घरगुती उपाय – लहान मुलांना वारंवार सर्दी होणे हे खूप सामान्य आहे .लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नाजूक असते शिवाय सर्दी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सर्दी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये लहान मुले आल्यास त्यांना लगेच सर्दीची लागण होते. ऍलर्जी , बॅक्टरीयल इन्फेकशन, हवामानात किंवा पाण्यात झालेला बदल या कारणांमुळेही सर्दी होण्याची शक्यता असते. काही घरगुती उपाय ह्यावर उपयोगी आहेत. त्याची माहिती खाली दिली आहे.
सर्दी-खोकल्याचे २ प्रकार आहेत :
१. ओला
२. कोरडा
लहान बाळाला किंवा मुलांना सर्दी होण्या अगोदर २-३ दिवस त्याची लक्षणे दिसू लागतात , कणकणी जाणवते हलकासा तापही येऊ शकतो . अशी लक्षणे दिसताच या लेखामध्ये पुढे सांगितलेले उपाय केल्यास सर्दी लवकर आटोक्यात येण्यास मदत होते. सर्दी-पडशाचा संसर्ग अन्नातून होत नाही, तर तो हवेतून आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या स्पर्शातून होतो. थंड हवामानामुळे बाळांना संसर्ग होत नाही तथापि प्रजननासाठी ते चांगले वातावरण असते. तर, प्रथम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेहमी स्वच्छता राखा आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुवा.
काही घरगुती उपाय :
हळद
शतकानुशतके हळद औषध म्हणून वापरले जाते. आजही भारतीय पदार्थांमधील हा महत्वाचा घटक आहे. थोडीशी हळद गरम पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा, आणि बाळाच्या छाती, पोट आणि तळपायावर लावा. काही वेळानंतर धुवून टाका. हळद उष्ण असल्याने, हळदीची उष्णता, नाकातील चिकट पदार्थ पातळ करून, तो नाकातून बाहेर पडण्यास मदत होते.
मोहरीच्या कोमट तेलाचा मसाज
एक कप कोमट मोहरीच्या तेलात, २ लसूण पाकळ्या आणि काळे तीळ टाका. आणि त्याने बाळाचे हातापायांचे तळवे, छाती आणि पाठीला मसाज करा. जास्तीचे तेल मऊ कापडाने पुसून घ्या.
मध आणि लिंबाच्या रसाचे चाटण
चमचाभर लिंबूच्या रसामध्ये २ चमचे मध घालून कोमट पाण्यातून हे मिश्रण १ वर्षापेक्षा मोठ्या बाळाला द्यावे, नाक गळणे कमी येते.
दिवसातून २-३ वेळा ओव्याची किंवा पाण्याची वाफ बाळाला द्यावी
बाळाला सर्दी झाल्यास कफ बाहेर पडण्यासाठी दिवसातून २-३ वेळा वाफ देणे आवश्यक असते. हि वाफ ओव्याची किंवा पाण्याचीही देऊ शकता. मोठ्या मुलांसाठी पाण्यामध्ये थोडे विक्स व्हेपर रब टाकून त्याचीही वाफ दिली असता बंद नाक मोकळे होते आणि कफ बाहेर पडण्यास मदत होते. बाळाची सर्दी कमी येण्यासाठी शरीर उबदार राहणे / ठेवणे आवश्यक असते , अश्यावेळी विक्स व्हेपर रब उत्तम पर्याय असतो. लहान बाळासाठी बनलेले बेबी व्हेपर रब बाळाच्या छातीला , पाठीला , तळपायाला लावल्यास सर्दी पासून अराम मिळण्यास मदत होते.
गरम हळदीचे दूध
हळदीच्या दुधाला सुवर्णामृत मानले जाते . हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्यामुळे सर्दी सारखे इन्फेक्शन असल्यास लवकर आराम मिळतो. झोपण्यापूर्वी बाळाला १ कप हळदीचे दूध जरूर द्यावे.
हळद-गुळाची गोळी
गुळामध्ये थोडीशी हळद घालून त्याची गोळी सकाळी उठल्याबरोबर बाळाला चाखून खायला देऊ शकता, घास मोकळा होण्यास मदत होते.
६ महिन्यांपेक्षा लहान बाळाची या विशेष काळजी घ्यावी
जे बाळ फक्त आईचे दूध पिते आहे अश्या बाळाच्या बाबतीमध्ये बाळाला दूध देण्यापूर्वी थोडीसी वाफ द्यावी ज्यामुळे बंद झालेले नाक मोकळे होईल . त्याचप्रमाणे बाळाला दूध पाजत असताना नेहमीपेक्षा बाळाचे डोके थोडे वरती राहील याची काळजी घ्यावी. थोड्या थोड्या वेळानी बाळाला दूध देत राहावे, ज्यामुळे बाळाचे पोटही भरेल आणि डिहायड्रेशन होणार नाही.
छातीतील कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय