हळद ही भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात असतेच. आपल्याकडे हळदी शिवाय स्वयंपाकाची कल्पनाच कोणी करु शकत नाही. हळदीचा वापर हा खाद्यपदार्थाला पिवळा रंग आणि चव आणण्यापुरता मर्यादीत नाही. याशिवाय हळदीचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत.
त्वचेची काळजी घेण्यासाठी हळदीचा (Haldi) वापर केला जातो, ही गोष्ट जवळपास अनेकांना माहिती आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहितीये का? हळदीचे पाणी प्यायलाने वजन कमी होण्यापासून ते अगदी पचनक्रिया सुधारण्याशिवाय अन्य आरोग्यसाठी खूप लाभ घेता येईल. जर तुम्हाला यासंदर्भात माहिती नसेल तर हा लेख तुमच्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.
भारतात, ते पारंपारिकपणे त्वचा, वरच्या श्वसनमार्गाचे, सांधे आणि पाचन तंत्राच्या विकारांसाठी वापरले जात होते. आज, हळदीला संधिवात, पाचक विकार, श्वसन संक्रमण, ऍलर्जी, यकृत रोग, नैराश्य आणि इतर अनेक रोगांसह विविध परिस्थितींसाठी आहारातील पूरक म्हणून प्रोत्साहन दिले जाते .

हळदीचे पाणी हे अगदी डिटॉक्स वॉटरसारखे काम करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, डिटॉक्स वॉटर म्हणजे काय? तर या पाण्यात ताजी फळे, पालेभाज्या आणि औषधी वनस्पतीचा स्वाद असतो. याशिवाय यात कॅलरीची मात्राही कमी प्रमाणात असते. हळदीचे पाणीही अगदी तसेच असते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यापासून अनेक फायदे यातून मिळतात.
त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते
हळदीचा लेप चेहऱ्याला लावल्यावर चमक येते, ही गोष्ट तर तुम्हाला माहिती असेलच. पण हळदीचे पाणी प्यायल्याने देखील हा फायदा तुम्हाला मिळतो. त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी याचा फायदा होईल. ( हळदीचे आरोग्यदायी फायदे )हळद त्वचेला नुकसान पोहचवणाऱ्या फ्री रेडिकल्सला नष्ट करते. त्यामुळे एजिंग प्रोसेस मंदावते.
सूज कमी करण्यास मदत
हळदीतील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखी किंवा अन्य कारणामुळे शरिराला येणारी सूज कमी करण्यासाठी हळदीचे पाणी फायदेशीर ठरते. वेदनाही कमी होण्यात मदत मिळते.
वजन कमी करणे आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत
हळदी पाणी नियमित पिल्यावर शरीरावर फॅट जमा होत नाही. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) हा सर्वोत्तम पर्यायही मानला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्याची क्षमता हळदीच्या पाण्यात असते. त्यामुळे पचक्रिया सुधारण्यासही मदत मिळते.
जलजीरा रेसिपी



If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.