, Mauritania. Image credit: Trodel
प्लेटोची अटलांटिन कथा जेम्स कॅमेरॉनच्या अवतार सारखीच असू शकते, ज्यामध्ये तो आम्हाला चेतावणी देतो की कॉर्पोरेट लोभ आणि वर्णद्वेष त्वरीत प्रदूषित करू शकतात आणि आपली सभ्यता नष्ट करू शकतात.