हळेबिडू मधील होयसलेश्वर मंदिर, कर्नाटकातील हसन जिल्ह्यात हलेबिडु (द्वारसमुद्र) वसलेले आहे. होयसला राज्याचा प्रमुख केतुमल्ला याने होयसलेश्वर मंदिर ११२१ मध्ये बांधले आणि त्याचे श्रेय त्याचा राजा विष्णुवर्धन आणि राणी शांतला देवी यांना दिले. त्यानंतरही ते पूर्ण होण्यास १०५ वर्षे लागल्याचे कळते. मंदिराच्या चबुतऱ्यावर उभे राहून पाहिल्यास त्याला समोरील टेकड्या दिसतील आणि मंदिराकडे तोंड करून दोन मोठे नंदी आणि दक्षिणेला गणेशमूर्ती दिसेल. ईस्वीसन १००० ते १४०० हा काळ त्या साम्राज्याचा सुवर्णकाल होता. या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची व अनेक वास्तुशिल्पांचे निर्माण सातत्याने होत राहिले. पृथ्वीवरील स्वर्गाची निर्मिती केले होयसाळ / होयसाल सामाज्याने. द्वारसमुद्र व बेल्लूर यांना पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणले जात असे. पुर्ण दख्खन (कर्नाटक) व तामिळनाडूवर होयसाल साम्राज्य पसरले होते.
राजा विष्णुवर्धन व त्यांचे साम्राज्य हे कलेचे महान संरक्षक होते. या काळातील सर्वात उल्लेखनीय कामगिरी स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रात आहे यात शंका नाही. त्या काळात दक्षिण भारतात भरभराट होत असलेल्या चैतन्यमय मंदिर परंपरेने वास्तुविशारद, शिल्पकार आणि इतर कारागीर यांनी उत्तम काम केले. तसेच ही मंडळी एका साम्राज्यातून दुस-या साम्राज्यात गेली आणि त्यामुळेच स्थापत्य आणि शिल्पकलेचे ज्ञान एका राजवंशातून दुसऱ्या राजवटीत सहज हस्तांतरित झाले.
असे मानले जाते की राणी शांतला देवी, सौंदर्य आणि वस्त्रकलेच्या जाणकार होत्या, त्या एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आणि संगीतकार देखील होत्या. शिल्पकारांना यातून प्रेरणा मिळाली आणि शिलाबालिक, नृत्य करणारी व्यक्तिरेखा, राणी शांतला देवी आणि तिच्या दरबारातील नृत्य साधिका ह्यांना एक प्रकारे मॉडेल समजून शिल्पकारांनी शिल्पे निर्माण केली. होयसळाच्या इतिहासात विष्णुवर्धनाच्या कारकिर्दीत शांतला देवीचा प्रशासन आणि धार्मिक सुधारणांमध्ये मोठा प्रभाव होता. त्या जैन धर्माच्या अनुयायी आणि श्री वैष्णव धर्माच्या राजा अनुयायी होत्या आणि संत रामानुज चार्यांचा प्रभाव होता.
१४ व्या शतकात, उत्तर भारतातून आलेल्या मलिक काफूर, मुघलांच्या आक्रमणामुळे हे वैभवशाली शहर उद्ध्वस्त झाले. या जागेची वारंवार तोडफोड करण्यात आली आणि लुटली गेली आणि ती उद्ध्वस्त झाली. म्हणून त्याचे नाव हैलेबिडु, म्हणजे “उध्वस्त शहर” असा आहे. मलिक काफुर व मोहंम्मद बीन तुगलक, यांनी या साम्राज्यावर आक्रमण केले, सर्वात आधी दिल्ली सुलतानाच्या आदेशाने मलिक काफुर ने १३११-१३१५ च्या आसपास होयसाळ / होयसाल सम्राजावर आक्रमण केले व शेकडो उंटावरून, सोने व दागिने या साम्राजातून घेऊन गेला पण जाताना त्याने द्वारसमुद्र जवळ जवळ नष्ट केले, मंदिरे पाडली, मुर्त्या नष्ट केल्या व शहर ध्वस्त केले. यानंतर काहीच वर्षानंतर मोहंम्मद बीन तुगलक ने आक्रमण केले व राहिलेले सर्व लुटून नेले व द्वारसमुद्र पूर्णतः: नष्ट केले, त्याच्या तावडीतून काहीच मंदिरे शिल्लक राहिली ती देखील भग्न अवस्थेत.
हळेबिडू मधील होयसलेश्वर मंदिर
या मंदिरांच्या बांधकामासाठी मोनोलिथिक सोपस्टोन किंवा क्लोरीटिक शिस्टचा वापर करण्यात आला. मंदिराच्या उत्तरेकडील देवाला शांतलेश्वर आणि दक्षिणेकडील देवाला होयसळेश्वर म्हणतात. मंदिराच्या भिंती हिंदू पौराणिक कथा, प्राणी, पक्षी आणि शिलाबालिकांच्या अंतहीन चित्रणांनी झाकलेल्या आहेत. तरीही शिल्पांच्या कोणत्याही दोन मुद्रा सारख्या नाहीत.
हळेबीडमधील शांतलेश्वर मंदिर
राजा विष्णुवर्धनाची राणी शांतला देवी यांच्या नंतर बांधले गेले. उत्तरेकडील शांतलेश्वराचे मंदिर चकाकणाऱ्या काळ्या मऊ पाषाणातील ताबूत सारखे मचाणावर उभे आहे – क्लोराईट शिस्टने विविध देव-देवता, प्राणी, पक्षी आणि नृत्य करणाऱ्या मुलींनी आच्छादलेले आहे. 20,000 पेक्षा जास्त मजुरांची कौशल्ये आवश्यक असलेले मंदिर बांधण्यासाठी 190 वर्षे लागली.
जवळच एक संग्रहालय आहे जे त्या वेळी वापरात असलेल्या १२व्या शतकातील शिल्पे आणि सोन्याची नाणी प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत. हळेबीडपासून एक किमी अंतरावर काळ्या दगडी खांबांसह जैन बस्ती असलेली बस्ती टेकडी आहे. होयसलेश्वर मंदिराजवळ 3 जैन मंदिरांचा समूह कोरलेली छत, अत्यंत पॉलिश केलेल्या काळ्या दगडी खांबांसाठी ही जैन मंदिरे प्रसिद्ध आहेत. पार्श्वनाथ स्वामी मंदिर हे सर्वात महत्वाचे आणि चांगले जतन केलेले आहे. ही मूर्ती 14 फूट उंच असून काळ्या दगडात कोरलेली असून तिच्या डोक्यावर 7 डोकी असलेला नाग आहे.
हैलेबिडु व बेल्लूर. १२ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या दोन प्राचीन शहरातील राहिलेले वैभव. तसे पाहता होयसाळ / होयसाल राजांनी आपल्या साम्राज्यात १५० च्या वर मंदिर निर्माण केलीत पण उल्लेखनीय व स्थापत्य कलेचा नमुना म्हणून हैलेबिडु व बेल्लूर हे महत्त्वाचे आहेत. मंदिरांची वैशिष्ट्य पुर्ण रचना व मांडणी वेगळ्या पद्घतीने केली गेली आहे. तीन द्वार असलेली व एकाच मंदिरात दोन गाभारे असलेल्या जुळ्या मंदिराची संकल्पना येथे राबवली गेली आहे.
हैलेबिडु येथील मंदिर हे एका तलावाच्या काठी उभारले गेलेले हे व पुर्ण पाषाणामध्ये निर्माण केले गेलेले हे मंदिर व त्याचे नाव आहे होयसळायेश्वर / होयसलायेश्वर मंदिर. राजघराण्यांचे प्रमुख मंदिर त्या राजघराण्याच्या नावानेच आजही ओळखले जाते. या मंदिराची ४-५ एकर परिसरामध्ये एक मुख्य जुळे मंदिर व आजूबाजूला सलग्न पण भारदस्त अशी ४-५ मंदिरे, समोर नंदी मंडप व (गर्भगृहाच्या समोर) विस्तृत तळे. अशी संरचना होती. आक्रमणानिमित्त प्रमुख मंदिर राहिले व बाकीची सलग्न मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली / केली केली. आता द्वारसमुद्र मध्ये फक्त होयसलायेश्वर मंदिर आहे, पण ते भव्य व दिव्य आहे.
होयसलायेश्वर मंदिर हे तीन टप्पात आहे. नजरेत भरतो तो पहिला भाग दर्शनी मंदिराचा. जसे जसे तुम्ही जवळ जाता तसे मंदिर निर्माण करताना वापरलेली कल्पकता समोर येत जाते. ५-६ फुटाच्या मंदिराचा पाया, पूर्णतः इंटर-लॉकिंग सिस्टम वापरलेला आहे. जर हे मंदिर वरून पाहिले तर त्यांची रचना स्टार (चांदणी) सारखी आहे. सरा टप्पा, बारा प्रकारचे लेअर (विभाग) असलेल्या भिंती. वेगवेगळ्या प्रकारे भिंती शिल्पे व नक्षी काम केलेले व अनेक पुराण कथा यांचे चित्रण याचा संगम म्हणजे मंदिराचे बाह्य रूप. सर्वात खालील विभागात, गज शक्तीचे प्रदर्शन, नंतर राज्य चिन्ह असलेल्या सिंहाचे व त्यांनंतर वेगळ वेगळ्या आपात्कालीन पद्घतीने नक्षी काम. त्याच्या वरच्या विभागात यक्ष, किन्नर, वाद्य वाजवणारे, नृत्यात मग्न असे नर्तकी व नर्तक यांची दर्शन. १० इंचाच्या आसपास उंची असलेल्या या विभागात, इतक्या बारकाईने कोरीव काम केले आहे की पाहताना दंग व्हावे व समोर पहात असलेले दृष्य आपल्या नजरे समोर घडत आहे असलेले नृत्य असावे असे भासते, अनेक छोट्या छोट्या गोष्टी, नर्तकीच्या पायातील पैंजण, ती च्या गळ्यातील दागिने व डोळे. कलेतून एखादं दृष्य जिवंत होते कसे या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते.
नंतरच्या सातव्या व आठव्या विभागामध्ये (लेअर) पुरातन कथा रेखाटलेल्या आहेत, ज्यामध्ये रामायण व महाभारत प्रामुख्याने आहेत. कर्ण वध, अभिमन्यू वध, युद्ध रचना, आयुधे, रथ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तसेच कृष्ण अवतारातील अनेक कथा येथे दिसतात, बाललीला कालिया मर्दन इत्यादी. प्रत्येक विभागाचे वैशिष्टे अधोरेखित करण्यामागचे कारण हे की त्यांनी जेव्हा मंदिर निर्माण सुरू केले तेव्हा त्यांना काय तयार करायचे आहे, याची स्पष्ट कल्पना होती, रामायणामध्ये महाभारत घुसत नाही अथवा महाभारतात इतर कथा. प्रमुख व महत्त्वपूर्ण कथा व त्यातील पात्र त्यांनी आधीच ठरवले होते, हे पाहताना लक्ष्यात येते. येथे काही गोष्टींचा संदर्भ तुम्हाला जोडावा लागतो, व ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या कथा पुर्ण माहिती असतील अथवा तो पार्ट, त्या कथेतील तो भाग स्पष्टपणे तुम्हाला समजला असेल. याच लेअर (विभागामध्ये ) ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते मला मिळाले. येथे तुम्हाला रावण कैलाश पर्वत उचलताना, कृष्ण – अर्जून अभिमन्यू च्या वधानंतर चर्चा करत असलेले, अर्जून व कर्णाचे भयंकर युध्द त्यांची अस्त्रे, शंकराचा दरबार, शंकराचे नटराज स्वरूप इत्यादी अनेक कथा पहावयास मिळतात. मुख्य लेअर (विभाग) मध्ये ३-४ फुट उंचीचे भित्तीशिल्प आहेत, ज्यामध्ये विष्णूची अनेक रूपे, अवतार, ब्रम्ह स्वरूप, शिव स्वरूप गणेश मूर्ती व इतर देवदेवता इत्यादी यांचे दर्शन घडते.
मुख्य लेअर (विभाग) मध्ये विष्णूचा मक्ता जास्त उठावदार दिसतो, अनेक शिल्पे त्याच्या अवताराची आहेत, वराह अवतारापासून, नरसिंह अवतार व राम अवतार सगळेच तेथे दिसतात, बम्हास्वरूप देखील तेथे कोरलेले आहे.
याच लेअर मध्ये, गणेश मुर्ती देखील आहे, पण त्याला प्रमुख द्वारावर स्थान नाही मिळालेले आहे, पण गणेश मूर्ती ही ब्रह्मा, विष्णू व महेश (शिव) याच्या बरोबरीने तेथे दिसते तसेच, इतर कुठल्या देवाची नाही पण एक ८-९ फुटी उंच गणेश मूर्ती त्याच प्रांगणातून मिळाली होती जी आधी प्रवेशद्वारासमोर होती. अतिशय रेखीव एका पाषाणातून घडवली गेलेली ही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. विष्णूच्या नरसिंह अवताराचा देखील येथे बोलबाला आहे, नरसिंह शिल्पे तर आहेतच, पण नरसिंह स्तंभ व नरसिंह कथा असलेला शिलालेख देखील येथे आहे, शक्यतो याचे कारण साम्राज्याचे प्रमुख चिन्ह सिंह हे होते. अनेक जागी सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत.
प्रवेशद्वारापासून काही फुट अंतरावर मंडप आहे, ज्या मंडपात भला मोठा नंदी आहे, भारतात जे अखंड शिळेतून तयार केलेले नंदी आहेत, व जे मी पाहिले आहेत त्यात सर्वात रेखीव असा हा नंदी आहे, तसेच हा भारतातील ४ अथवा पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच नंदी आहे. नंदीद्वारापासून प्रवेश केल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार व आता एक मंडप व त्याच्या समोर गाभारा आहे. मुख्य मंदिरात ५ फुटी उंच व जवळ जवळ ८-९ फुटी रुंदीचे शिवलिंग आहे ( आकार अंदाजे) वर मी लिहिल्याप्रमाणे हे जुळे मंदिर आहे, एकाबाजूला शिवलिंग व एका बाजूला मुर्ती असलेला गाभारा. असे दोन गाभारे आहेत. दोन्ही गाभार्या समोर नंदी आहे, व त्याच्या साठी पाषाण मंडप आहे, जुळे मंदिर हा शब्द देखील याच कारणामुळे वापरला जातो.