छत्रपति शंभुराजेंची राजमुद्रा
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसे विनी लेखा वर्तते कस्य नो परि।।
संभाजीराजे राज्याभिषेक दिन
छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक आजच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. छत्रपती संभाजी हे देखील पिता छत्रपती शिवाजींप्रमाणेच शौर्याचे आणि साहस चे प्रतीक होते. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत युद्धभूमीवर राहून छत्रपती संभाजी युद्धकलेत तसेच मुत्सद्देगिरीत पारंगत झाले होते. यामुळेच छत्रपती संभाजीं महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबासोबत सुमारे 120 युद्धे केली आणि प्रत्येक युद्धात औरंगजेबाला पराभवाला सामोरे जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 16 जानेवारीला या दिवशी छत्रपती संभाजींमहाराजांचा राज्याभिषेक झाला.
छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर दुर्ग (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला. छत्रपती संभाजी राजे फक्त दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे संगोपन त्यांची आजी जिजाबाई यांनी केले. आजी जिजाबाईंनी संभाजी राजांमध्ये शौर्य आणि पराक्रमाची बीजे पेरली होती असे मानले जाते.
1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची तिसरी पत्नी सोयराबाई यांचा मुलगा राजाराम याला गादीवर बसवण्यात आले. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळ्यात कैद होते. राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी छत्रपती संभाजीराजे यांना मिळताच त्यांनी पन्हाळा किल्ल्याचा किल्लेदार मारून किल्ला ताब्यात घेतला. यानंतर 18 जून 1680 रोजी छत्रपती संभाजींनी रायगड किल्लाही ताब्यात घेतला.
16 जानेवारी 1681 रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राज्याभिषेक झाला. दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, मुघल सम्राट औरंगजेबाला वाटले की तो आता रायगड किल्ला सहज काबीज करेल. पण रायगडच्या सत्तेवर छत्रपती संभाजीमहाराज बसताच औरंगजेबाने जेव्हा रायगडावर हल्ला केला तेव्हा तो छत्रपती संभाजीकडून पराभूत झाला.
जीवनविशेष
-
- संभाजीराजेंचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
- वयाच्या दुस-या वर्षीच संभाजी यांच्या मातोश्रीचे निधन झाले. सईबाईच्या आकस्मिक निधनामुळे शंभुराजे लहानपणीच पोरके झाले.
- सईबाईच्या निधनानंतर जिजाऊंनी संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले.
- जिजाऊंसोबत पुण्याजवळील कापूरहोळ येथील धाराऊ नावाची महिला बाल संभाजीची सांभाळ केल्याचा उल्लेख आढळतो.
- पुढे सोयराबाईंनी सुद्धा संभाजीराजांचा सांभाळ केल्याचे इतिहासात उल्लेख आहे.
- रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेज यांचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.
- मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच समजले होते. वयाच्या नवव्या वर्षी 5 हजारांची मनसबदारी मिळाली होती.
- संभाजी महाराज केवळ 9 वर्षाचे असताना शिवरायांनी त्यांना आग्रा येथे नेले होते. शिवरायांची आग-यातील ऐतिहासिक सुटका झाल्यानंतर त्या बालवयात संभाजी महाराज एकटे आग्राहून संकटांचा सामना करत परतले होते. शिवरायांनी संभाजीला लहान वयातच मोहिमांवर नेत असल्याने त्यांना लढ्यांचा अनुभव आला.
वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी शंभूराजांना काव्य, लिखाणाची आवड लागली. याच काळात ते संस्कृत भाषेतील पंडित बनले. बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ तर इतर भाषांतचील तीन ग्रंथ संभाजी राजांनी 15 व्या वर्षीच लिहले. वयाच्या 18 व्या वर्षी ते युवराज बनले होते तर वयाच्या 23 व्या वर्षी छत्रपती बनले. पुढे मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि लवाजमा असूनही शंभुराजे औरंगजेबाच्या हातील लागत नव्हते. पण काही फितुरांनी दगा दिली आणि महाराजांना कैद झाली.