उत्सवधर्म-कर्म-भविष्यमराठी ब्लॉगसंस्कृती

माघी गणपती तारीख आणि मुहूर्त - 2024

Maghi Ganesh jayanti 2024

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

माघी गणपती तारीख आणि मुहूर्त - 2024 आपल्या हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची पूजा केली जाते श्री गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करून कामाचा श्रीगणेशा केला जातो .असे हे सर्वांचे लाडके दैवत गणेशजी यांच्या जन्मदिवस हा माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो .आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत माघी गणपती 2024 माहिती मध्ये कधी आहेत याबद्दल संपूर्ण माहिती.

हिंदू धर्मियांच्या मान्यतांनुसार, माघी चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला आहे. म्हणून मराठी महिन्यानुसार माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti २०२४)म्हणून साजरा केला जातो. त्यालाच माघी गणेश जयंती (2024 )असे म्हणतात. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील पूज्य दैवत असून ते भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत .त्यांना विविध नावे आहेत जसे विनायक, गणेश, गणपती, मूषकराज अश्या विविध नावानी भक्त त्यांची आराधना करतात.

 

माघी गणपती तारीख आणि मुहूर्त - 2024
माघी गणपती तारीख आणि मुहूर्त - 2024

महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते तसेच काही ठिकाणी या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळे सुद्धा गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून हा सण थाटामाटात साजरा करतात .त्यामुळेच गणेश जयंती या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

2024 माघी गणेश जयंती तारीख आणि मुहूर्त :

यंदा ही माघी गणेश जयंती मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी आहे.

चतुर्थी तिथि प्रारंभ – 12 फेब्रुवारी 2024 : 05 : 44 PM ते
चतुर्थी तिथि समाप्त – 13 फेब्रुवारी 2024 : 02 : 41 PM पर्यंत
गणेश पूजा मुहूर्त – 13 फेब्रुवारी 2024 : 11:40 AM ते 01:58 PM पर्यंत

गणेश जन्म

पुराणातील एका कथेनुसार एके दिवशी देवी पार्वती या स्नानासाठी जात असताना त्यांनी चन्दना पासून बनवलेल्या एका बालकाला द्वारपाल म्हणून उभे केले. जेव्हा त्या स्नान करत होत्या त्यावेळी भगवान शंकर त्याठिकाणी आले. ते आत होण्यासाठी निगाले असता या बालकाने प्रभू शिवांना आत जाण्यापासुन रोखले त्यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक(डोके) शरीरापासून वेगळे केले.

हे पाहिल्यानंतर माता पार्वतीने काली मातेचा अवतारात धारण केला व क्रोधाने पूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी भगवान शिवांना दिली. त्यामुळे सर्व देवी देवता हे माता पार्वतीची प्रार्थना करून क्षमा मागू लागले. त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि आपल्या पुत्राला पुनरुजीवित करावे आणि त्या पुत्राला पूर्ण विश्वात सर्वोच्च स्थान दिले जावे अशी मागणी त्यांनी भगवान शंकराकडे केली.

Maghi Ganesh Jayanti 2020: शास्त्रों में है इस दिन का खास महत्व - maghi ganesh jayanti 2020-mobile

भगवान शंकर देवी पार्वतीच्या मागणी मान्य करतात व त्या छोटयाश्या बालकाला पुनरुजीवित करण्यासाठी आपल्या गणांना आदेश देतात, पृथ्वीतलावर जावा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्या प्राण्याचे शीर कापून घेऊन या. सर्व गण पृथ्वीतलावर गेले असता त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसला.

मग त्या हत्तीचे शीर कापून त्यांनी भगवान शंकर समोर हजर झाले. तेच हत्तीचे शीर (डोके) भगवान शंकरानी त्या पुत्राच्या धडावर लावले आणि त्या पुत्राला पुनरुजीवित केले. यानंतर भगवान महादेव, पार्वती यांनी त्याचा स्वपुत्र म्हणून स्वीकार केला. माता पार्वतीला दिलेल्या वचना नुसार भगवान शंकर हे या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान करतात. हा सगळा प्रकार घडला तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता. म्हणूनच हा दिवस गणेशाचा जन्मदिवस मनून साजरा केला जातो याच दिवसापासून गणेश चतुर्थीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

जय गणेश देवा - गणेश आरती

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker