खर तर महाभारत म्हणजे नुसत काव्य नाही कलयुगात आढळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं संकलन व अभ्यासपूर्ण वर्णन आहे. त्याच कारण आहे की चतुर्वेद पूर्ण अभ्यासून त्याला समाजामध्ये रुजविण्यासाठी महाभारताची रचना केली महाभारताची प्रत्येक पात्र वा व्यक्तिरेखा आधी लिहिली गेली नंतर जगली गेली. महाभारतात राजकीय,सामाजिक,नैतिक,अनैतिक,दैवी,मानवी,चमत्कारिक,तर्कसंगत,शास्त्रीय व विज्ञानवादी आहे. विज्ञानिक हा याचा पाया तर कर्म याच तेज आहे.
खर तर प्रत्येक गोष्टीला संदर्भ दिला तरच तो पटेल पण मग त्याला ट्विटर पुरणार नाही. तरी प्रासंगिक उदाहरण देतो.आज आपण ज्याला test tube baby म्हणतो ते महाभारतातील कौरव आहेत एका stem cell ने अख्खा मनुष्य तयार करता येतो, लिंगपरिवर्तन transgender अश्या अनेक ज्ञानाचा उगमस्थान महाभारत आहे अशी अनेक उदाहरण महाभारतात आहे.
माऊली च्या शब्दात सांगायचे तर…
तैसे व्यासोक्ती अळंकारिले | आवडे ते बरवेपण पातले।
ते जाणोनि काय आश्रयिले | इतिहासी ॥ ४५॥
व्यासोक्ती=व्यास उक्ती बरवेपण=प्रियत्व
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं | सानीव धरुनी आंगी।
पुराणे आख्यानरूपे जगीं | भारता आली ॥ ४६॥
पुरतिये=पूर्ण सानीव=लहानपण
म्हणऊनि महाभारतीं जे नाही | ते नोहेचि लोकी तिहीं।
येणे कारणे म्हणिपे पाहीं | व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥
व्यासोच्छिष्ट=व्यासांचे उष्टे जगत्रय =तिन्ही जग
ज्याप्रमाणे एखादी आवडती गोष्ट जेव्हा सौंदर्याने नटून आपल्या समोर येते तेव्हा ती आपल्याला अधिक प्रिय होते त्याप्रमाणे व्यासमुनींच्या वचनांनी , वाचेने महाभारतातील कथा या शोभिवंत केलेल्या आहेत आणि त्या इथे अश्या शोभीवंत होतात हे जाणून आहेत म्हणूनच जणूकाही महाभारतामध्ये आश्रयाला आलेल्या आहेत.
खरं तर या कथा आपल्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि व्यापक आहेत तरी सुद्धा ज्याप्रमाणे जमीनदार इनामदार मोठमोठे सरदार श्रीमंत करोडपती लोक सुद्धा राज दरबारामध्ये येतात ते प्रतिष्ठा हवी असते म्हणूनच त्याप्रमाणे या पुराणातील कथा महाभारतामध्ये छोटे रूप धारण करून ,लहानपण अंगात धारण करून, संक्षिप्त होऊन, नम्र होऊन व्याख्यान रूपाने महाभारतात आलेली आहेत या कारणे महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकांत नसणारच अशी खात्री आहे म्हणून व्यासोच्छीष्ट जगत त्रय असे म्हणतात. म्हणजे सर्व जग व्यास मुनींनी अगोदरच पाहिले, जाणले, उपभोगले आहे.
ता दुसरा कुणीही ती गोष्ट जाणेल लिहिल किंवा बोलेल तरी ती व्यासांची ती उष्टी आहे. ती नवीन नसणार… महाभारताला कर्म बंधन मान्य आहे आणि त्याला धरून भोग आणि प्रारब्ध यांचं चिंतन केलं आहे रामायणात श्रीहरी विष्णुला श्रीराम अवतारात इंद्रपुत्र वालीला मारणे व सुर्यपुत्र सुग्रिवाला मित्रत्व देणे हे कर्माच बंधन महाभारतात त्याच श्रीहरी विष्णुना कृष्ण अवतारात सुर्यपुत्र कर्ण मारणे व इंद्रपुत्र अर्जुनला मित्रत्व देणे हे कर्म बंधन चे द्योतक आहे.
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ||
माऊलींची ओवी पहा …
कर्मे रावण क्षयो पावला | वियोग घडला सीतादेवी |