संभाजी भिडे गुरुजी देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्ताची पिढी घडवण्याचा ध्यास घेऊन गेली 6 दशके त्यासाठी अहोरात्र झटणारे, दुर्गा माता दौड च्या माध्यमातून लाखों तरूणांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची ओळख करून देऊन त्यांना राष्ट्र कार्यासाठी प्रवृत्त करणारे तपस्वी आहेत.
संभाजी भिडे गुरूजी जीवन परिचय
नाव | श्री संभाजी भिडे गुरुजी |
जन्म | 10 जून 1933 |
जन्म ठिकाण | सबनीस वाडी, सातारा |
शिक्षण | M. Sc.(भौतिक शास्त्र) Gold Medalist |
संघटना | श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान |
कार्य | श्री. शिवाजी महाराज व श्री. संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या हिंदवी स्वराजाच्या मार्गावर चालणारी आणि देव, देश, धर्म यांसाठी जगणारी शिवपाईकांची पिढी घडवणे. |
भिडे गुरुजींचा जन्म सातारा येथील सबनीस वाडी येथे 10 जून 1933 साली झाला. म्हणजेच आज त्यांचे वे 90 वर्ष आहे. ते उच्च शिक्षित असून त्यांच शिक्षण M.Sc.Physics अस असून ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. ते काही वर्ष पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक सुद्धा राहिलेले आहेत. नंतर काही वर्ष ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे प्रचारक म्हणून काम करत होते. परंतु काही गोष्टी न पटल्यामुळे 1984 साली त्यांनी ‘श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संघटना स्थापन केली.
संभाजी भिडे गुरुजी यांचे कार्य
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या हिंदवी स्वराजाच्या मार्गावर चालणारी आणि देव, देश, धर्म यांसाठी जगणारी शिवपाईकांची पिढी घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळ कार्यरत.
भिडे गुरुजी म्हणतात, “जगावे कसे ते शिवरायांकडून शिकावं आणि मरावे कसे ते शंभूराजांकडून शिकावे. हिंदूंना राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, लोकशाही सकट टिकायचं असेल, स्वातंत्र्यासकट टिकायचे असेल, परंपरेसकट टिकायचे असेल आणि विश्वात मान सन्मानाचं मातृभूमीला स्थान द्यायचं असेल तर जशी अण्वस्त्र, अणुबॉम्ब, लोकसंख्या सर्व प्रकारची प्रगती आवश्यक आहे जसा देहातला प्राण तसा ‘श्री शिवाजी – श्री संभाजी’ मंत्र अत्यंत आवश्यक आहे !”
भिडे गुरुजींनी लाखोंच्या संख्येने धारकरी उभे केले आहेत. भिडे गुरुजींच्या प्रेरणेने १९९२ पासून रायगडावरील शिवछत्रपतींच्या मुर्तींची आणि समाधीची दररोज पुजा चालू केली. आजतागायत दररोज स्वखर्चाने शिवप्रतिष्ठानचे धारकरी रायगडावर शिवछ्त्रपतींची पूजा करत आहेत.
दुर्गामाता दौड
दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून दुर्गा माता दौड चे आयोजन केले जाते. हजारो धारकऱ्यांच्या सोबतीने आपल्या इतिहासाचं जागर करीत व आपल्या राष्ट्रपुरुषांचा जयजयकार करीत ही दौड गेल्या 35 वर्षांपासून अखंड सुरू आहे. आपल्या देशातील तरुणांमध्ये देश आणि धर्मनिष्ठा जागी व्हावी, त्यांना देव देश आणि धर्माच्या कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी या साठी आई भवानीचा जयघोष करीत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतो संभाजी महाराज आणि आपल्या असंख्य मावळ्यांचा जयघोष करीत ही दुर्गामाता दौड संपन्न होते.
राहणीमान
श्री भिडे गुरुजी यांचे जीवन हे अत्यंत साधे असून ते फक्त सदरा व धोतर हेच वस्त्र वापरतात. अत्यंत साध्या अशा 10 X 10 च्या खोलीत ते राहतात. तसेच शक्यतो सायकल व बस ट्रेन नेच प्रवास करतात. भूमीला चपलांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते अनवाणीच फिरतात.आजही इतक्या वायमध्ये ते शेकडो धारकर्यासोबत रोज पहाटे 150 सूर्यनमस्कार व 150 जोर आणि 150 बैठका घालतात.
संपत्ती
तस म्हणायला गेल तर भिडे गुरुजी हे सातारा मधील वारूगड किल्ल्याचे वंश परंपरागत सबनीस आहेत व त्या किल्ल्याखाली त्यांची शेकडो एकर जमीन आहे व पुण्यात नोकरीला असताना आईच्या नावाने घेतलेला कोट्यावधी किमतीचा भूखण्ड आहे. परंतु गुरुजींनी आपल संपूर्ण अस्तित्व आणि आयुष्य देव देश धर्म कार्यासाठी वाहून घेतेलेल आहे.
सध्या तरी त्यांची संपत्ती – एक धोतर – सदरा-टोपी अंगावर व एक दोरीवर, एक सतरंजी, 10 X 10 ची एक खोली, भेट मिळालेली पुस्तके आणि एक हाकेवर धावून येण्यास सिध्द्ध असलेले 10 लाख राष्ट्रप्रेमी धर्मनिष्ठ निर्व्यसनी तरुण एवढीच आहे.
उच्च विद्याविभूषित असून अत्यंत तल्लख अशी स्मरणशक्ती आणि लाखोंच्या गर्दीला एका क्षणात स्तिमित करण्याचे सामर्थ्य असलेली अमोघ वक्तृत्व शक्ती लाभलेले आदरणीय श्री संभाजी भिडे गुरुजी या महान व्यक्तिमत्वाची ही थोड्यात ओळख.