आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ह्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे झाला. त्यांनी पुण्यातील सैनिकी लेखानियंत्रक कार्यालयात क्लार्क म्हणून काम केले.

शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. प्रश्न मनात आला जर आपणास आपल्या आईला भेटता येत नसेल तर त्या नोकरीचे मोल काय? त्यात आईचे निधन झाले व शेवटी भेट घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

१८७६–७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले. त्यातच प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. इंग्रज सरकारच्या हलगर्जी कारभारामुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सशस्त्र बंड

भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. १८५७ च्या अयशस्वी क्रांती पर्वानंतर भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय स्पष्टपणे समोर ठेऊन ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा जो सशस्त्र प्रयत्न झाला तो वासुदेव बळवंत फडके यांचे बंड होय. या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; त्यात त्यांना रामोशी, भिल्ल, आगरी, आणि कोळी तरुणांचा पाठिंबा मिळाला.

वासुदेव बळवंत फडके
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले.

पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता. मोशी लुटालूट करण्यात निष्णात होते; पण पैशापलीकडे त्यांना राष्ट्रभक्ती, देशप्रेम इ. काही ठाऊकच नव्हते. जी लूट मिळाली, ती घेऊन ते आपापल्या गावी पांगले.

पाठबळ

हताश अंतःकरणाने वासुदेव बळवंत पुण्यास परतले. गाणगापूर मार्गे श्रीशैलम् येथील श्री मल्लिकार्जुनाच्या पवित्र मंदिरात विपन्नावस्थेत गेले. १७ एप्रिल १८७९ रोजी दिवशी वासुदेव बळवंतांनी आपल्या आत्मचरित्रलेखनास सुरुवात केली. या सुमारास त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट नावाचे गृहस्थ भेटले व त्यांनी मदतीचा हात पुढे केला.

त्यामुळे वासुदेव बळवंतांनी आत्मसमर्पणाचा विचार सोडून दिला व पुण्याकडे जाण्याचे ठरविले. दरम्यान रघुनाथ भटांनी इस्माईल खान या रोहिल्यांच्या पुढाऱ्याशी त्यांचा परिचय करून दिला. सुमारे ५०० रोहिले इस्माईल खानसह त्यांना येऊन मिळाले. शिवाय रघुनाथ भटाने आणखी काही माणसे मिळवून दिली. अशा प्रकारे सु. ९०० माणसांचे पाठबळ वासुदेव बळवंतांना प्राप्त झाले.

वासुदेव बळवंत फडके गाणगापुरास आहेत, ही बातमी ब्रिटिश सरकारच्या कानावर गेली. सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आणि मेजर डॅन्यीएलला त्या मोहिमेवर धाडले. वासुदेव बळवंत हे धानुरला (गाणगापुरला) आहेत, असे समजताच त्याने गावाला वेढा दिला; पण वासुदेव बळवंत तेथून पळून गेले; तथापि त्यांचे कागदपत्र मात्र शत्रूच्या हाती पडले. त्यांत मुंबईच्या लष्कराचा एक नकाशा, गव्हर्नरचा खून, इतर यूरोपीयांचे खून यांबद्दल १०,००० ते ५,००० पासूनची बक्षिसे जाहीर केली होती.

अटक

वासुदेव बळवंताचे हे सर्व गुप्त बेत कळल्यामुळे मे. डॅन्यीएलने निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या मदतीने वासुदेवांचा पाठलाग सुरू केला. फितुरीमुळे त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला आणि विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले (२१ जुलै १८७९). पुणे येथे त्यांच्यावर दंड संहितेच्या १२१ए, १२२, १२४ए इ. कलमांन्वये खटला चालविण्यात आला.

मृत्य

त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी १८८० च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंताचा प्रयत्न फसला. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच मरण पावले.

वासुदेव बळवंतांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला, तो एकाकी होता. त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत व शस्त्रसामग्रीही मिळाली नाही; तथापि भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली. म्हणून त्यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात.

 

शिवराम हरी राजगुरू

 

Hot this week

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे करें

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे...

दिवाळी 2024: घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी

घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी -  दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील...

मराठवाडा वॉटरग्रीड – महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान

महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान - मराठवाडा वॉटरग्रीड शिल्पकार : देवेंद्र...

महर्षि वाल्मीकि जयंती

महर्षि वाल्मीकि जयंती, जिसे विशेष रूप से महर्षि वाल्मीकि...

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ -  भारत के...

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please Support us pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.

 

Topics

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे करें

दिवाली 2024 पूजा विधि: लक्ष्मी और गणेश पूजा कैसे...

दिवाळी 2024: घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी

घरगुती पारंपारिक दिवाळी फराळ रेसिपी -  दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील...

मराठवाडा वॉटरग्रीड – महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान

महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान - मराठवाडा वॉटरग्रीड शिल्पकार : देवेंद्र...

महर्षि वाल्मीकि जयंती

महर्षि वाल्मीकि जयंती, जिसे विशेष रूप से महर्षि वाल्मीकि...

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ -  भारत के...

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ: दिवाळी सण भारतभरात...

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : सुप्रसिद्ध वैज्ञानिक...

केवट की कथा – क्षीरसागर का कछुआ

केवट की कथा - क्षीरसागर में भगवान विष्णु शेषनाग...

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Categories