तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागले आहे हे कसे समजावे ? कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही फोनचा सतत वापर करत असाल किंवा काहीही कारण नसताना सतत तुम्हाला फोन वापरायची इच्छा होत असेल तर तुम्ही फोनच्या आहारी गेला आहात, मोबाईलचे व्यसन लागले आहे असे समजावे. सुरुवातील हे व्यसन अजिबात कळत नाही. पण ज्यावेळी तुम्ही त्याच्या आहारी जाता त्यानंतर तुम्हाला फोन मिळाला नाही तर तुमची सतत चिडचिड होऊ लागते, झोप लागत नाही, काहीही करायची इच्छा होत नाही अशी काही लक्षणे दिसू लागतात.
मोबाईलचा अति वापर वाईट किंवा चुकीच्या वापरामध्ये बदलू शकतो का ?
हो, नक्कीच जितके तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अधिक गुंताल तितका तुम्हाला त्याबद्दल अधिक कळू लागते. फोनचा वापर करताना नाहक इंटरनेटचा वापर वाढू लागतो. सेल्फी काढण्याचे वेड लागू लागते. मोबाईल वापरताना अनेक नको त्या गोष्टी पाहण्याची इच्छा होऊ लागतो. जर तुम्हालाही अशा काही सवयी लागल्या असतील तर तुम्ही मोबाईलचा अति वापर करणे किंवा इतरांना वापर करु देणे आताच थांबवा.
मोबाईल साधारण किती तासांसाठी वापरायला हवा ?
दिवसातून जास्तीत जास्त 4 तासांसाठी मोबाईलचा वापर व्हायला हवा. त्याहून अधिक वापर हा डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. कारण त्यामुळे निद्रानाश, सतत चिडचिडेपणा असा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी ते अनेकदा मुलांच्या हातात मोबाईल देतात. असे केल्याने मुलांना मोबाईलचे व्यसन तर लागतेच, शिवाय अनेक वेळा या व्यसनामुळे ते स्वतःचेही नुकसान करतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असे 5 उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुमच्या मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्ती मिळेल.
1. मोबाईलच्या अधिक वापरामुळे होणारे तोटे समजवून सांगा
अनेकदा आई-वडील मुलांना फोनचा जास्त वापर केल्यामुळे त्यांना फटकारतात, त्यामुळे त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना प्रेमाने त्याचे तोटे समजावून सांगितले पाहिजे. मोबाइलच्या अतिवापराने कानाप्रमाणे आपल्याला डोळ्याचेही वेगवेगळे आजार होऊ शकतात. चष्मा लागणे, कमी दिसणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे असे वेगवेगळे त्रास होऊ लागतात.
शिवाय सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठ दुखी, कंबर दुखी, स्थूलपणा येणे यासारखे आजार होतात. हे मुलांना समजवून सांगा. मुलांची सवय टोकाला जाईपर्यंत पालकांनी प्रतीक्षा करू नये. पालकांनी सुरुवातीपासून याची काळजी घेणे गरजेचे आहे
2. मुलांच्या स्क्रीन टाईमवर (ऑनलाइन क्रियाकलापांवर) लक्ष ठेवा
2. मुलांच्या स्क्रीन टाईमवर (ऑनलाइन क्रियाकलापांवर) लक्ष ठेवा
पालकांना सध्याच्या काळात मुलांच्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः डिजिटल युगात मुलं टीव्ही आणि मोबाईल समोर बराच वेळ (Screen Time of Children) घालवत आहेत. अनेक मुलं तासंतास स्क्रीनसमोर (Reduce children’s screen time) असतात. त्यामुळे त्यांना त्याचे व्यसन जडण्याची देखील भिती व्यक्त होते आहे. मुलांचा स्मार्टफोनचा वापर (children’s screen time tricks) पालकांसाठी चिंतेचं कारण बनलंय.
याचा परिणाम मुलांच्या वागण्यावर देखील होत आहे. टीव्ही बंद केली किंवा त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेतला तर मुलं चिडचिड करतात. पालकांनी आपल्या मुलांसाठी मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित करावी. मुलांच्या आरोग्यासाठी त्यांचा स्क्रीन टाइम मर्यादित असणे आवश्यक असते. तुमचं मुलं जर जास्त प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करत असेल तर त्याच्यावर ओरडू नका. त्याऐवजी त्याच्याशी प्रेमाणे बोला आणि स्कीन टाईम कमी करणे त्याच्यासाठी किती फायदेशीर आहे हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. यासोबतच मुलांच्या ऑनलाइन क्रियाकलापांवरही लक्ष ठेवा. यासाठी तुम्ही मोबाईलची हिस्ट्री तपासू शकता, स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी अनेक अँप उपलब्ध आहेत, त्याचा वापर करु शकता..
3. स्वतः मोबाईलपासून दूर राहा
3. स्वतः मोबाईलपासून दूर राहा
अनेकदा मुले त्यांच्या पालकांकडे पाहतात आणि त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत पालक दिवसभर मोबाईलला चिकटून राहिले तर मुलेही तेच करतील. त्यामुळे शक्यतो मुलांसमोर फोन वापरणे टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर डिजिटल ब्रेक घ्या. या ब्रेक दरम्यान, तुम्हाला तुमच्या फोन आणि सोशल मीडिया खात्यांपासून पूर्णपणे दूर ठेवा. मोकळ्या वेळेत मोबाईल वापरण्याऐवजी तुम्ही पुस्तके वाचणे, फिरायला जाणे, मित्रांना भेटणे या गोष्टी करा.
4. मुलांसोबत वेळ घालवा
अनेकदा कंटाळा येऊ नये म्हणून मुले मोबाईल खेळू लागतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे जेणेकरून त्यांना एकटेपणा जाणवू नये. त्यांना घरातील छोट्या कामात व्यस्त ठेवता येते. तसेच मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा.
5. मोबाईलपासून दूर जाण्यासाठी काही सोपे उपाय
मुलांना वाचनाची सवय लावा. वाचन ही अशी सवय आहे जी लावल्यामुळे मुलांचा अधिक वेळ हा त्यामध्ये गुंतून राहतो. मोबाईलमध्ये पुस्तकं वाचण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष हातात पुस्तके घेऊन वाचावयास सांगा. मोबाईलमधून बाहेर पडण्यासाठी एखादा छानसा डान्स क्लास लावा. त्यामुळेमुलांची नाचणे -गाण्याची इच्छापूर्ण होईल आणि मनोरंजनाचा कोटा पूर्ण होतो. मोबाईलपासून दूर राहण्यासाठी त्यांना एक वेळापत्रक बनवून द्या. त्याचा नक्कीच फायदा होईल.
मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे आरोग्यावर सुरक्षिततेवर परिणाम होतो, जर आपल्याला आपले जीवन सुखी, समाधानी ठेवायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजे पुरता करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि मोबाईल फोनच्या कमी वापरणे आपले आरोग्य निरोगी राहील हे मात्र नक्कीच !!