महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. ब्राह्मणांपासून तो धनगर रामोश्यांपर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात. तो अनेकांचे कुलदैवतही आहे, तसेच खालील खंडोबाची आरती सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस (चंपाषष्ठी), मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा मल्लारि-माहात्म्यम् ह्या संस्कृत ग्रंथात आहे.

खंडोबाची आरती
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥
श्री खंडेरायाची आरती
श्री खंडेरायाची आरती
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥
चंपाषष्ठी
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. पाहिल्या दिवसापासून सहा दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. याला देवदिवाळी असेही म्हणतात. प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पाखाळणी हा विधी झालेनंतर उत्सवमुर्तीना नवीन पोशाख परिधान करून बालद्वारी येथे घटस्थापना होते. श्री मल्हारी मार्तंड आणि मणी – मल्ल दैत्य यांचे सहा दिवस युद्ध झाले ते षडरात्र म्हणून साजरे केले जातात.
सहाव्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणी मल्ल दैत्यांचा संहार केला. मार्गशीर्ष शु. षष्ठी शनिवारी शततारका नक्षत्री देवलिंग रूपाने प्रकट झाले तोच हा चंपाषष्ठीचा दिवस ! या उत्सवावेळी समस्त पुजारी – सेवेकरी वर्गाकडून गडाला गडकोट मंदिर आवाराला विद्युत रोषणाई व दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम , महाप्रसादाचे आयोजन केले जाते. राज्यातील विविध भाविकांकडून मुख्य मंदिर, गाभारा पानाफुलांनी सजविण्यात येतो. त्यामुळे मार्तंड भैरवाची विविध रूपे भाविकांना पहावयास मिळतात.


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.