सूर्य मंदिरे – वेदांमध्ये सुर्याला आद्य शक्ति म्हणून मानले आहे. सूर्यदेवाला “सूर्य” किंवा “आदित्य” आशा अनेक नवानी संबोधतात. वेदांमध्ये सुर्याला मुख्य स्थान दिले आहे.
पुराणात सुद्धा सुर्याला मुख्य स्थान दिले आहे. रामाला सुद्धा सुर्याची आराधना करण्यास सांगितले होते. इराण मधल्या काही मुख्य धर्माच्या ग्रंथामध्ये सुद्धा सुर्याला प्रथम स्थान दिले आहे. पुढे पारसी समाजाने सुद्धा “अग्न” हे त्यांचे आराध्य स्थान मानले आहे. सारांश इतकाच की बहुतेक सर्व धर्माच्या व्यक्ति व् ग्रंथामध्ये सुर्याला प्रमुख स्थान दिले आहे.अश्या या सूर्य देवाची देवाले जगभर पहावयास मिळतात. ७ व्या शतकात मुलतान ( पकिस्तान ) येथे पहिले सूर्यमंदिर बांधले होते. पण भारतात ७ प्रमुख सूर्य मंदिरे पहायला मिळतात.
बिहार राज्यात गया येथे हे सूर्य मंदिर आहे. देवळासमोर कुंड असून भाविक सूर्याला पाणी कुंडामध्ये सोडतात. याच परिसरात सूर्याची अनेक लहान – मोठी मंदिरे पहायला मिळतात. मगद राजाच्या वेळी ही देवळे बांधण्यात आली असावी. येथील देवळाच्या सूर्य मूर्तीवर इराणी देवांची छाप पाहायला मिळते. या देवळात सूर्य रथावर आरूढ झाले असून त्यांनी जाकेट, मनगटात कढे व उंच बूट घातले आहेत. हे देवूळ १३ व्या शतकात दक्षिणेचा राजा प्रतापरुद्रा याने बांधले होते. याचे राज्य आंध्र प्रदेशातील वरंगळ येथे होते.या देवळाचे मुख्य प्रवेशव्दार पश्चिमेकडे असून या देवळाजवळ विष्णूचे प्रसिध्द “विष्णूपाद मंदिर ” आहे. मंदिर साधे बांधले असून वरती घुमत आहे. या देवळाचा सभामंडप भव्य आहे व पुर्वीकडे सूर्यकुंड आहे. या मंदिरात अनेक कोरलेले खांब आहेत. या खांबांवर शिव, बुध्द, विष्णू, सूर्य, दुर्गा व गणपतीच्या अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात.
ब्रम्हणया देव (बरामजू) मंदिर मध्य प्रदेशातल्या झांसी जवळ उन्हो येथे आहे. येथील सूर्य देवाची मूर्ती दगडाची बनवली असून काळ्या दगडावर उभी आहे. देवळावर २१ त्रिकोण कोरलेले आहेत. मूर्तीवर तांब्याचे कवच बसवले आहे. रविवारी भाविकांची गर्दी असते. हे देवूळ पेशव्यांनी बांधले असून त्यानानातर जवळच्या गावातल्या दाडिया यांनी पूर्ण केले आहे. येथील स्थानिक रहिवाशांची ह्या मंदिरावर खूप श्रद्धा आहे. देवाच्या दर्शनामुळे अंधत्व व कुष्टरोग नाहीसा होतो अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
आसामच्या गोलपारा येथे सूर्य पहार डोंगरावर हे देवस्थान आहे. या देवळाच्या पायावर सूर्य देवाचे वडील कश्यप यांची मूर्ती कोरलेली आहे. व दोन्ही बाजूना सहा अश्या बारा सूर्याच्या वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. हे मंदिर हल्लीच बांधलेले असून या डोंगराच्या पायथ्याशी शंकराची अनेक लिंगे दगडात कोरलेली आढळंतात.
तामिळनाडू येथील कुंभकोनम येथे हे मंदिर पाहायला मिळते. कुंभकोनम येथे अनेक देवळे बांधली आहेत. यात सूर्य, काशी – विश्वेश्वर, विसललक्ष्मी, चंद्र, अंगालकन, उदान, बृहस्पती, सुकर्ण, शनीश्वर, राहू व केतू. भाविकांना आधी गणपतीच्या देवळात प्रवेश करून मग बाकीच्या देवांचे दर्शन घेता येते. येथील भाविक या सर्व देवळात ९ वेळा प्रदक्षिणा घालतात. हे देऊळ ८०० वर्षापूर्वी बांधलेले असून त्यावर द्रविड संस्कृतीची छाप आहे. हे देऊळ चोला राजाने बांधलेले असावे. या देवळाच्या शेजारी कंजमुख १२०० वर्षापूर्वी बांधलेले तिरूमंगलकुडी हे देवस्थान आहे. काही वर्षात ह्या मंदिरांनी पर्यटक आकर्षित केले असून तामिळनाडू सरकारकडून ” नवग्रह स्थळ यात्रा ” हि खास तीर्थयात्रा सुरु केली आहे.
आंध्र प्रदेशातील अरासावली येथे ७ व्या शतकात कलिंगा राजाने बांधलेले पुरातन मंदिर पाहायला मिळते. हे एवढे जुने असून सुद्धा देवळाचा परिसर व देऊळ चांगल्या स्थितीत ठेवले आहे. सूर्य देवाची मूर्ती काळ्या ग्रानाइट दगडामाधली असून दोन्ही हातात कमळ धरलेली आहेत. येथे सूर्याला पद्मपाणी असेही संबोधतात. हे देऊळ श्रीकाकुलम गावाजवळ आहे.
गुजरात येथील मोधीश येथे हे सूर्यमंदिर बांधलेले आहे. हे साधारण १०२६ साली बांधले आसवे. या मुर्तीनेसुद्धा गया मंदिराप्रमाणे बूट व बेल्ट घातलेले दिसतात. या मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पूर्वेकडे असून सूर्याचे किरण मूर्तीवर पडतात. या देवळाला शिखर नसून भिंतीवर मोधीरा नृत्य करताना महिला कोरलेल्या आहेत. सभागृहात तोरण कोरलेले असून पूर्वेकडील प्रवेशव्दाराकडे सूर्यकुंड आहे. या देवळावर मगद घराण्याची छाप दिसून येते.
सर्वात प्रसिद्ध ओरिसातील १३ व्या शतकात बांधलेले सुंदर कोरीव काम केलेले मंदिर आहे. पूर्वीपासून उत्तर- पूर्वेकडे २० मैलावर कोनार्क मंदिर आहे. कोनार्क म्हणजे ” कोपऱ्यातला सूर्य “. संपूर्ण काळ्या दगडात हे मंदिर बांधले असून मंदिराच्या पायावर ७ घोडे कोरलेले आहेत व २४ रथचक्र कोरलेली दिसतात. हे मंदिर गंगा घराण्यातील नृहसिंह देवा यांनी बांधले आहे. त्यावेळची स्वयंभू मूर्ती ज्यावर सूर्याचे पहिले किरण पडत ती पोर्तुगीजांनी चोरली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या देवळात एक मोठा सभामंडप व नटमंदिर आहे.
The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please Support us pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.
If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI(you can also scan the QR Code below to make a payment to this ID.