जैसलमेरी चने

Priya potnis

राजस्थानची आपली एक खाद्य संस्कृती आहे, त्या राजस्थान मधील एक डिश.. जैसलमेरी चने कसे करावेत ह्याची रेसेपी. ही एक साधी आणि पारंपारिक रेसिपी आहे ज्यात तपकिरी हरभरा, बेसन आणि दही वापरतात. या रेसिपीची आणखी एक खासियत म्हणजे त्याचा सात्विक स्वभाव. यामध्ये कांदा किंवा लसूण वापरले जात नाही. तर, तुम्ही आनंदाने म्हणू शकता की ही डेअरी फ्री, ग्लूटेन फ्री आणि कांदा-लसूण फ्री रेसिपी आहे.

या रेसिपीची आणखी एक खासियत म्हणजे त्याचा सात्विक स्वभाव. यामध्ये कांदा किंवा लसूण वापरले जात नाही. तर, तुम्ही आनंदाने म्हणू शकता की ही डेअरी फ्री, ग्लूटेन फ्री आणि कांदा-लसूण फ्री रेसिपी आहे.

जैसलमेरी चने
जैसलमेरी चने

एक वाटी गावरान हरभरे / काळे चणे किमान 8 तास कोमट पाण्यात भिजवून घ्या .

मीठ आणि चिमूटभर सोडा घालून कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या काढायच्या. चणे बोटचेपे हवे. कुकरचं झाकण उघडलं की कढी करायला घ्यायची. यातली कढी घट्टसर असते. ( भाता बरोबर खायची असेल तर आवडीनुसार पातळ ठेवावी )

कढीसाठी कमी आंबट, शक्यतो गोडसर 2 वाट्या दही घ्यावे. ते व्यवस्थित घुसळून त्यात दीड टेबलस्पून बेसन, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा हळद, ,मीठ, एक चमचा धणे पूड,छोटा पाव चमचा गरम मसाला घालून परत फेटावे. आता कढईत 3 ते 4 मोठे चमचे साजूक तूप घालावे. एकीकडे एक चमचा जिरे गरम करून जरा खरडून / बारीक करुन ठेवावे. तूप गरम झाल्यावर त्यात ते जिरे, एक मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, थोडा कढीपत्ता घालून जरा परतून घ्यावे. मग त्यात फेटलेलं दही घालून हलवत रहावे.

दही खूप घट्ट असेल तर किंचित पाणी घालावे. त्यात थोडीशी कसुरी मेथी घालावी. कसुरी मेथी चुरडू नये. नाहीतर कढीचा पिवळा रंग बदलेल. आता हे मिश्रण कढई / भांड्याच्या कडेला तूप सुटेपर्यंत परतावे. मग त्यात उकडलेले चणे व त्याचे उकडताना राहिलेले पाणी घालावे. पाणी आपल्या अंदाजानुसार जसं दाट पातळ हवं तसं घालून एक उकळी आणावी.

गरमागरम रोटी, लछ्छा पराठे, जीरा राईस बरोबर हे चणे चविष्ट लागतात. हे चणे खूप तिखट नसतात. पण ज्यांनी त्यानी आपल्या आवडीनुसार तिखट वाढवले तरी चालेल.

 

The short URL of the present article is: https://moonfires.com/m221
Share This Article
Leave a Comment