प्रभू श्री राम मांसाहारी होते का? उत्तर सरळ आणि सोप्या शब्दात देऊ. जे अनेक लोक मांसाहार करतात, त्यांना प्राण्यांवरचे क्रूरपणा थांबवायचे म्हटले तर त्यांच्या बाजूने युक्तिवाद असा होतो की जेव्हा महापुरुष, ज्ञानी लोक, भगवान राम देखील मांसाहारी होते. मग तुम्ही आम्हाला मांस / मटण वगैरे खाण्यापासून का थांबवता? असे युक्तिवाद ऐकून एखाद्या व्यक्तीचे मन दुखावते. तर आज तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येथे नक्की मिळेल.
राम मांसाहारी होते का?
नाही, श्री राम हे एक सद्गुणी मनुष्य होते, जे शाकाहारी अन्न खात. रामायणातच याची अनेकवेळा पुष्टी झाली आहे, तुम्हाला असे दिसून येईल की श्री रामाने वनवासात १४ वर्षे व्यतीत केली किंवा राजा म्हणून सिंहासनावर बसले असले तरी त्यांनी नेहमीच कंदयुक्त आणि शाकाहारी आहाराचा अवलंब केला.
जेव्हा गुरु विश्वामित्र ताडका राक्षसणीस मारण्यासाठी राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेतात, तेव्हा राजपुत्र असूनही, दोन्ही भाऊ अन्नासाठी जंगलातील कंदमुळे आणि फळांवर अवलंबून होते. आपण राजाचे पुत्र आहोत आणि मांसाहार करणार आहोत ही भावना त्यांच्या मनात कधीच नव्हती.
एवढेच नाही तर वडील दशरतच्या आज्ञेवरून श्री राम १४ वर्षांच्या वनवासासाठी वनात जाताना, वाटेत ते त्यांचे मित्र निषादराज ह्यांच्या राज्यातून जातात, तेव्हा निषादराज त्यांना आपल्या राज्यात राहण्याचे आमंत्रण देतात, पण भगवान श्री राम नम्रपणे नकार देतात. जेव्हा भोजन आणि आदरातिथ्याचा प्रश्न येतो तेव्हा भगवान श्रीराम स्पष्ट शब्दात सांगतात की आपल्याला १४ वर्षे एका ऋषी सारखे, एकाद्या भिक्षूच्या वेषात राहावे लागेल (ऋषी नेहमीच सात्विक अन्न खातात). म्हणून, हे ऐकून, मित्र निषादराजच्या राज्यातही, ते कंदमुळे आणि फळे ह्यांचे सेवन करतात आणि पानांच्या आणि झुडपांच्या गादीवर विसावतात.
अशाप्रकारे श्री रामाच्या जीवनातील प्रत्येक प्रवासात आपण त्यांना सात्विक आहार घेताना पाहतो. पण जे लोक रामाचा तिरस्कार करतात, ते केवळ रामासारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी विष ओकतात, त्यांच्यात उणीवा आणि दोष शोधतात जेणेकरून त्यांचा स्वार्थ साधता येईल. रामाचे जीवन समजून घेण्यासाठी रामायण हा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे, त्याचा अभ्यास केल्यावर समजते की राम हे निर्भय आणि शौर्याचे निदर्शक आहेत. तर रामायण शिकवते की सामान्य माणसाप्रमाणे जेव्हा भाऊ लक्ष्मण बेशुद्ध होतो तेव्हा श्री रामाच्या डोळ्यातून ही अश्रू येतात.
जर राम शाकाहारी होते तर त्यानी शिकार का केली?
एक राजा, प्रतिष्ठित पुरुष असण्याबरोबरच, श्री राम क्षत्रिय देखील होते, त्यांनी आपल्या शौर्य आणि उत्कृष्ट धनुर्विद्या कौशल्यामुळे आपल्या हयातीत अनेक मोठ्या राक्षसांना मारले. श्री रामाच्या शौर्याचे अनेक किस्से आणि पुरावे रामायणात स्पष्टपणे पाहायला मिळतात, आता प्रश्न असा आहे की ते शाकाहारी होते, मग त्याला हरीण, वाघ यांसारख्या वन्य प्राण्यांना मारण्याची काय गरज होती?
तर याचे उत्तर असे की खेळात किंवा रणांगणात जिंकण्यासाठी आधी कठोर सराव करावा लागतो. आणि शिकार हा क्षत्रियांचा व्यायाम! जेणेकरून बलवान प्राणी नष्ट होऊ शकतील!
त्यामुळे आजच्या काळात देखील डॉक्टरला ज्याप्रमाणे बेडूक, उंदीर इत्यादी प्राण्यांची शारीरिक रचना समजून घेऊन त्यांच्या शरीराचे विच्छेदन करून तो एक उत्तम डॉक्टर बनून रुग्णांवर यशस्वी उपचार करू शकतो. याचा अर्थ डॉक्टरांनी मांसाहार करावा असा अजिबात नाही. ही त्याची सक्ती आहे, एक प्रक्रिया जी त्याचे ध्येय साध्य करण्यात मदत करते.
त्याचप्रमाणे, श्री राम स्वतःच्या आनंदासाठी नाही तर राक्षसांना मारण्यासाठी शिकार करत असत, ज्यासाठी अथक परिश्रम आणि सावधगिरीची आवश्यकता असते. कल्पना करा की हरीण मारण्यासाठी किती चपळता, संयम आणि कौशल्य आवश्यक असेल; त्याची शिकार करणे व्यर्थ नाही. म्हणून जे लोक म्हणतात की श्री राम शिकार का करत असतील, त्यांनी समजून घेतले पाहिजे की प्राचीन काळी शिकार हा युद्धभूमीत शत्रूंना मारण्याचा एक उत्कृष्ट सराव मानला जात असे.
पण ज्यांनी मांस चाखले आहे त्यांना हे समजणे कठीण जाईल आणि ते असे निर्थक विरोध करत राहतील. पण यामुळे रामाचे काहीही नुकसान होणार नाही, तर त्यांचे स्वतःचेच नुकसान होणार आहे!
तर मित्रांनो, हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला नक्की समजले असेलच की श्री राम मांसाहारी होते की नाही? आशा आहे की, हा लेख वाचल्यानंतर, आपण श्री रामाचे चरित्र समजून घेऊ आणि त्याला आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू, मला आशा आहे की हा लेख आपल्यासाठी फायदेशीर ठरेल आणि आपण तो नक्कीच शेअर कराल.
जय श्रीराम!