NewsTechमराठी ब्लॉग

NETRA (नेटवर्किंग ट्रॅफिक अँनालिसिस) - इंडियन स्पाय प्रोग्राम

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

भारताच्या सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स (CAIR), DRDO आणि NTRO यांनी संयुक्तरित्या NETRA सॉफ्टवेअर विकसित केले आहे. याचा वापार भारतीय इंटेलिजेंस ब्युरो, भारताची देशांतर्गत गुप्तचर संस्था यांच्याद्वारे केला जातो. RAW ही देशाची एक्सटर्नल स्पाय एजन्सी पूर्वनिर्धारीत फिल्टर वापरून 24×7×365 रिअल टाइम इंटरनेट ट्रॅफिक चे विश्लेषण करत असते.

इंडियन स्पाय प्रोग्राम
इंडियन स्पाय प्रोग्राम

अगोदर या NETRA ( इंडियन स्पाय प्रोग्राम ) ची NIA द्वारे यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर ही प्रणाली संपूर्ण देशभर तैनात करण्यात आली आहे (2022) उत्तम उदाहरण - PFI छापे. माफिया, दहशतवादी, क्रिमिनल्स, शत्रू देश डेटा कम्युनिकेशनचा वापर करून देशविघातक कारनामे, कट-कारस्थाने करत असतात. त्यामुळे आपल्या NTRO, CAIR आणि DRDO ने इंटरनेट ट्रॅफिकवर रिअल टाइम लक्ष ठेवता येईल अशा 2 स्वदेशी प्रणालींची रचना केली असून MHA, IB, दूरसंचार विभाग, IT विभाग आणि NIA यांची एक संयुक्त "इंटरनेट मॉनिटरिंग सिस्टम" ची स्थापना करण्यात आली आहे.

NETRA ची कमाल -

➤ स्काईप आणि गुगल टॉक सारख्या सॉफ्टवेअरमधून केल्या जाणाऱ्या व्हॉइस ट्रॅफिकचे रीअल-टाइममध्ये विश्लेषण.
➤ रीअल-टाइममध्ये 'हल्ला', 'बॉम्ब', 'ब्लास्ट' किंवा हजारो तत्सम घातक कीवर्ड असलेले संदेश फिल्टर करणे.
➤ मोठ्या प्रमाणातील ट्विटस , स्टेटस अपडेट्स, WA, FB, ईमेल्स, इन्स्टंट मेसेजिंग ट्रान्स्क्रिप्ट्स, इंटरनेट कॉल्स, ब्लॉग्स, फोरम्स मधील इंटरसेप्टचे विश्लेषण.
➤ इंटरनेटवरील तयार करण्यात आलेल्या खोट्या,घातक इमेजेस व मेसेजेसचे इंटरसेप्ट आणि विश्लेषण.
➤ ही सिस्टीम मोठ्या प्रमाणात इंटरनेट नेटवर्कमधील आंतरराष्ट्रीय डेटाचेही विश्लेषण करते.
➤ देशविघातक एनक्रिप्टेड मेसेजेस, फोन कॉल्स, सॅटेलाईट फोन कॉल...देखील इंटरसेप्ट, विश्लेषण नेत्रा करत आहे.

नेत्रा हा भारताच्या सुरक्षा पायाभूत सुविधांचा तिसरा टप्पा आहे (NATGRID, CMS आणि NETRA.)

➤ ह्या सॉफ्टवेअर मध्ये हजारो नोड्स असून, प्रत्येक नोडला 300 Gigabytes (GB) इंटरसेप्टेड इंटरनेट ट्रॅफिक स्टोअर कॅपिसिटी आहे.

IT, दूरसंचार विभाग, I-T विभाग, DRDO, CAIR, C-DoT, CERT आणि NTRO च्या 40 शास्त्रज्ञांनी व एक्सपर्ट्स नी "नेत्रा" ची निर्मिती केली असून, DRDO चे शास्त्रज्ञ डॉ.जी.अथिथन (CAIR) आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील टीमला NETRA डेव्हलप करण्यासाठी "अग्नि पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.अवकाशात, खोल समुद्रात, बंकर्स मध्ये, गुप्त न्यूक्लिअर स्टोअर मध्ये देखील कधीही, केव्हाही इंडियन स्पाय प्रोग्राम "नेत्रा" पाहू शकते, ऐकू शकते, डिजिटल फूटप्रिंटचा शोध घेऊ शकते..

सर्व शास्त्रज्ञांचे व मोदी सरकारचे अभिनंदन! जय हिंद!


इंटरनेट कसे काम करते ?

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker