महाराष्ट्र दिन : भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्य सारखीच होती. पण हळूहळू ही राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्य निर्माण झाली. भारतातील जवळजवळ सर्व राज्य दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे, महाराष्ट्रातही, दरवर्षी मे महिन्यात स्थापना दिवस १ मे (1 may) रोजी साजरा केला जातो.
कोणत्या वर्षी झाली सुरुवात?
दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. वेगेवेगळ्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जाते .
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी या भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते.
या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे पूर्वी एकच राज्य म्हणून ओळखले जात होते.
वास्तविक अनेक राज्य “राज्य पुनर्रचना कायदा” १९५६ अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यानंतर या लोकांनी स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी करत अनेक आंदोलनं सुरू केली.
१९६० मध्ये जिथे एका बाजूला गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात चळवळ सुरू झाली. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसह संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. १ मे १९६० रोजी भारताच्या विद्यमान सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन केले. मराठी भाषिक लोकसंख्येसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजराती भाषिक लोकसंख्येसाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली.
संदर्भ : वतर्मानपत्रे आणि इतर लेख.
Team_Saffron – एक हिंदू भगवे वादळं!
0 (0)



If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.