यंदाचा उन्हाळा महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आय.एम.डी.) सोमवारी वर्तविला.
‘एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामात महाराष्ट्रासह देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा जास्त असू शकतात’, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
ही बातमी नुकतीच माझ्या वाचनात आली. दरवर्षी उन्हाळ्यात माझ्याकडे उष्माघाताचे शेकडो पेशंट्स येतात व दरवर्षी ही संख्या वाढतानाच दिसते. उष्माघात हा काही अनुवंशिक किंवा संसर्गजन्य आजार नाही त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टी केल्याने उष्माघात टाळता येतो परंतु साध्या सोप्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने उष्माघात झाल्यास उष्माघाताने काही जणांना आपला जीवही गमवावा लागतो.
म्हणून आजचा लेखन प्रपंच उष्माघात या विषयावर !
वाढते तापमान आणि आरोग्याची काळजी
उष्माघाताचा त्रास कोणाला अधिक होऊ शकतो?
☀️ उन्हात जास्त वेळ थांबल्यास कोणालाही त्रास होऊ शकतो, परंतु पुढील व्यक्तींना धोका जास्त आहे
1️⃣ लहान मुले
2️⃣ वृद्ध व्यक्ती
3️⃣ आजारी रुग्ण
4️⃣ ॲथलीट्स (खेळाडू)
5️⃣ लग्नाच्या वरातीत नाचणारे
6️⃣ मजूर, शेतकरी व उन्हात काम करणारे कष्टकरी
काय त्रास होऊ शकतो ?
1️⃣ Heat Edema (उष्णतेमुळे सूज)
🖐️🦶 हातापायांना थोडी सूज
2️⃣ Heat Cramp (गोळे येणे)
🦵⚡ पायात गोळे, हातपाय दुखणे
3️⃣ Heat Syncope (चक्कर येणे)
😵💫 उन्हात खूप वेळ काम केल्याने
🚶♂️ उभं राहिल्यावर
🪑 अचानक उठल्यावर
4️⃣ Heat Exhaustion (थकवा)
🤕 डोके दुखणे
😩 थकवा, अशक्तपणा
😖 अस्वस्थ वाटणे
🌡️ शरीराचे तापमान 102°F पेक्षा कमी
5️⃣ Heat Stroke (उष्माघात)
🌡️ शरीराचे तापमान 104 डिग्री फॅरेनाईट पेक्षा जास्त असते
🌫️👀 दृष्टी अंधुक होते
🌀🗣️ असंबद्ध बडबड करणे
😵 भान हरपणे
🔄 चक्कर येणे
⚖️❌ तोल जाणे
❤️🔥 हृदयाची गती खूप जास्त होणे
💨🌬️ श्वासाची गती जास्त होणे
🤮🤢 उलटी आणि मळमळ
📉🩸 रक्तदाब कमी होणे
⚡ फिट येणे
🗨️… बोलणे अडखळणे
🧖♂️❌ त्वचा एकदम शुष्क होणे
🪫 खूप अशक्तपणा येणे
उन्हाळ्यातील इतर त्रास:
त्वचाविकार (उदा. घामोळ्या, पुरळ)
जुनाट आजार बळावणे (उदा. दमा, मधुमेह)
काय काळजी घ्यावी?
✅ कडक उन्हात जाणे टाळा
✅ सकाळी 11 नंतर आणि संध्याकाळी 4 पर्यंत घराबाहेर पडू नका
✅ सैलसर, फिकट रंगाचे कपडे घाला
✅ टोपी/छत्री वापरा, हातपाय डोके झाका
✅ शक्य असल्यास एसी असलेली चारचाकी वापरा
✅ पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी, फळांचे रस प्या (अति करू नका)
✅ Dehydration टाळा
✅ मद्यपान आणि धूम्रपान टाळा
✅ उन्हातून आल्यावर थंड पाण्याने अंघोळ करा
✅ अस्वस्थ वाटल्यास सावलीत जाऊन, अंग बर्फाने पुसा व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
✅ मानेखाली, काखांमध्ये व मांड्यांमध्ये बर्फ ठेवणे फायदेशीर
⚠️ उपचार नेहमी डॉक्टरांच्या देखरेखी खाली घ्या.
✅ प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय!
डॉ. संजय संघवी, कन्सल्टिंग फिजिशियन, धुळे
खूप सोप्या भाषेत पूर्ण माहिती मिळाली आहे. धन्यवाद डॉक्टर.