सनातन धर्माएवढा “लिबरल” धर्म या जगात अस्तित्वात नाही. आम्ही शैव असलो तरी वैष्णवांचा तेवढाच आदर केला. आणि आम्ही वैष्णव असलो तरी कधी शाक्ताना कमी लेखलं नाही. आणि आम्ही शाक्त आहे म्हणून स्मार्तांचा अनादर केला नाही. आम्ही वैदिक धर्म पळतो म्हणून चार्वाकाला कमी मानलं नाही.
आम्ही यज्ञ केले पण बुद्धाचा अनादर ही केला नाही. आम्ही शिकारी खेळणारे क्षत्रिय होतो पण म्हणून आम्ही महावीर ही नाकारले नाहीत. पण आकाशातल्या देवाचे नुमाइंदे नागव्या तलवारी घेऊन आमचं अस्तित्व च नाकारू लागले तेव्हा आम्ही विरोध केला.
अतोनात नुकसान सहन केलं पण विरोध करत राहिलो टिकून राहिलो. धार्मिक नरसंहार पाहिले जिझिया भरला,डोळ्यासमोर मंदिर उद्ध्वस्त झालेली पाहिली , पोरीबाळी वाचवण्यासाठी स्वतःचे संस्कार बदलले, वेळोवेळी रक्ताचं, जिवाचं अर्ध्य देऊन स्वतः ची ओळख टिकवली. आमच्या मातृभूमी चे तुकडे करणाऱ्यांना ही आम्ही माफ करून पुन्हा आमच्यात च जागा दिली.
हे एवढं सारं करून ही आज आम्ही ” Extremist” “कट्टरवादी” झालो. स्वतः ची ओळख जपता जपता मोडलेलो आम्ही ज्यावेळी स्वतः ला हिंदू म्हणतो त्यावेळी आम्हाला आमच्या च देशात ‘भगवे आतंकी ‘ म्हणून हिणवलं जातं. आमच्या पोशाखावरून,सणांवरून, परंपरा वरून आम्हाला दुखावलं जातं.
सगळ्यांना सहन करून,स्विकारून ही आम्ही “असहीष्णू” कसे?? आणि या सगळ्यातून आम्ही आमच्या अस्तित्व नाकारणाऱ्या शक्तींना विरोध करायचा नाही का?? कितीही अस्तित्व नाकारलं तरीही हा सनातन धर्म टिकेल कारण सनातन धर्मात स्वतःला काळानुरूप बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे याला संपवणे शक्य नाही.
वर्ण व्यवस्था, सतीप्रथा,अस्पृश्यता अशा अनेक गोष्टी आम्ही स्वतः च बेदखल केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळानुरूप बदलत रहाण्याची क्षमता इथून पुढे हे आमच्यात राहील आणि सनातन टिकेल. गरज आहे फक्त जगरुकतेची आणि स्वतः ला कमी न लेखता खंबीर उभे रहाण्याची. जयतु सनातन !


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.