चिमण्या आणि ग्रेट चीनी दुष्काळ – ग्रेट चीनी दुष्काळ हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (PRC) मध्ये 1959 ते 1961 दरम्यान आलेला दुष्काळ होता. हा सर्वांत भयंकर दुष्काळ मानला जातो. मानवी इतिहासातील सर्वात मोठी मानवनिर्मित आपत्ती , ज्यात उपासमारीने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लाखो (15 ते 55 दशलक्ष) मध्ये आहे.
जागतिक चिमणी दिवस
आज जागतिक चिमणी दिवस आहे. आज आपल्याला चिमण्या जवळपास नामशेष झाल्या आहे. चीन मधील माओत्से तुंग (Mao Zedong) नावाच्या एका नेत्याने देशात असणाऱ्या सर्व चिमण्यानं मारण्याचा हुकूम जारी केला होता. हा आदेश मिळताच लोकांनी चिमण्यांना मारायला सुरूवातही केली होती. याचे कारण असे होते की चिमण्या दाणे खातात त्यानं देशातील धान्य कमी होऊ लागले होते व त्यासाठी चिमण्यांना मारण्याचा हुकूम त्यानं दिला होता. एक अन् दाणा हा फक्त इथल्या माणसांसाठीच असावा या स्वार्थी भावनेतून नैसर्गिकाच्या नियमाच्या विरूद्ध जात दिलेला हा आदेश देणं नंतर चीनला बरंच महागातही पडले.
चिमण्यांची कत्तल
आदेशानुसार, चिमण्यांना अक्षरक्ष: गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यांची घरटी पाडली त्यानंतर त्यांची अंडीही फोडली. त्यांचा पाठलाग करण्यात आला आणि त्या मरेपर्यंत त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. माओत्से तुंग यांनी 1958 मध्ये हे कॅपेंन सुरू केले होते. याचे नावं होतं फोर पेस्ट्स कॅपेंन (Four Pests Campaign). यातून माश्या, डास, उंदीर आणि चिमण्या यांना मारायला सुरूवात केली. यांच्यामुळे देशात अनेक तऱ्हेचे नुकसान होते आहे म्हणून त्यांना मारायचे अभियान चीनच्या सरकारनं सुरूवात केले होते. या मोहिमेत ६०० मिलिअन चिमण्या मारल्या गेल्या होत्या.
चिमण्या आणि ग्रेट चीनी दुष्काळ
परिणाम
मात्र हि मोहीम राबवताना त्यांना हे लक्षात आले नाही कि याचे परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागणार आहेत. लक्षात आले की पिकांच्या शेतात कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामागे साधे कारण होते कि, उपद्रवी कीटकांना भक्ष्य करणाऱ्या चिमण्या तर चीनने मारून टाकल्या त्यामुळे तेथील शेतीवर टोळधाडांचे संकट आले होते. या टोळधाडांची शिकार करणाऱ्या चिमण्याच अस्तित्वात नव्हत्या.
त्यामुळे या काळात इतका दुष्काळ पडला की याची भरपाई करणंही त्याला कठीण गेलं. माओत्से तुंगनं हा विचार कधीच केला नाही की यामुळे नैसर्गितक फूड सायकल बिघडू शकते. परंतु याचा परिणाम उलटा चीनवरच झाला. चिमण्या या फक्त दाणेच नाही तर कीटकही खायच्या. धान्य खराब होऊ लागले आणि घरात धान्य नसल्यानं लोकं मरू लागले, अशी एक माहिती कळते. असं म्हणतात की, हा परिणाम पाहून माओत्से तुंगनं हा आदेश मागे घेतला.
ग्रेट चीनी दुष्काळ
या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील धान्य उत्पादन कोलमडले आणि मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. लोक खाण्यासाठी गोष्टी संपल्या आणि लाखो उपाशी राहिले. लोकसंख्या वाढत होती आणि दुसरीकडे दुष्काळ देखील. आणि मग लोकांनी त्यांच्या मार्गात जे जे येईल ते ते सर्व काही खाल्ले. या दुष्काळात मृत्यूची अधिकृत संख्या १५ दशलक्ष होती चीन सरकारकडून जाहीर झाली होती. पण त्याच्या पुढच्या तीन वर्षांत, देशावर पर्यावरणीय संकट आले आणि चीन आर्थिक संकटामध्येहि अडकला आणि या दुष्काळात उपासमारीमुळे ४५ दशलक्ष लोक मरण पावले असे विविध माध्यमातून व्यक्त झाले आहे.