नाव गोबेक्ली टेपे! 1960 च्या दशकात, दक्षिण-पूर्व तुर्कीमधील एका अनोळखी क्षेत्रामध्ये एक स्मारक / बांधकाम सापडले, आणि ह्या प्राचीन स्मारकाचा / बांधकामाचा पुरावा इतका जुना होता की अनेक पुरातत्वशास्त्रज्ञांना या शोधावर विश्वास बसत नव्हता. हे स्मारक / बांधकाम अशा वेळी बांधले गेले जेव्हा मानवाकडे असे करण्याचे कौशल्य किंवा क्षमता नसावी, त्यामुळे ह्या शोधाने पुरातत्व समुदायाला हादरवून सोडले.
आधुनिक तुर्कस्तानच्या थोड्याशा ज्ञात भागात गोबेक्ली टेपे हे स्थळ सापडले, जे हजारो वर्ष माती खाली दडलेले होते. पण काही प्रश्न आहेत जसे ते कोणी बांधले, का बांधले आणि त्यानीच त्या स्थळाला माती खाली का गाडले ?
ज्या टेकडीवर स्मारक / बांधकाम सापडले त्यावरुन नाव देण्यात आलेले, गोबेकली टेपे हे जगातील सर्वात रोमांचक परंतु विचित्र प्राचीन स्थळांपैकी एक आहे. तथाकथित “स्टोन हिल्स” / डोंगर भाग क्षेत्रात समान वयाच्या सुमारे डझनभर इतर साइट्स देखील उत्खननात सापडल्या आहेत – हे क्षेत्र गोबेकली टेपेच्या आसपास सुमारे 100 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे.
Göbekli Tepe म्हणजे काय?
Göbekli Tepe (“Go-Beck-Lee-Tep-E”), तुर्कीमध्ये “Potbelly Hill” किंवा “Hill of the Navel” किंवा कुर्दिशमध्ये “Girê Mirazan” किंवा “Xirabreşkê”, हे नवपाषाणकालीन पुरातत्व स्थळ आहे. तुर्कीच्या आग्नेय अनातोलिया प्रदेश मध्ये. हे ठिकाण आधुनिक तुर्की शहर उर्फा पासून अंदाजे सहा मैल (सुमारे 9.5 किमी) अंतरावर आहे आणि ते निओलिथिक युगातील (सुमारे 9,500 BC आणि 8,000 BC) मानले जात आहे, ज्याचे प्रथमदर्शनी प्रखर पुरावे उपलब्ध आहेत. त्यावरुन गोबेक्ली टेपे चे किमान 11,000 ते 12,000 वर्षे जुन्या काळात निर्माण केले गेले आहे!
या साइटचा आता जगातील सर्वात जुन्या ज्ञात मेगालिथ्स (मोठं-मोठ्या पाषाण शिळांचा वापर करून निर्माण केलेले) मोठ्या वर्तुळाकार, गोलाकार रचनांचा समावेश होत आहे. यातील बरेच खांब अमूर्त आणि गूढ मानववंशीयचा त्या काळातील सविस्तर चित्र-स्वरूपात (कोरलेली) माहिती (मानवी वैशिष्ट्यांसह प्राणी व इतर) देते, तसेच अनेक स्तंभ त्या काळातील कपडे, भांडी आणि जंगली प्राण्यांच्या चिन्हांनी सजलेले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही जागा प्रथम निओलिथिक युगाच्या सुरूवातीस वापरली गेली होती, जेव्हा जगातील सर्वात जुन्या कायमस्वरूपी मानवी वसाहती दिसू लागल्या. ही साइट कशासाठी वापरली गेली यावर जोरदार वादविवाद होत आहे, बहुतेक तज्ञांनी काही औपचारिक किंवा धार्मिक महत्त्व असलेल्या बाजूने मत दिले आहे, तर इतरांनी असाही दावा केला आहे की हे मानवी वस्तीच्या सर्वात प्राचीन उदाहरणांपैकी एक असावे.
जर्मन पुरातत्वशास्त्रज्ञ क्लॉस श्मिट, ज्यांना 1963 मध्ये प्रथम ही जागा सापडली, तेव्हा त्यान्च्याकडे एवढे सबळ पुरावे होते कि, ते छाती ठोक सांगू शकले असते की “हे जगातील पहिले पूजा स्थान किंवा मंदिर आहे हे स्पष्ट दिसत आहे.” अर्थातच, इतर अनेक पुरातत्वशास्त्रज्ञांनी या व्याख्येशी असहमत असे मत व्यक्त केले, त्यांचे मत होते की, जवळपास कोणतीही शेती किंवा त्या भागात राहणारे लोक असल्याचा पुरावा मजबूत त्यांना दिसत नव्हता.
2017 मध्ये, भूभौतिकीय सर्वेक्षणात 200 पेक्षा जास्त ओबिलिस्क आणि आणखी 15 मंदिरे पृथ्वीच्या खाली गाडलेली आढळली, याचा अर्थ येत्या काही वर्षांत आणखी बरेच काही सापडेल.
आतापर्यंत, उत्खनन केलेले सर्वात मोठे मंदिर अंदाजे 98-फूट (30 मीटर) लांब आहे आणि त्यात मोठे टी-आकाराचे खांब समाविष्ट आहेत ज्यांचे वजन प्रत्येकी 40 ते 60 टन आहे. यापैकी बहुतेक खांब हे वन्य प्राण्यांच्या चित्रांनी कोरलेले आहेत आणि इतर गूढ अशी कोरीव चित्रे आहेत, जी अद्याप पूर्णपणे समजलेली नाही आहेत, त्यांचा अर्थ अजून ही लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. इतर असंख्य कलाकृती आणि वस्तूंचा अजून सखोल अभ्यास व्हायचा आहे. जवळजवळ दररोज नवीन “ग्राउंडब्रेकिंग” शोधांसह नवी माहिती समोर येतच आहे. ही साइट इतकी चांगली जतन केली गेली आहे की काहींनी असा अंदाज लावला आहे की ते किमान पुढील दीड शतकापर्यंत अजून येथेच शोधकाम सुरु राहील! इतर अनेक प्राचीन आणि वैचित्र्यपूर्ण पुरातत्व स्थळांप्रमाणेच, गोबेकली टेपेने आजपर्यंत उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न निर्माण केले आहेत.
गोबेक्ली टेपे ही सर्वात जुनी सभ्यता आहे का? मग त्या सभ्यतेने ही जागा अशी अचानक का सोडली असेल ?
त्या लोकांनी Göbekli Tepe सारखी साइट का सोडून दिली असेल याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी अग्रगण्य म्हणजे युद्ध आणि विस्थापन / काही कारणाने स्थलांतर, पर्यावरणीय कारण (दुष्काळ/ ओला दुष्काळ /रोग) किंवा फक्त त्यांना ह्या जागेचे महत्व राहिले नाही व ते सोडून गेले असतील. आपल्याला हे निश्चितपणे कधीच कळणार नाही, परंतु आणखी एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ती जागा हजारो वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक पुरलेली आहे असे स्पष्ट दिसून येते, पण का ? ह्या प्रश्नाचे उत्तर ?
डोंगर किंवा टेकडी सहसा गाळ गोळा करत नाहीत कारण, टेकडी / डोंगरावर शक्यतो माती टिकून राहात नाही, पण साईटवर खूप मोठ्या प्रमाणात गाळ / माती दिसून येते. ह्यावरून असा अंदाज लावला गेला की, गोबलेकी टेपे हेतुपुरस्सर पुरण्यात आली असण्याची शक्यता आहे. त्या वेळेचा कोणतेही लिखित रेकॉर्ड अस्तित्वात नसल्यामुळे, तज्ञ फक्त फक्त सध्या अंदाजच लावू शकतात. परंतु, असे ही असू शकते की त्यांनी पुढील पिढीच्या लोकांसाठी, ते सुरक्षित ठेवण्यासाठी ती साईट पुरलेली असू शकते. अर्थात, जर एखाद्या नवीन धर्माने किंवा लोकांनी ते बदलले असेल, तर ती जागा अपवित्र किंवा निषिद्ध ठिकाण म्हणून पाहिली जाऊ शकते, आणि त्यामुळे देखील त्या स्थळाला पुरले गेले असू शकते. जर ते ठिकाण धार्मिक मंदिर स्थळ असेल, तर दुसरे संभाव्य कारण असे असू शकते की त्यांचे महत्व जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी देखील त्या स्थळाला दृष्टी पासून दूर करण्यासाठी त्यास गाडले गेलेले असू शकते, कारण अनेक संस्कृतींमध्ये, ज्या वस्तू किंवा इमारतींना अलौकिक किंवा दैवी सामर्थ्य आहे असे मानले जाते ते यापुढे गरज नसल्यास नष्ट केले पाहिजेत किंवा बदलले पाहिजेत अशी समजूत असलेली आपण आज पाहू शकतो. किंवा ईतर समूहाच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी ?
काही रोचकपण महत्वाची माहिती
गोबेकली टेपे येथे मिळालेल्या पुराव्यावरून असे दिसून येते की ते प्राचीन लोक धान्याचा वापर खूप पूर्वी करत होते, ज्ञात मानव समाज पाच एक हजार वर्षांपूर्वी कधीतरी शेती करायला शिकला असा आता पर्यंत समज होता, पण गोबेकली टेपे येथे त्या काळातील मानव देखील शेती करत होता व मोठ्या प्रमाणात करत होता ह्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यांचाकडे धान्य शिजवण्याची आणि मद्यनिर्मिती ह्याच्याबद्दल पुरावा साइटच्या काही भागात सापडला आहेच.
संशोधकांना असे आढळून आले की या जागेवर मानवी कबरी / दफन स्थळे नसले तरी (अद्याप शकतो सापडलेल्या नाही आहेत) पण स्थळाच्या सभोवतालच्या पसरलेल्या मोठ्या भागात मानवी हाडांचे तुकडे सापडले आहेत. संशोधकांनी या ढिगांचे परीक्षण केले आणि काही प्रमाणात जतन केलेल्या मानवी कवट्यांची जागा देखील सापडली आहे. या कवट्या काही विशेष लोकांच्या विशेष दर्जाच्या लोकांच्या होत्या याचा पुरावा त्यांच्या कवटीत काही सजावट जोडण्यात आली होती असे दिसून आले आहे, ज्या साइटच्या आजूबाजूच्या काही ठिकाणी सापडल्या आहेत. या क्षणी, हे उपचार किंवा विधींचा एक भाग म्हणून केले गेले होते किंवा ते परिसरातील वस्त्यांमधून तेथे आणले गेले होते की नाही हे सध्या कोणालाही माहिती नाही.
ती जागा मानवबळी यज्ञ करत असलेल्या समूहाची / पंथाची असू शकते का?
2017 मध्ये मानवी कवटीचा शोध लागणे महत्वाचे आहेच, परंतु वास्तविक स्तंभ आणि इतर कलाकृतींचा अभ्यास करून साइटच्या वापराचा अधिक जास्त पुरावे मिळू शकतात. वर नमूद केल्याप्रमाणे, साइटवरील टी-आकाराच्या स्तंभांमध्ये स्पष्टपणे विविध प्राणी-मानव संकरित चित्रे आहेत. परंतु, आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे म्हणजे, काही विशिष्ट खांबावर मानवी शरीराचा विधीपूर्वक शिरच्छेद केलेला देखील दर्शवितात.
Gobekli Tepe सारखेच अजून एक स्थळ आहे “करहान टेपे”
गोबेकली टेपे या साइटच्या खूपच जवळ स्थित, “करहान टेपे” ही साईट उत्तखनन मध्ये सापडली आहे, जी गोबेकली टेपे सोबत अनेक वैशिष्ट्ये सामायिक करते आणि बहुतेक वेळा गोबेकली टेपेची कार्बन कॉपी आहे कि काय असे वाटते, इतके साधर्म आहे. शोधांवरून असेही दिसून आले आहे की या जागेचा वापर पूर्व-निओलिथिक कालखंडात करण्यात आला होता, ज्यामुळे ती गोबेकली टेपे सारखीच महत्वाची आहे.
करहान टेपे प्रथम 1997 मध्ये शोधण्यात आले, परंतु पहिले पद्धतशीर सर्वेक्षण 2000 पर्यंत केले गेले नाही. याच्या अभ्यासात तलावसारखे कोरलेले पाषाण आणि मोठ्या संख्येने छिन्नी आणि रोजच्या वापरातील गोष्टी, मणी, दगडी भांडेचे तुकडे इत्यादी उत्तखन मध्ये सापडले आहे. चकमक किंवा ऑब्सिडियनपासून बनविलेले बाण, स्क्रॅपर्स, छिद्रे, ब्लेड आणि इतर दगडी अवजारे तेथे सापडली यावरून असे दिसून येते की तेथील बहुतेक लोक प्राण्यांची शिकार करत, अन्न गोळा करत किंवा अन्नासाठी प्राणी पाळत. हेच इतर ज्ञात निओलिथिक वसाहतींपेक्षा वेगळे आहे, कारण ही संरचना शेतीवर आधारित आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे.
गोबेकली टेपे जेव्हा बांधले जात होते त्याच वेळी, आपल्या मानव प्रजातींवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा पर्यावरणीय बदल चालू होता. त्याला यंगर ड्रायस म्हणतात, पृथ्वीच्या हवामानाच्या तापमानवाढीतील हा सर्वात वाईट आणि खूप मोठा कालखंडावर परिणाम करणारा आणि साधारणपणे 14,500 आणि 12,900 वर्षांपूर्वी घडलेला पर्यावरण बदल होता. शक्यतो त्यामुळेच गोबेकली टेपे येथील अनेक प्रतिमा संघर्ष आणि मृत्यू दर्शवितात.
पुढील भागात – आपल्याला शिकवला गेलेला इतिहास खरेच सत्य आहे ?