श्रीगणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा
श्रीगणेश दुर्वा का अर्पण करता ?
“गजाननाय नम: श्वेतदुर्वा समर्पयामी” असे म्हणून हरळी श्रीगणेशाला दुर्वा (गणपती) बाप्पाला वाहिल्या जातात. एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक राक्षस होता. त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते. तो इतका भयंकर होता की ऋषी-मुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा.
या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनीसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा. तेव्हा महादेवांनी सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितलं की अनलासूराचा अंत फक्त गणपतीच करु शकतात.
कथेनुसार जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळंकृत केलं, तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली. अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले. पण, गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली. त्यांनी दुर्वाच्या २१ गाठी बांधल्या आणि श्रीगणेशाला खायला दिल्या. जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हा भगवान श्रीगणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरु झाली. गणेशजींच्या पूजेत याचं मोठं महत्त्व आहे.
उपयोग
दुर्वांमध्ये पावसाळ्यात जास्त रसनिर्मिती होते. खरे तर पत्रींमध्ये पांढऱ्या दुर्वांचा समावेश होतो. परंतू आजकाल आपण हरळीचाच वापर पत्रींमध्ये करतो. दुर्वा किंवा हरळी बाप्पाची अतिशय प्रिय पत्री आहे. भारतात दुर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पत्रीचे शास्त्रीय नाव ‘सायनोडॉन डॅक्टिलॉन’ असे आहे. दुर्वा या थंड गुणाच्या आणि पित्तशामक आहेत. डोकेदुखी, विंचूदंश यामध्ये प्रामुख्याने दुर्वाचा वापर होतो.गोवर, कांजिण्या,तारुण्यपिटीकांवर दुर्वाचा रस अत्यंत उपयोगी असतो. बालकांच्या बुद्धिवर्धनासाठी दुर्वाघृताचा वापर केला जातो.
गणपतीसाठी दुर्वा कशी लावावी
श्रीगणेश दुर्वा साठी म्हणजेच अर्थात हराळ! शेतकऱ्यांसाठी फारच त्रासदायक गवत! या गवताला मरण नाही! पूर्ण मुळं काढण्यासाठी खोलवर उन्हाळ्यात नांगरट करावी लागते. हरळीची मुळं ज्याला शेतकरी काशा म्हणतो,ते वेचून जाळून टाकतो. तरीही जमिनीत चार सहा राहिलेली मुळं पुन्हा उगवतात आणि दोन तीन वर्षात पुन्हा जैसे थे! तणनाशक हे वारंवार वापरावं लागते. कारण ते वरची दुर्वा फक्त नाश करू शकते…मुळं नाही. या दुर्वा ला पूर्ण वाढ झाल्यावर मऊसर असे फुलं येतात.त्यात बी नसते.ते अंकुरत नाहीत. दुर्वा घरी कुंडीत लावायची असेल तर मुळं आणून लावावीत.
सल्ला: दुर्वा बगीच्यात खुली लावू नये. कारण तिचे नियंत्रण करणे हेच पुढं मोठे काम होऊन बसते.जिकरीचे आहे हे काम!
गणपती आरती संग्रह
लेखक: गाववाला शेतकरी