Makar Sankranti 2023: मकर संक्रांती

Moonfires
मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जाते. - PC (Freepik)

मकर संक्रांती 2023 चे महत्त्व

मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जाते. दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असे म्हटलं जाते.  या दिवशी भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं.

त्यामुळे मकर संक्रांत साजरी करताना तिळगुळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.  तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते.

मकर संक्रांती - तीळगूळ
मकर संक्रांती – तीळगूळ

हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे. यंदा मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारी २०२३ रोजी आहे. मकरसंक्रांतीच्या शुभ सणावर पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाची पूजा करण्याचा विधी आहे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी सूर्य देव मकर राशीत येतो, ज्याचा प्रभाव केवळ सर्व राशींवरच नाही तर संपूर्ण वातावरणावर होतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणे शुभ मानले जाते. असे केल्याने शुभ फळ मिळते. यासोबतच अनेक दोषांपासून मुक्ती मिळते. शनि आणि राहू दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे.

उडीद
ज्योतिषात उडीद डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते. शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी उडीद डाळ खिचडीचे दान करावे. या दिवशी उडदाची खिचडी दान केल्यास कुंडलीतील शनिदोष दूर होतो. याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी

तिळाचे दान करावे.
तिळाचे दान केल्याने शनिदोषही दूर होतो असे मानले जाते.

घोंगडी / ब्लँकेट
शास्त्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी घोंगडी  / ब्लँकेट दान करणे देखील खूप फलदायी मानले जाते. या दिवशी घोंगडी दान केल्यास राहु दोष दूर होतो असे मानले जाते.

 

Pongal – Tradition and importance

 


संस्कृत सुभाषिते – मराठी आणि इंग्लिश अर्थासह

The short URL of the present article is: https://moonfires.com/dzxp
Share This Article
Follow:
राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं। Founder Of Moonfires.com
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *