कविराज भूषण यांचे हिंदी साहित्यात विशेष स्थान आहे. ते वीर भावनेचे अद्वितीय कवी होते. रीतीच्या काळातील कवींमध्ये ते पहिले कवी होते ज्यांनी विनोदापेक्षा राष्ट्रीय भावनेला महत्त्व दिले. कविराज भूषण यांनी आपल्या कवितेतून त्यांनी तत्कालीन असहाय्य हिंदू समाजाला शौर्याचा धडा शिकवला आणि त्याच्या रक्षणाचा आदर्श मांडला. ते निःसंशयपणे राष्ट्राचा अमर वारसा आहेत.
इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर
रावण सदंभ पर, रघुकुलराज है |
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर
जो सहसबाह पर राम द्विजराज है |
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर
भूषन वितुण्ड पर जैसे मृगराज है |
तेज तम-अंस पर, कन्ह जिमि कंस पर
त्यो मलीच्छबंस पर सेर शिवराज है |
– कविराज भूषण
मराठी अर्थ / मुक्त – भाषांतर
इंद्र जिमि जम्भ पर
जसा इंद्र जम्भासुरावर ( इंद्र माजलेल्या जँभासुर नावाच्या हत्तीवर / दैत्यावर चाल करुन जातो तसा ),
बाड़व सुअम्ब पर
जसे वादळ आकाशावर
रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं
जसा राम माजलेल्या दंभी रावणावर
पौन बरिवाह पर
जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,
संभु रतिनाह पर
जसा शंकर रतीच्या पतीवर (मदनावर)
ज्यो सहसबाह पर रामद्विजराज हैं
जसा परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर
दावा द्रुम दंड पर
जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,
चीता मृग झुंड पर
जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,
भूषण वितुंड पर जैसे भृघराज हैं
जसे भल्या मोठ्या हत्तीवर सिंह चढाई करतो
तेज तमअंस पर
जसे प्रकाशाचा किरण अंधाराचा नाश करतो,
कान्ह जिमि कंस पर
जसे कृष्ण कंसाचा नाश करतो,
त्योम म्ल्लेंछ बंस पर सेर सिवराज हैं
तसा हे शिवाजी राजा तू म्ल्लेंछ वंश यांचा नाश करणारा वाघ आहेस.