प्रतापगडावरील अफजल खान कबरी जवळील अनिधिकृक्त बांधकाम व उद्दतीकरण थांबवा, पाडावे म्हणून हिंदु एकता आंदोलन पक्ष व हिंदुत्ववादी संघटना सातत्याने पाठपुरावा,आंदोलने करीत होते,महाराष्ट्र सरकारने मागणी मान्य करून हे अतिक्रमण पाडण्यात आले.
१९८० ते ८५ दरम्यान, या कबरीवर अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली. तिथे उरूसही भरवण्यात आला होता. त्यानंतर या कबरीचं दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती. तसंच या ठिकाणी वनविभागाच्या जागी काही खोल्या बांधण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा आरोप आहे. या खोल्यांमध्ये १९९३ च्या बॉम्बस्फोटातले आरोपी राहत असल्याचाही आरोप केला जात होता.
प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यावरून अनेकदा आंदोलने ही झाले. न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. त्यामुळे या कबड्डीच्या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त तैनात असतो. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती.
१० नोव्हेंबर १६५९ या तारखेप्रमाणे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. आज या ऐतिहासिक घटनेला ३६३ वर्षे पूर्ण होत असतानाच शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आज प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखान याच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यास सुरवात केली आहे.
यासाठी या परिसरात १४४ कलम लागू केले असून कोणालाही तेथे जाण्यास परवानगी दिली जात नाही. ही कारवाई चोख पोलिस बंदोबस्तात सु्रू असून त्यासाठी चार जिल्ह्यातील दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.
समाज माध्यमावर लोकांच्या प्रतिक्रिया
#Thread : शिवराय, अफझल खान आणि कबरीची सत्यता
इतिहासाचे विकृतीकरण करून समाजात फूट पाडायचे काम गेली अनेक वर्षे ब्रिगेड सारख्या संस्था करत आहेत आणि या संस्थांचे अघोषित प्रवक्ते म्हणून @ashish_jadhao यांच्यासारखे पत्रकार काम करत आहेत हे आजपर्यंत अनेक वेळेला सिद्ध झालं आहे. 1/35 pic.twitter.com/RsCIJTKebO
— Malhar Pandey (@malhar_pandey) May 19, 2022
अतिक्रमण हटवले. 👏👏
श्री #Devendrafadnvis आणि #EknathShinde ह्यांचे मनःपूर्वक आभार. Glory of #Pratapgadh restored. #माझ्या_शिवबा_र #Theme_pic_India #myclick pic.twitter.com/meqJntIUGE
— Omkar's Views (@omkarthatte) November 10, 2022
१० नोव्हेंबर इ.स. १६५९
न्यायाचा अन्यायावर,
धर्माचा अधर्मावर,
देवाचा असुरावर,
स्वकीयांचा परकीय जुलमांवर,
युक्तीचा ताकदीवर,
आणि शिवरायांचा अफझलवर विजय म्हणजेच
" #शिवप्रताप_दिन " pic.twitter.com/Nx5kLLUVvB
— The Lion King 🤺🥇 (@LioNKinG_RS) November 10, 2022
अफझल खान कबरी भोवतीचं वादग्रस्त बांधकाम पाडणं सुरु…
आज शिवप्रताप दिन…
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल्याला वाघनख्यानी फाडला आणि आज जेसीबीच्या नख्यानी बेकायदेशीर बांधकाम तोडणार….
जय जिजाऊ🚩🙏जय शिवराय🙏🚩
— SAMEER BHOSALE -समीर भोसले (@bhosalesameer44) November 10, 2022
का केली कारवाई अफजल खान कबरी च्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामांवर..?
तर पहिले कारण ती सात बाय दहा असलेली कबर ही दोन मजली दर्ग्यात झाली होती..
दूसरे कारण अफजल नवसाला पावतो म्हणून तिथल्याच काही धर्मांध लोकांनी तिथे केलेले पीर करण…
+1
— विकास भानुदासराव देशपांडे…🇮🇳 (@mevikasdesh) November 10, 2022