महाभारत – धर्म / अधर्म नाही, केवळ कर्म

Moonfires
महाभारत

खर तर महाभारत म्हणजे नुसत काव्य नाही कलयुगात आढळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं संकलन व अभ्यासपूर्ण वर्णन आहे. त्याच कारण आहे की चतुर्वेद पूर्ण अभ्यासून त्याला समाजामध्ये रुजविण्यासाठी महाभारताची रचना केली महाभारताची प्रत्येक पात्र वा व्यक्तिरेखा आधी लिहिली गेली नंतर जगली गेली. महाभारतात राजकीय,सामाजिक,नैतिक,अनैतिक,दैवी,मानवी,चमत्कारिक,तर्कसंगत,शास्त्रीय व विज्ञानवादी आहे. विज्ञानिक हा याचा पाया तर कर्म याच तेज आहे.

Mahabharat - महाभारत
महाभारत

खर तर प्रत्येक गोष्टीला संदर्भ दिला तरच तो पटेल पण मग त्याला ट्विटर पुरणार नाही. तरी प्रासंगिक उदाहरण देतो.आज आपण ज्याला test tube baby म्हणतो ते महाभारतातील कौरव आहेत एका stem cell ने अख्खा मनुष्य तयार करता येतो, लिंगपरिवर्तन transgender अश्या अनेक ज्ञानाचा उगमस्थान महाभारत आहे अशी अनेक उदाहरण महाभारतात आहे.

माऊली च्या शब्दात सांगायचे तर…

तैसे व्यासोक्ती अळंकारिले | आवडे ते बरवेपण पातले।
ते जाणोनि काय आश्रयिले | इतिहासी ॥ ४५॥

व्यासोक्ती=व्यास उक्ती बरवेपण=प्रियत्व

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं | सानीव धरुनी आंगी।
पुराणे आख्यानरूपे जगीं | भारता आली ॥ ४६॥

पुरतिये=पूर्ण सानीव=लहानपण

म्हणऊनि महाभारतीं जे नाही | ते नोहेचि लोकी तिहीं।
येणे कारणे म्हणिपे पाहीं | व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥

व्यासोच्छिष्ट=व्यासांचे उष्टे जगत्रय =तिन्ही जग

ज्याप्रमाणे एखादी आवडती गोष्ट जेव्हा सौंदर्याने नटून आपल्या समोर येते तेव्हा ती आपल्याला अधिक प्रिय होते त्याप्रमाणे व्यासमुनींच्या वचनांनी , वाचेने महाभारतातील कथा या शोभिवंत केलेल्या आहेत आणि त्या इथे अश्या शोभीवंत होतात हे जाणून आहेत म्हणूनच जणूकाही महाभारतामध्ये आश्रयाला आलेल्या आहेत.

खरं तर या कथा आपल्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि व्यापक आहेत तरी सुद्धा ज्याप्रमाणे जमीनदार इनामदार मोठमोठे सरदार श्रीमंत करोडपती लोक सुद्धा राज दरबारामध्ये येतात ते प्रतिष्ठा हवी असते म्हणूनच त्याप्रमाणे या पुराणातील कथा महाभारतामध्ये छोटे रूप धारण करून ,लहानपण अंगात धारण करून, संक्षिप्त होऊन, नम्र होऊन व्याख्यान रूपाने महाभारतात आलेली आहेत या कारणे महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकांत नसणारच अशी खात्री आहे म्हणून व्यासोच्छीष्ट जगत त्रय असे म्हणतात. म्हणजे सर्व जग व्यास मुनींनी अगोदरच पाहिले, जाणले, उपभोगले आहे.

ता दुसरा कुणीही ती गोष्ट जाणेल लिहिल किंवा बोलेल तरी ती व्यासांची ती उष्टी आहे. ती नवीन नसणार… महाभारताला कर्म बंधन मान्य आहे आणि त्याला धरून भोग आणि प्रारब्ध यांचं चिंतन केलं आहे रामायणात श्रीहरी विष्णुला श्रीराम अवतारात इंद्रपुत्र वालीला मारणे व सुर्यपुत्र सुग्रिवाला मित्रत्व देणे हे कर्माच बंधन महाभारतात त्याच श्रीहरी विष्णुना कृष्ण अवतारात सुर्यपुत्र कर्ण मारणे व इंद्रपुत्र अर्जुनला मित्रत्व देणे हे कर्म बंधन चे द्योतक आहे.

काल @DrRisingStar9  आपणं धर्म अधर्म यावर एक पोस्ट टाकली होती. मुळात धर्म आणि अधर्म यांची व्याख्या काय ? माऊली भाष्य पहा … “येथे वडील जे जे करिती | तयाचे नाम धर्मु ऐसे ठेविती | येथे वडीलधारे म्हणजे समाजातील ज्येष्ठ आदरणीय व्यक्ती मग ते साधू संत वा अवतार व्यक्ती होत त्यांनी जे जे केलं किंवा करायला सांगितलं त्याला धर्म म्हणतात इतकी सोपी व्याख्या आहे, याला छेद देताना भगवान श्रीकृष्ण 18 व्या अध्यायात म्हणतात …

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ||

माऊलींची ओवी पहा …

 

तैसें धर्माअधर्माचें टवाल | दावि अज्ञाना कां जें मूल |
तें त्यजूनि त्यजीं सकल | धर्मजात ||
धर्म अधर्म हे टवाळ आहे असे माऊली म्हणतात त्याच कारण असे आहे की एखादा धर्म करताना एखादा अधर्म देखील होत असतो उदाहरण देतो ..
“एक पतीव्रता स्री जीचे पती जेवायला बसले आहेत आणि तिचे तान्हे पाळण्यात झोपले आहे… नेमकं पतीला जेवता जेवता ठसका लागला आणि त्याच क्षणी तान्हंलू ने हंबरडा फोडला… अश्या परिस्थितीत ती स्त्री जर पतीला आधी पाणी देत असेल तर तिने पतिव्रता धर्माचे पालन केले पण त्याच वेळी मातृत्व न पालन केल्याने अधर्म घडलाच ना … या उलट तिने जर आधी लेकराला उचलून पान्हा पाजला तर मातृत्व धर्म पाळला पण पतिव्रता धर्माचे हनन झालेच…”
यातून बाहेर पडायचं असेल तर भगवंताला शरण हाच उपाय कारण कर्मफल कुणालाच सोडत नाही.
कर्मे दशरथ वियोगें मेला | कर्मे श्रीराम वनवासा गेला |
कर्मे रावण क्षयो पावला | वियोग घडला सीतादेवी |
कर्मे दुर्योधनादि रणीं नासले | कर्मे पांडव महापंथा गेले..
त्यातून भगवंतच मार्ग काढतो केलीं कर्मे निवारी नारायण .. रामकृष्ण हरी
The short URL of the present article is: https://moonfires.com/l0id
Share This Article
Follow:
राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं। Founder Of Moonfires.com
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *