भाजप आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन

Team Moonfires
पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक

विद्यमान आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देता देता पुणे येथे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या तिकीटावर विधिमंडळात प्रतिनिधीत्व करत होत्या. त्यांच्यावर पुणे येथील गॅलेक्सी केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरुवातीपासूनच त्यांची नाळ भाजपशी जोडली गेली होती. केवळ पक्षावरील निष्ठा आणि प्रेमापोटी त्या व्हिलचलचेअरवर बसून पुणे ते मुंबई असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करत राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीस हजर राहिल्या होत्या.

मुक्ता टिळक या पहिल्यांदा 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेल्या. तत्पूर्वी त्या पुण्याच्या महापौरही होत्या. महापौर पादवर असताना त्यांच्या कार्यकाळात पुण्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधानसभेवर संधी दिली. पक्षाने दिलेली संधी घेत त्यांनी कसबा मतदारसंघातून विजय मिळवला. कसबा मतदारसंघ हा गिरीश बापट यांचा बालेकिल्ला समजला जायचा. याच मतदारसंघातून त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. पण, आमदार म्हणून कारकीर्दी नावारुपाला येण्यापूर्वीच त्यांना कर्करोगाने ग्रासले.

मुक्ता टिळक यांनी 2002 साली पहिली निवडणूक लढवली होती. 2002 पासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या आता आमदार झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीमध्ये त्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला होता. सर्वाधिक मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचा मोठा गौरवही करण्यात आला होता. पुण्याच्या राजकारणात आल्यापासून त्यांनी महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले होते.

पुण्याच्या महापालिकेमध्ये त्यांची कामगिरी श्रेष्ठ ठरल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कामामुळे आमदारकीवर आपले नाव कोरले होते. मुक्ता टिळक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली होती. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं होते त्यानंतर त्यांनी एमबीएही केले होते.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर पुण्याबरोबरच इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  भाजप नेत्यांनी त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच आमच्या पक्षाचीही मोठी हानी झाली असल्याची भावना भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी आपल्या कामगिरीमुळे वेगळा ठसा उमटविला होता.

 


मुलांचे लहानपणाचे सामान्य आजार आणि उपचार

The short URL of the present article is: https://moonfires.com/mblc
Share This Article
Leave a Comment