छातीतील कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Moonfires
17 Views
Moonfires
4 Min Read
कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय
कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

छातीतील कफ

छातीतील कफ, सर्दी, खोकला ही हिवाळ्यात सामान्य समस्या आहे. त्याशिवाय हिवाळ्यात जास्त समस्या निर्माण होते, ती म्हणजे घसा आणि छातीत चिकट कफ तयार होतो. कफामुळे घशास त्रास होतोच; पण इतरही काही त्रास होत राहतात.

कफाच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आपण अनेक प्रकारची औषधे आणि सिरप यांचे सेवन करतो. काही वेळा आराम मिळतो; पण काही वेळा मात्र लवकर आराम मिळत नाही.

वाफ घ्यावी

कफची समस्या दूर करण्यासाठी, वाफ घेणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. वाफेची उष्णता घसा आणि नाकातून शरीरात गेल्यावर श्लेष्माचे विघटन होण्यास मदत होते, व लवकर आराम मिळतो. कफ झाल्यास तज्ञ लोकांना विचारुन दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घेतली तर लवकर फरक पडतो.

मध आणि लिंबू

हा एक आपण नियमित वापरात असलेला उपाय, एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळून प्यावे. त्यामुळे घशाला लगेच आराम मिळतो आणि कफ साठण्याची समस्या लवकर दूर होते. मधामध्ये जीवाणूरोधक आणि बुरशीरोधक गुण असतात हे आपल्याला माहिती आहेच, तसेच  लिंबामध्ये ‘सी’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे घशाला त्वरित आराम मिळतो.

काळी मिरी

काळी मिरी, ही  थोडी तिखट आणि कडूसर चवीची असते; पण वातदोष कमी करण्यात काळी मिरीचा फायदा होतो. त्यामुळे आयुर्वेदात काळी मिरी चमत्कारी औषध असल्याचे मानले जाते. त्यामुळे नक्की कफ कमी होतो. काळ्या मिरीमध्ये पाईपर लांगमाईन म्हणजेच ‘पीएल’ नावाचा रासायनिक घटक असतो. त्यामुळे शरीरात एन्झाइम्स तयार होण्यापासून रोखते.

शरीरात तयार होणारे एन्झाइम्स खोकला आणि त्याचा संसर्ग वाढवितात, जे कफ तयार होण्याचे कारण ठरते. रोज एक कप पाण्यात १८-२० मिरीचे दाणे उकळून त्यात मध टाकून प्यावे, हा उपाय देखील लवकर आराम देण्यास साहाय्य करतो.

पुदिन्याचे तेल

अनेक आरोग्य तज्ज्ञानुसार पुदिन्याचे तेल, हे छातीत साचलेला कफ काढून टाकण्यास नैसर्गिकरित्या मदत करते. गरम पाण्यात तेलाचे तेलाचे काही थेंब टाकून त्याची वाफ घ्यावी.

आलं (अद्रक)

यामध्ये अँटी-इफ्म्लेमेट्री गुण आहेत, जे अनुनासिक परिच्छेद साफ करतात. यामध्ये असलेले घटक शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास देखील मदत करतात. घशातील श्लेष्मा कमी करण्यासाठी आले किसून त्यात लिंबाचा रस मिसळा. याशिवाय आल्याचा चहा हा एक उत्तम पर्याय आहे.

दुसरा सोपा मार्ग, आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन त्यावर एक चिमूटभर मीठ / मध लावून, हा तुकडा दातांच्या खाली दाबून ठेवा. आल्याचा रस हळूहळू आत तोंडात जाऊ द्या. जवळपास 5 ते 7 मिनिटे ठेवून मग पाण्याने गुळण्या करा.

पाणी

कफ झाल्यास थोडं कोमट पाणी पीत राहावे. त्यामुळे घशात निर्माण होणाऱ्या कफाचे प्रमाण कमी होते. लिंबूूपाणी सारखे पेय पिऊन शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य ठेवू शकता, तसंच घसाही ओलसर राहण्यास मदत होते.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे

कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घशाला त्वरित आराम मिळतो. घशात जमा झालेला कफ निघून जाण्यास मदत होते. घशातील हानिकारक जीवाणू मरतात.

हळद

हलक्या कोमट पाण्यात एक चमचा हळद मिसळावी. हळदीत क्युरक्युमिन नावाचा घटक असतो, ज्यामध्ये जीवाणू प्रतिबंधक गुण असतात. त्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते व शरीरास त्यामुळे मदत होते.

हे ही वाचा :

आयुर्वेदिक उपाय
आयुर्वेदिक उपाय

कोरड्या हवामानात सर्दी आणि खोकला होऊ शकतो, ते टाळण्यासाठी हे 6 आयुर्वेदिक उपाय

 

The short URL of the present article is: https://moonfires.com/0gb2
Share This Article
Follow:
राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं। Founder Of Moonfires.com
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *