महज़बीन बानो – टुकड़े-टुकड़े दिन बीता

टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली

रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली

जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली

मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली

होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली

एखादी कविता, एखादं काव्य किंवा एखादं कडवं आपल्याला एवढं आवडून जातं की आपल्या मनात, विचारात कित्येक दिवस ते थैमान घालत असतं. टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली हे जेव्हा वाचले होते तेव्हा अशीच काहीशी अवस्था माझ्या मनाची देखील होती. आपण जे जगतो जे जीवन आपल्याला मिळालेले आहे, नशीबाने, दैवयोगाने आपली परिस्थिती अशी कधी कधी होते की जे मिळालेले आहे ते अपुर्ण आहेच पण जे मिळालेले आहे कोणीतरी दान दिले आहे अशी भावना जेव्हा मनात उत्त्पन्न होते तेव्हा जी बिकट अवस्था होते त्यांचे शब्दात वर्णन करणे अवघड आहे. अनेकदा जे घडले ते वाईट, जे घडत आहे ते वाईट की जे घडणार आहे ते वाईट या संभ्रमात एखादा/एखादी असते तेव्हा वरील ओळी सहजच मनातून उभारत.. निस्तेज कागदावर आकार घेऊ लागतात….

टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली

सगळेच अस्ताव्यस्त आहे, काय चालू आहे काय बिघडलं आहे याचा काहीच कुठे अर्थ लागत नाही आहे. दिवस दिवस निघून जात आहेत, जगणं चालू आहे पण तुकड्या तुकड्यात. एखादा तुकडा दिवसाचा असा की वेळ करायला देखील फुरसत नाही व एखादा तुकडा असा की ‘तो’ विचार करायला वेळच का मिळाला असा.. दिवसाचं ठीक आहे, कोणी येतं कोणी जातं.. विचारांची शृखला तुटत राहते.. थोडा उसंत मिळते, वेळ कामात निघून जातो पण रात्रीचे काय? जेवढं नशीबात दान आहे तेवढं मिळणारचं पण हे जे घडते आहे, दिवस व रात्र क्षण क्षण जळणे हा भोग कसा सुटणार?

धज्जी धज्जी रात मिली… सरळ साधा अर्थ घेतला तर ती रात्रभर तळमळते आहे, घडलेल्या घटनेमुळे अस्वस्थ आहे ती. पण मला लागलेला अर्थ असा आहे की, ती थोडीफार झोपु शकत आहे, पण त्याच्या आठवणीमुळे तो स्वप्नात येण्यामुळे ती चलबिचल आहे, जे घडायचे ते घडून गेलं आहे पण तीला तो निसटता धागा सोडायचा नाही आहे, त्यासाठी तीची आंतरिक तळमळ चालू आहे. निसटत्या धाग्याला एक वेळ प्रयत्नपुर्वक एका जागी बांधता येईल, पण तो धागा हातचाच सुटला तर सगळचं रंगहीन होऊन जाईल.. त्यामुळे तीची धडपड ही तो धागा सूटू नये म्हणून आहे.

रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली

सगळे ठीक आहे, पण दु:ख देणाराच समोर हसत हसत उभा राहीला तर काय? निलकंठेश्वर व्हावे लागते हो अश्या अवस्थेत. तो भेटला याचा आनंद असतो, पण यांनेच आपली प्रताडना केली, याच्यामुळेच आपल्याला त्रास झाला हे विसरून तो हसला म्हणून हसावे देखील लागते.. वर वर.. पण आत ह्दय? त्याचे काय? तो घाय मोकळून रडू पण शकत नाही मग दोन्ही अवस्था सुखाची व दु:खाची देखील प्यावी लागते, जसे विष!
कवयत्रीने यह अच्छी बरसात मिली या ओळी अत्यंत कल्पकतेने वापरला आहेत व ती रिमझिम शब्दाला जोडून येते म्हणून छान वाटते असे नाही.. हिंदी मध्ये एक शब्द आहे “सौगात” हा लक्षात घेतला तर बरसातचा पंच आपल्याला लगेच समजेल.

जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली

जेव्हा नाती तुटतात, एखादा जवळचा दुर जातो. सुरवातीला आपल्याला वाटत असतं की हट्ट मला काही फरक पडत नाही. त्याला माझी नाही तर मला त्याची का कदर असावी, पण तसं नसतं आपल्या आतून एवढं दु:ख, वेदना झालेल्या असतात की जसे आपल्या ह्दयाचा एक तुकडा कोणीतरी कापून आपल्या सोबत घेऊन गेला आहे व त्या तुकड्याची त्याला कदर नाही. पण आपण आपल्याला आपल्या मनाला समजावत असतो की ठीक आहे गेला ना / गेली ना काही फरक पडत नाही. मी खुष तर जग खुष! आपण वर वर खूप खुष असतो स्वतःवर व जगावर देखील पण जेव्हा आर्ततेने आपण जेव्हा आपल्याकडेच पाहतो (येथे कवयत्रीने हँसने की आवाज सुनी हे कडवं वापरलं आहे) तेव्हा कळतं की हे सगळं खोटं आहे, आपल्याला माहीती आहे आपल्या काय त्रास व दु:ख आहे ते…. ले फिर तुझको मात मिली या ओळी हेच सांगतात की तुला असे वाटत असेल की तुझी अवस्था कोणाला माहीती नाही आहे पण.. तुझ्या अंतरमनाला नक्कीच माहीती आहे साहेबा.. काय घडलं व का असे खोटं खोटं जगतो आहेस.

मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली

कशी बिकट अवस्था होते पहा, आपण थांबलो म्हणून जग थांबत नाही, ते चालतच राहते, जसे ते चालणार आहे. आपण पण आपल्याला हवे तसे थोडेफार जागायचा प्रयत्न करतो पण जेव्हा जिवनसाथी, आपला सदासर्वकाळ सोबत राहणारा आपला हमसफर.. आपला मित्र जेव्हा आपल्या जगण्यावागण्यात विसंगती शोधण्याचा किंवा दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न करतो तेव्हा आपण बेचैन होतो.. आपली आत्मा आत गुदमरु लागते. कसे आहे कसे जगावे हा प्रत्येकाचा व्यक्तीगत मामला आहे पण एखादा जेव्हा नवरा होतो किंवा एखादी जेव्हा बायको होते त्यांना वाटतं की अरे समोरचा बिघडलेला आहे त्या सुधरवायलाच हवा… मी प्रयत्न करते.. मी प्रयत्न करतो.. पण या प्रयत्नाचीच कधी कधी बंधने होतात अभिजात कलावंताची कलाकृती त्या बंधनामुळे मरणासन्न अवस्थेत जाते. हे समजून उमजून एखाद्याला तथाकथित सुधारण्याचा प्रयत्न करावा.. बघा ना कवयत्री म्हणते आहे की मला हवा तसा साथी मिळाला नाही असे नाही पण त्याच्यासाठी व त्याच्या नुसार आठ पहर चालावे देखील लागत आहे व शेवटी हाती काय तर बेचैनपणा! अशांती!

होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली

मनात असलेलं, खरं खुरं अगदी बाहेर येण्याच्या बेतात असतं कधी कधी, पण आपणच स्वतःवर बंधने घालतो व वेळ मारून नेतो, का? तर आपल्याला माहीती असते समोरचा एवढा देखील वाईट नाही आहे, तो आपली काळजी करतो किंवा किमान तेवढं भासवतो तरी आहे.. मग आपण तोंडात आलेले वाक्य बदलतो व त्या आवेगाने बाहेर पडलेल्या शब्दाला एक वेगळाच आयाम देतो व आपली सुटका करून घेतो.. समोरचा कसा आहे हे व्यक्त करण्यासाठी कवयत्रीने जलती-बुझती आँखों में हे कडवं वापरलं आहे.

कसं आहे, प्रेम व त्याची अभिव्यक्तीची रुप अनंत आहेत.. फक्त ते व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा नजरीयां अलग!

आणि हो, सांगायचेच राहीले या महज़बीन बानो म्हणजे कवयत्री नाज़
नाज़ म्हणजे तुम्हाला अर्थ बोध होणार किंवा नाही माहीती नाही, जाता जाता सांगायचे म्हणून सांगून जातो.. नाज़ म्हणजे अभिनेत्री, ट्र्जेडी क्वीन मीना कुमारी!

The short URL of the present article is: https://moonfires.com/j9kn

Hot this week

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे करें

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे...

दिवाळी 2024: घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी

घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी -  दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील...

मराठवाडा वॉटरग्रीड – महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान

महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान - मराठवाडा वॉटरग्रीड शिल्पकार : देवेंद्र...

महर्षि वाल्मीकि जयंती

महर्षि वाल्मीकि जयंती, जिसे विशेष रूप से महर्षि वाल्मीकि...

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ -  भारत के...

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please Support us pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.

 

Topics

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे करें

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे...

दिवाळी 2024: घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी

घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी -  दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील...

मराठवाडा वॉटरग्रीड – महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान

महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान - मराठवाडा वॉटरग्रीड शिल्पकार : देवेंद्र...

महर्षि वाल्मीकि जयंती

महर्षि वाल्मीकि जयंती, जिसे विशेष रूप से महर्षि वाल्मीकि...

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ -  भारत के...

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ: दिवाळी सण भारतभरात...

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : सुप्रसिद्ध वैज्ञानिक...

केवट की कथा – क्षीरसागर का कछुआ

केवट की कथा - क्षीरसागर में भगवान विष्णु शेषनाग...

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Categories