आरोग्य चांगले राहण्यासाठी हे करावे उपाय : चांगल्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करणे गरजेचे असते. योग्य आहार, व्यायाम, स्वच्छता, शांत झोप, मनोरंजन, व्यसनांना नकार आणि विश्रांती या चार बाबींचे पालन केल्यास निरोगी जीवन जगणे सहज शक्य असते. पोषकघटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा.
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय :
१. आहार : दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज या घटक तत्त्वांनी युक्त सकस आणि संतुलित ताजा आहार तुम्हाला मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. तुमचा आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम. उत्तम आरोग्यासाठी योग्य आणि संतुलित आणि सकस आहार घेणे महत्त्वाचं आहे.
कर्बोदके, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, पाणी आणि जीवनसत्त्वं हे अन्नघटकांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यानं त्याचा शरीराला आणि मनालाही फायदा होतो. व्यक्तीचं वय, लिंग, कामाचं स्वरूप आणि विशेष गरजांप्रमाणे प्रत्येकाचा संतुलित आहार हा वेगवेगळा असू शकतो.
२. स्वच्छता : आहार तयार करताना / घेतांना स्वच्छता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जेवण बनवतांना स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे हानिकारक रोग उदभवतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
शरीराची स्वच्छता ही आपोआप होत रहावी अशी यंत्रणा शरीरात सतत कार्यक्षम आणि कार्यमग्न असते. मलमूत्र विसर्जन, अश्रू, लाळ, त्वचेवरील मृत पेशींचं नष्ट होणं या सगळ्या क्रियांना अडथळा येणार नाही यासाठी शरीराची स्वच्छता आवश्यक असते.
३. व्यायाम : व्यायामामुळे व्यक्तीला आपला आरोग्यविषयक दर्जा उंचावता येतो. नियमित व सुयोग्य व्यायाम असल्यास निरोगी, दीर्घकालीन, सुदृढ आरोग्य लाभते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शारीरिक कष्टाची कामं, क्रियाशील दिनचर्या आणि मैदानी खेळांमुळे आरोग्य चांगलं राहतं. परंतू बैठ्या कार्यपद्धतीमुळे शारीरिक क्रियांचा समतोल बिघडतो. म्हणून रोज नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
४. करमणूक : मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. सुखी जीवनासाठी नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी ज्यात तुम्हाला आंनद मिळतो त्या गोष्टी करा.
५. विश्रांती : विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोघांचा सहसंबंध आहे. योग्यवेळी विश्रांती घेतल्याने तुम्ही उत्साही राहता. नियमित झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर जेव्हा थकते त्यावेळे योग्य विश्रांती घ्या.
६. शांत झोप : उत्तम आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आणि शांत झोप आवश्यक असते. दिवसभराच्या थकव्यामुळे निर्माण झालेल्या दूषित आणि विषारी पदार्थांची विल्हेवाट लावणं, शरीराची झीज भरून काढणं तसंच शरीराची वाढ तसंच शरीर पु्न्हा ताजंतवानं करणं या सगळ्या गोष्टी शांत झोपेमुळेच शक्य होतात. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने किमान 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक असतं. लहान मुलांनासुद्धा अधिक झोपेची गरज असते.
७. व्यसनांना ठेवा दूर : धुम्रपान, मद्यपान, मादक द्रव्य शरीराला अपायकारक असतात. या गोष्टींच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे आरोग्य आणि पोषण या दोन्ह गोष्टींवर वाईट परिणाम होतो आणि सामाजित स्वास्थ्यसुद्धा बिघडतं. चहा आणि कॉफी ह्याचं अति प्रमाण सेवन करणं हे व्यसनच आहे ह्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होण्याचा धोका असतो.
5 उपाय ज्याद्वारे तुमच्या मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मिळेल मुक्ती