राजमाता जिजाऊ जयंती

Team Moonfires
राजमाता जिजाबाई

राजमाता जिजाऊ जयंतीराजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे मूळ नाव ‘जयवंता’ होते. त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीचे सरदार होते. जिजाऊंचे बालपण सिंदखेड राजा येथेच गेले. लहानपणापासूनच त्यांना शौर्य, स्वातंत्र्य आणि न्यायप्रियतेचे धडे मिळाले.

1605 साली जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्य होती. ज्यात सहा मुली व दोन मुले होती. त्यांनी थोरल्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले. तो शहाजी राजांजवळ वाढला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजाबाईंना दूसरा मुलगा झाला, या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो.

शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर जिजाऊंनी त्यांच्या संगोपनात विशेष लक्ष दिले. त्यांनी शिवाजी महाराजांना शौर्य, पराक्रम आणि स्वातंत्र्यप्रेमाचे धडे दिले. शिवाजी महाराजांचे शिक्षण आणि प्रशिक्षणात जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. शिवाजी राजांची संपूर्ण जवाबदारी जिजाबाइंवर होती. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याच्या जहागीरीची जवाबदारी सोपवली.

अर्थातच शिवाजी महाराज लहान असल्याने या जहागिरीची जवाबदारी जिजमातांवर आली. जिजबाईंनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि युद्धाच्या गोष्टी सांगणे सुरू केले. जिजामातांनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवराय घडले व त्यांनी आपल्या हातून स्वराज्य घडवले. शिवरायांच्या मनात कर्तुत्वची जाणीव निर्माण करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीति शिकवली. शेजारी बसवून राजकारणाचे अनेक घडे देखील दिले.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा जिजाऊ त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत बनल्या. त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना आणि संवर्धन करण्यास प्रोत्साहन दिले.

राजमाता जिजाऊ या एक महान स्त्री होती. त्यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हानांना तोंड दिले. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. त्या नेहमी आपल्या मुलांना स्वराज्यासाठी लढण्यासाठी प्रेरित करत राहिल्या.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात जिजाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकले जाते. तसेच, त्यांच्या पराक्रम आणि शौर्याची प्रशंसा केली जाते.

राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी आपण जिजाऊंच्या पराक्रम आणि शौर्याला अभिवादन करतो.

राजमाता जिजाऊंचे महत्त्व

राजमाता जिजाऊ यांचे भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी आपल्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना घडवून आणल्या. त्यांचे योगदान खालीलप्रमाणे आहे:

  • स्वराज्याची स्थापना: राजमाता जिजाऊंनी आपल्या मुलांना स्वराज्याची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची स्थापना केली.

  • महिलांसाठी प्रेरणास्त्रोत: राजमाता जिजाऊ या एक महान स्त्री होत्या. त्यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हानांना तोंड दिले. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. त्या नेहमी आपल्या मुलांना स्वराज्यासाठी लढण्यासाठी प्रेरित करत राहिल्या. त्यामुळे आजही त्या महिलांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत.

  • महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण: राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यास प्रोत्साहन दिले.

स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात  साकारण्यासाठी राजमाता जिजाबाई या छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम आशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होत्या. राजमाता जिजाऊ यांचे कार्य आणि योगदान हे महाराष्ट्रासाठी अमूल्य आहे. त्यांची स्मृती कायम स्मरणात राहील.

श्री दत्तात्रेय जयंती : त्रिमूर्तीचा दैवी संगम

The short URL of the present article is: https://moonfires.com/007b
Share This Article
Leave a Comment