काँग्रेसने रचले हिंदू दहशतवादाचे कुंभाड – कश्या पद्धतीने हिंदू साधू संतांना काँग्रेसने संपवण्याचा प्रयत्न केला, वाचा सर्वांनी!
मालेगाव बॉम्बस्फोट
मालेगाव बॉम्बस्फोट होऊन 14 वर्षे उलटली तरी आजही त्या संदर्भातील गौफ्यस्फोट बाहेर येत आहेत. काल NIA च्या विशेष कोर्टात साक्षीदाराने मोठा गौफ्यस्फोट केला. साक्षीदाराने कोर्टात जवाब नोंदवताना म्हणाला, ” काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरुन, महाराष्ट्र ATS कडून माझा मालेगाव बॉम्बस्फोटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीचे नेते, उत्तर प्रदेशचे आताचे मुख्यमंत्री व तत्कालीन भाजप खासदार योगी आदित्यनाथ आणि सुनील देवधर या नेत्यांची नावे घेण्यासाठी कस्टडीत छळ केला गेला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला” हा गौफ्यस्फोट अनेकांची झोप उडवणारा आहे.
जेंव्हा मालेगाव बॉम्बस्फोट झाला तेंव्हा राज्यात काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. जेंव्हा राज्यात आघाडी सरकार स्थापन झाले तेंव्हा राज्यात आतंकवादी सहजपणे बॉम्बस्फोट घडवू लागले. वर्षे 2 वर्षात 1- 2 मोठे बॉम्बस्फोट राज्यात होत होतेच. दिनांक 29 सप्टेंबर 2008 ला मालेगाव येथे मशिदी समोर मोठा बॉम्बस्फोट झाला व इथून या बॉम्बस्फोटात हिंदू नेते, साधू महंत कसे अडकले जातील याची काळजी तत्कालीन राज्य सरकार कडून घेतली जात होती आणि तशी सुरवात देखील झालेली. बॉम्बस्फोट घडल्यावर तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेबांनी क्लिअर केलं की, मुस्लिम काही शुक्रवारी मशिदी समोर बॉम्बस्फोट करणार नाही, यातून स्पष्ट इशारा होता का? की, तपास यंत्रणांना तपास कोणत्या दिशेने करायचा.
कुंभाड
हिंदू नेते हिंदू साधू संत यांना बदनाम करण्याची सुरवात 2004 पासून झालेली, जेंव्हा देशात मनमोहनसिंग सरकार स्थापन झाले. 2004 पासून देशात ‘हिंदू आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द प्रचलित करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ने कशी क्रोनॉलाजी बनवली हे बघणं गरजेचं आहे. सुरवातीला आतंकवाद्यांना धर्म नसतो म्हणणारे, तथाकथित हिंदू आतंकवाद्यांचा कुंभाड कसं रचले बघू या.
आतंकवाद्यांना धर्म नसतो पण भगवा आतंकवाद असतो अश्या प्रकारची हिंदूंना बदनाम करून, हिंदूंना टार्गेट करून अनेक निरपराध साधू संतांना आणि सैन्य अधिकाऱ्यांना अनेक वर्षे लोकांना तुरुंगात डांबून अतोनात हाल करण्यात आले. साधू संतांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून कोणत्याही पुराव्या अभावी बदनामी करून खोटे खटले दाखल करण्यात आले. 2004 मध्ये मनमोहनसिंग सरकारची पहिली टर्म सुरवात झाली. काही महिन्यातच हिंदू साधू संतांना टार्गेट करण्यात आलं , त्यात पाहिलं नाव आहे, शंकराचार्य जयेंन्द्र स्वरस्वती.
अटकसत्र
जयेंन्द्र स्वरस्वती यांना नोव्हेंबर 2004 मध्ये एका खोट्या मर्डर केस मध्ये अडकवून त्यांना अटक करण्यात आली. अटक करते वेळी शंकराचार्य दक्षिणेत होते. दक्षिणेत अडीच हजार वर्षे जुनी असलेली ‘त्रिकाल यात्रा’ ची तयारी करत होते. शंकराचार्य हे ख्रिस्ती माशीनऱ्याच्या धर्मांतराला रोखण्यासाठी दक्षिण भारतात मिनाक्षीपुरम येथे दलित समाजाचे धर्मांतरण मोठ्या प्रमाणात होत होते त्याला रोखण्यासाठी कांची मठ कडून मंदिर बनवून देऊ असा संदेश दिला. देशातील दलित भक्त मंदिरापर्यंत येऊ शकत नसतील तर मंदीर त्यांच्या पर्यंत जाईल असा संदेश हिंदू धर्मातील साधू संताकडून देण्यात आलेला होता. त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात धर्मांतरणला चाप बसला.
त्याच्याच राग धरून शंकराचार्य यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून, त्यांची अश्शील सीडी बनवून विकण्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले ते आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. शंकराचार्यच्या अटकेवर तत्कालीन केंद्रीय मंत्री असलेले प्रणव मुखर्जी यांनी आक्षेप घेतला होता. पण त्यांची अटक गैर काँग्रेसी राज्यात झाला असा बनाव करून प्रणव मुखर्जी यांच्या अक्षेपला तत्कालीन काँग्रेस ने दुर्लक्ष केलं.
स्वामी असीमानंद
18 फेब्रुवारी 2007 मध्ये दिल्लीवरून लाहोरला जाणाऱ्या समजौता एक्सप्रेस मध्ये बॉम्बस्फोट झाला. तत्कालीन कोंग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने हा बॉम्बस्फोट हिंदुत्वावादी संघटनांनी घडवून आणला आहे असा आरोप केला. त्यावेळी SIT च्या तपासात स्वामी असीमानंद यांना समजौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट खटल्यात गोवण्यात आले. आणि इथून ‘हिंदू दहशतवाद’, ‘भगवा दहशतवाद’ या नव्या तातकथीत दहशतवादाची पेरणी पध्दतशीर पणे करायला सुरवात केली.
2007 पासूनच्या या खटल्यात असीमानंद यांना कोणत्याही पुराव्याअभावी तुरुंगात डांबून खूप हाल करण्यात आले, त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना फक्त एक हिंदू संन्यासी म्हणून त्यांना तत्कालीन सरकार ने भगवा दहशतवादी घोषित केलं त्याचबरोबर त्यांच्यासह संपूर्ण हिंदूंना, हिंदू धर्माला आतंकवाद्याचा रांगेत नेऊन ठेवलं.
साध्वी प्रज्ञा सिंग
29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव (महाराष्ट्र) मशिदीत झालेल्या बॉम्बसोफ्ट प्रकरणात पुन्हा एकदा हिंदू साधू संत, हिंदुत्ववादी संघटनाना युपीए संघटनांनी टार्गेट केलं. ज्या स्कुटर मध्ये बॉम्बस्फोट झाला, ती स्कुटर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी 2004 मध्ये सुनील जोशींना विकली होती. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून जबरदस्ती जवाब नोंदवून घेण्यासाठी तपास यंत्रणांनी त्यांचा शारीरिक, मानसिक अतोनात छळ केला. कस्टडी मध्ये तरी त्या कबूल झालेल्या नाहीत, याच बरोबर भारतीय सैन्यातील राष्ट्रवादी अधिकारी कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, स्वामी असीमानंद यांना ही मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये तत्कालीन सरकार ने अटक करून त्यांना ही आरोपी बनवलं व त्यांचा ही शारीरिक, मानिसक छळ अनेक वर्षे केला.
त्याच दरम्यान सरकार मध्ये कृषीमंत्री असलेले शरद पवार यांनी तर हिंदू दहशतवाद वास्तव असल्याचे सुचवताना म्हणाले की, कोणताही मुसलमान शुक्रवारी मस्जिद मध्ये बॉम्बस्फोट करणार नाही, असा तर्क पुढे केला. त्यांच्या वक्तव्यामुळे समस्त पुरोगामी तसेच कट्टरपंथी इस्लामिक लोकांना त्यांनी एका प्रकार ची मोकळीक मिळाली. यापुढेही हिंदू, हिंदू धर्मातील साधू संतांची प्रतारणा, हिंदू धर्माला बदनाम करण्याच काम पुढे ही चालूच राहिलं.
मुंबई हल्ला
26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, हा हल्ला पाकि्स्तानने घडवून आणला हे जगाला माहिती आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात इस्लामिक कट्टरपंथी लोकांना देशाच्या सीमा एवढ्या उघड्या करून ठवलेल्या होत्या, रलेवे, रस्ते, पाणी या सर्व मार्गाने अतिरेकी देशात घुसलेले. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देश विदेशातील मिळून जवळपास 166 निष्पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला, त्याच बरोबर अनेक धाडसी पोलीस अधिकारी, मेजर यांना वीरमरण आलं. हा हल्ला पाकिस्थान मध्ये बसलेला हाफिज सईद ने घडवून आणला. अतिरेकी समुद्रमार्गे भारतात घुसलेले हे तपास केल्यानंतर उघड झाले होते.
उर्दू वर्तमानपत्र सहाराचे मुख्य संपादक अझीझ बार्नी यांनी ’26/11 RSS साझिश’ हे पुस्तक लिहले. या पुस्तकाचे प्रकाशन कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या हस्ते झाले होते. या पुस्तकात 26/11 हा RSS चे कट कारस्थान असा उल्लेख करण्यात आला. दिग्विजय सिंग इथंच न थांबता, 26/11 च्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करण्यापूर्वी हेमंत करकरे यांनी दिग्विजय सिंग यांना फोन करून, ‘मला हिंदू दहशतवादाची भीती वाटत असल्याचे सांगितले आणि सर्व हिंदू दहशतवाद्यांचा संघाशी संबंध असल्याचेही ते बोलले असं दिग्वीजय सिंह याने सांगितलं. खर तर आता शहीद हेमंत करकरे आता आपल्यात नाहीत, नाही तर दिग्वीजय सिंगच्या वक्तव्याचा सोक्षमोक्ष लागला असता. माणूस हयात नसताना त्या व्यक्तीचा आधार घेऊन व्यक्तीची बदनामी करणे काँग्रेसला चांगलं जमते.
संघावर आरोप करण्यामागे काँग्रेस चा हेतू स्पष्ट होता, पाकिस्थानी अतिरेक्यांना वाचवणं आणि त्याबरोबर देशात असलेल्या कट्टरपंथी इस्लामिक विचारांना बळ देऊन देशात दहशतवादी हल्ले करून अराजकता माजवणे. काँग्रेस मनमोहनसिंग सरकारच्या काळात हिंदूं, हिंदू साधू संत, हिंदू धर्मावर अन्याय वाढत चालले होते.
Prevention of Communal and Targeted Violence Act
त्यातच एक भर पडली ती तत्कालीन मनमोहन सरकारच्या सल्लागार समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस ने 2011 मध्ये समस्त हिंदूंना टार्गेट करण्यासाठी ‘Prevention of Communal and Targeted Violence (Access to Justice and Reparations) Bill – 2011’ ह्या कायद्याचा ड्रॉफ्ट तयार केला.
हा ड्रॉफ्ट तयार करण्यासाठी कायद्याच्या ड्रॉफटींग कमिटेचे सदस्य ताथाकथीत धर्मनिरपेक्ष, हिंदू द्वेषी हर्ष मंडेर, अनु आगा, तिस्ता सीटलवाड, फराह नक्वी, सैय्यद शहाबुद्दीन, जॉन दयाल अश्या लोकांकडून ह्या कायद्याचा ड्रॉफ्ट बनवून घेण्यात आला. या कायद्याने देशात हिंदू हा बहुसंख्य असल्यामुळे अल्पसंख्याक ( समूहात ) राहणाऱ्या लोकांना हा कायदा फायदेशीर होता. ज्या लोकांसाठी हा कायदा बनवला होता ते होते अल्पसंख्याक. पण, विरोध होऊ नये म्हणून त्या विधयेकात “समूह” हा शब्द टाकण्यात आला.
अल्पसंख्याक हा समाज म्हणजे, बहुसंख्य हिंदू असलेल्या लोकवस्तीत रहाणारे समूह, मुस्लिम, ख्रिस्ती यांच्यासाठी आणला गेला, जर एखाद्या मुस्लिम समुदायाने हिंसा घडवली असेल, त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न जर गैर समूहातील लोकांनी जे हिंदू असतील त्यात नेते कार्यकर्ते सर्वच आले त्यांना कोणतेही कारण न सांगता अटक करण्याची तरतूद होती. आणि जो पर्यंत तो निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत तो तुंरुंगात सडणार होते. अश्या प्रकारचे हिंदू विरोधात षडयंत्र कांग्रेस कडून त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेले होते, आणि आताही हिंदू ना बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला ते जात आहेत त्यामुळं काँग्रेस ने एवढे अत्याचार हिंदू धर्मावर केलेले आहेत ते पुढील पिढीला देखील विसरता येणार नाही.
ज्या ज्या हिंदू साधू संतना कोणतेही पुरावे नसताना अटक करून 9 – 10 वर्षे तुरुंगात डांबून ठेवलं गेलं. समजोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी स्वामी असीमानंद यांची कोर्टाने निर्दोष सुटका केली. तसेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांच्यावरचा मोक्का हटवून त्यांना ही जामीन मिळाला. कोणतेही पुरावे नसताना यांना 8 – 9 वर्षे तुरुंगात काढावी लागली. हिंदू विरोधी सरकार ने हिंदू असल्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्याची राख रांगोळी केली.