श्री कृष्णाची आरती – श्री कृष्णा अवतार जगतीत परमेश्वराच्या विशिष्ट संकल्पना प्रस्तुत करण्यास आदि पुरुष म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवद्गीतेतील त्यांच्या उपदेशामुळे मानवाच्या आध्यात्मिक विकासास मोलाच चालना मिळते. त्यांच्या जीवनातील विविध घटना आणि प्रसंग मानवी मनाला आनंद व उत्साह देण्यास सक्षम आहेत. श्री कृष्णांच्या राजयोगाचा मार्ग हा एक उत्कृष्ट धार्मिक मार्ग म्हणून संसारात प्रचारित आहे.

ओवाळू आरती मदनगोपाळा-कृष्ण आरती
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार ।
ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। १ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। २ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी ।
वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान ।
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ४ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।
एका जनार्दनी देखियले रूप ।
पाहता जाहले अवघे तद्रूप ।। ५ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।
कृष्णा अष्टकम
श्रियाश्लिष्टो विष्णु: स्थिरचरवपुर्वेदविषयो धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ताब्जनयन: ।
गदी शंखी चक्री विमलवनमाली स्थिररूचि: शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषय: ।। 1।।
यत: सर्वं जातं वियदनिलमुख्यं जगदिदं स्थितौ नि:शेषं योऽवति निजसुखांशेन मधुहा ।
लये सर्वं स्वस्मिन् हरति कलया यस्तु स विभु: । शरण्यो. ।।2।।
असूनायम्यादौ यमनियममुख्यै: सुकरणैर्निर्येरुध्येदं चित्तं ह्रदि विमलमानीय सकलम् ।
यमीडयं पश्यन्ति प्रवरमतयो मायिनमसौ । शरण्यो. ।।3।।
प्रथिव्यां तिष्ठन् यो यमयति महीं वेद न धरा यमित्यादौ वेदो वदति जगतामीशममलम् ।
नियन्तारं ध्येयं मुनिसुरनृणां मोक्षदमसौ । शरण्यो. ।।4।।
महेन्द्रादिर्देवो जयति दितिजान्यस्य बलतो न कस्य स्वातन्त्र्यं क्वचिदपि कृतौ यत्कृतिमृते ।
कवित्वादेर्गर्वं परिहरति योऽसौ विजयिन: । शरण्यो. ।।5।।
विना यस्य ध्यानं व्रजति पशुतां सूकरमुखां विना यस्य ज्ञानं जनिमृतिभयं याति जनता ।
विना यस्य स्मृत्या क्रमिशतजनिं याति स विभु: । शरण्यो. ।।6।।
नरातंकोत्तंक: शरणशरणो भ्रान्तिहरणो घनश्याम: कामो व्रजशिशुवयस्योऽर्जुनसख: ।
स्वयम्भूर्भूतानां जनक उचिताचारसुखद: । शरण्यो. ।।7।।
यदा धर्मग्लानिर्भवति जगतां क्षोभकरणी तदा लोकस्वामी प्रकटितवपु: सेतुधृगज: ।
सतां धाता स्वच्छो निगमगणगीतो व्रजपति: । शरण्यो ।।8।।
इति हरिरखिलात्माराधित: शंकरेण श्रुतिविशदगुणोऽसौ मातृमोक्षार्थमाद्य : ।
यतिवरनिकटे श्रीयुक्त आविर्बभूव स्वगुणवृत उदार: शंखचक्राब्जहस्त: ।।9।।


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.