श्लोकमय संस्कृत सुभाषिते हे संस्कृत भाषेचे खास वैशिष्ट्य असून हा प्रकार फक्त संस्कृतमध्येच दिसून येतो. सुभाषितांमध्ये बऱ्याच वर्षांचे शहाणपण आणि अनुभव यांचा संगम झालेला आढळतो. सुभाषितांमुळे माणसाचे चारित्र्य घडते, त्याला माणूसपण प्राप्त होते, जगात कसे वागावे याचे ज्ञान मिळते.
शांतिपाठ
ॐ सह नाववतु सहनौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।
परमेश्वर) आपणा दोघांचे एकत्र रक्षण करो, आपण दोघे एकत्र भोजन करू (आमचे पोषण होऊ दे) , एकत्र पराक्रम करू (सर्व शक्तीनिशी काम करू), आपले शिक्षण प्रकाशमान होऊ दे (आपल्याला ज्ञानाचे तेज प्राप्त होऊ दे), एकमेकांचा कधीही द्वेष करणार नाही. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक शांति प्रस्थापित होऊ दे. (मनात, जगात आणि दैवी शक्तींमध्ये).
मंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः॥
There is no alphabet that is not a mantra, no plant that is not medicinal |
There is no person unworthy, what is lacking is a ‘FACILITATOR’ ||
मंत्र नाही असे अक्षर नसते, औषध नाही असे झाडाचे मूळ नसते, अयोग्य असा माणूस नसते,, फक्त योजकाची कमतरता असते.
जगातल्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग असतो, मात्र ते समजून घेऊन तिचा उपयोग करून घेणारा मात्र विरळा असतो.
विद्यार्थी सेवकः पान्थः क्षुधार्तो भयकातरः।
भाण्डारी प्रतिहारी च सप्तसुप्तान् प्रबोधयेत्।। (चाणक्य नीति शास्त्र)
(It is considered a sin to wake up one from sleep. However it is) alright to wake up seven sleeping persons, a student, servant, traveler, hungry person, person struck with fear, cook and a watchman.
(एरवी झोपलेल्या माणसाला उठवू नये, ते पाप आहे, पण) विद्यार्थी, नोकर, प्रवासी, भुकेलेला, घाबरलेला, स्वैपाकी आणि राखणदार या सात झोपलेल्यांना (आवश्यक असेल तर) झोंपेतून उठवायला हरकत नाही.
विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृतं अमेध्यादपि कांचनम्।।
Nectar is acceptable even if it is found in poison, Learn good saying (subhashita) even from children,Good character / qualities must be emulated even from enemies and accept gold even if it is found in a dirty place
विषामधूनसुद्धा निघाले असले तरी ते अमृत, लहान मुलांकडून ऐकलेली चांगली वचने, शत्रूमधले सद्गुण आणि घाणीमधले (सुद्धा) सोने या गोष्टी घेण्यासारख्या असतात.
चाणक्य नीतिदर्पण
सिंहादेकं बकादेकं शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात्।
वायसात्पञ्च शिक्षेच्च षट् शुनस्त्रीणि गर्दभात्।।४३।।
his is first among set of 7 shlokas from Chanakya Nitidarpan (अ.६). Chanakya take example of 6 birds/animals to pinpoint their virtues. Virtues of each will follow in Subhashits of next 6 days).
Learn one from a lion, one from crane and four from a cock. Learn five from a crow, six from a dog and three from a donkey.
सिंह :- लहान असो वा मोठे, कोणतेही कार्य करायची इच्छा माणसाला असेल ते काम करायला सुरुवात केल्यापासून ते पूर्ण करण्यासाठी त्याने सिंहाप्रमाणे त्याच्या मागे लागून प्रयत्न करत रहायला पाहिजे.
इन्द्रियाणि च संयम्य बकवत्पण्डितो नरः।
देशकालबलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत् ।।९।।
A wise man should perform his duties, having control over his senses and knowing place, time and strength like a Crane.
बगळ्याप्रमाणे आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून आणि देश, वेळ व बळ समजून घेऊन आपली सर्व कामे (कर्तव्ये ) साध्य करावीत.
नमन्ति फलिनो वृक्षाः नमन्ति गुणिनो जनाः।
शुष्ककाष्टश्च मूर्खाश्च न नमन्ति कदाचन।।
Trees full with fruits bend, ( the same way) good people are modest (namra) towards others. But dry wood and a fool never bends ( do not show respect to others)
फळांनी लगडलेला वृक्ष (त्याच्या फांद्या) खाली झुकतो. गुणवान लोक नम्रतेने वागतात, कोरडे लाकूड आणि मूर्ख लोक मात्र कधीच वाकत नाहीत.
अपूर्वः कोपि कोशोयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ।।
O Goddess Saraswati, your this treasure is unique in nature. It increases when it is spent and gets reduces, if it is hoarded (and not shared with others).
हे देवी शारदे, तुझा (विद्यांचा) खजिना अपूर्व आहे, खर्च करण्याने त्यात भर पडते आणि साठवून ठेवण्याने त्यात घट होते.
आपल्याकडे असलेली विद्या इतरांना देत असतांना ती अधिक पक्की होते आणि कुणालाही न देता आपल्याजवळच राखून ठेवली तर ती विस्मरणात जाऊ शकते.