शासन आपल्या दारी योजनेची संपूर्ण माहिती – महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांचा सामाजिक विकास तसेच आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी प्रयत्नशील असते आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शासन आपल्या दारी योजनेची संपूर्ण माहिती
या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बाल विकास, भूमिअभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला), मतदारनोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंबकल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाहनोंदणी,कुपोषित बालकांची तपासणी, जमीनमोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, कृषी अवजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनावरांची तपासणी शिबिर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सरकारी योजनांचा समावेश आहे.
| योजनेचे नाव | शासन आपल्या दारी योजना |
| योजनेची सुरुवात | 2023 |
| राज्य | महाराष्ट्र |
| उद्देश | शासनाद्वारे सुरु योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविणे |
| योजनेचा लाभ | राज्यातील नागरिकांचा सामाजिक विकास करणे |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना तसेच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- राज्यातील नागरिकांना शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या योजनांसाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- नागरिकांना एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी.
- सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील नागरिकांना एकाच पोर्टलवर सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल ज्यामुळे ते त्यांना उपयुक्त योजनांसाठी अर्ज करू शकतील व योजनेचा लाभ मिळवू शकतील.
- कामगार, कष्टकरी, शेतकरी, विदयार्थी, महिला, दिव्यांग बांधव, आदिवासी बांधव आदी समाजातील सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून सरकारने शासन आपल्या दारी अभियान हाती घेतले आहे
- राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- राज्यातील नागरिक योजनेच्या माहितीसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- नागरिकांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व ते घरबसल्या आपल्या मोबाईल व कॉम्पुटर च्या सहाय्याने अर्ज करू शकतील ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
शासन आपल्या दारी – राबविण्यात येणारे उपक्रम
- आरोग्य शिबिर
- रोजगार मेळावे
- रक्तदान शिबिर
- पासपोर्ट
- कृषी सेवा केंद्राचे परवाने
- सेवानिवृत्त लाभ
- आधार कार्ड सुविधा
- पॅन कार्ड सुविधा
- पीएम किसान योजना
- विवाह नोंदणी
- ई-श्रम कार्ड
- भरती मेळावा
- पीएफ घरकुल योजना
- मनरेगा
- जॉब कार्ड
- डिजिटल इंडिया
- सखी किट वाटप
- शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
- मुलींना सायकल वाटप
- नवीन मतदार नोंदणी
- दिव्यांग साहित्य वाटप
- शिकाऊ चालक परवाना
- कृषी प्रदर्शन
अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.