अफजल खान कबरी भोवतीचे अतिक्रमणे पाडले

Moonfires

प्रतापगडावरील अफजल खान कबरी जवळील अनिधिकृक्त बांधकाम व उद्दतीकरण थांबवा, पाडावे म्हणून हिंदु एकता आंदोलन पक्ष व हिंदुत्ववादी संघटना सातत्याने पाठपुरावा,आंदोलने करीत होते,महाराष्ट्र सरकारने मागणी मान्य करून हे अतिक्रमण पाडण्यात आले.

१९८० ते ८५ दरम्यान, या कबरीवर अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली. तिथे उरूसही भरवण्यात आला होता. त्यानंतर या कबरीचं दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती. तसंच या ठिकाणी वनविभागाच्या जागी काही खोल्या बांधण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा आरोप आहे. या खोल्यांमध्ये १९९३ च्या बॉम्बस्फोटातले आरोपी राहत असल्याचाही आरोप केला जात होता.

प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यावरून अनेकदा आंदोलने ही झाले. न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. त्यामुळे या कबड्डीच्या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त तैनात असतो. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती.

१० नोव्हेंबर १६५९ या तारखेप्रमाणे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. आज या ऐतिहासिक घटनेला ३६३ वर्षे पूर्ण होत असतानाच शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आज प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखान याच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यास सुरवात केली आहे.

यासाठी या परिसरात १४४ कलम लागू केले असून कोणालाही तेथे जाण्यास परवानगी दिली जात नाही. ही कारवाई चोख पोलिस बंदोबस्तात सु्रू असून त्यासाठी चार जिल्ह्यातील दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.

 

समाज माध्यमावर लोकांच्या प्रतिक्रिया 

 

पृथ्वीवरील स्वर्ग केदारनाथ

The short URL of the present article is: https://moonfires.com/Pratapgad
Share This Article
Follow:
राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं। Founder Of Moonfires.com
Leave a Comment