जनजाति विकास समिति
जनजाति विकास समिति बद्दल आपण जाणून घेऊ! ह्या देशात चांगल्या गोष्टींची किंवा सकारात्मक घटनांची कधीच बातमी होत नाही म्हणतात. कोणतेही चैनल लावा राजकारण, धर्म; किंवा लुटपाट, जाळपोळ, दंगली यांच्याच बातम्या असतात. मात्र ह्या सर्वांच्या पलीकडे; शासकीय, निमशासकीय आणि खासगी स्तरावरून राष्ट्रीय उत्थानाचे अनेक प्रयत्न होत आहेत, मात्र त्यांची दखल घेतलीच जात नाही, हे आपले दुर्दैव.
अशाच एका दीर्घकालीन प्रयत्नाचा हा आढावा. “जनजाति विकास समिति” हे नाव आपल्यापैकी कित्येकांच्या गावीही नसेल; मात्र नागालँड सारख्या एका दुर्गम प्रदेशात राष्ट्रीय एकतेसाठी झटून काम करणारी ही संघाची संस्था… कुठे नाव नाही, कसला गवगवा नाही, फक्त राष्ट्रीय कार्याला समर्पणाची भावना.
नागालँड हे भारताच्या ईशान्येकडील राज्य. ह्या राज्यातील लोक आपल्याकडे दिसले तर लोकांच्या भुवया उंचावतात, इतकी चेहऱ्याची ठेवण वेगळी. काही लोक तर त्यांना सरळ चायनीज वगेरे हिनवून मोकळे होतात. मात्र हा एकसंध भारताचा अविभाज्य भाग आहे. खरेतर जंगलात राहून आपापल्या प्रथा – परंपरा पाळणाऱ्या आदिवासीचा हा प्रदेश, बाहेरच्या जगाशी फारसा काही संबंध नाही.
मात्र इंग्रजी आणि काँग्रेस राजवटीत या भागात मिशनरी घुसले आणि या भागाची स्थानिक संस्कृती बिघडवून टाकली. त्यांनी केवळ धर्म नाही तर सोबत अराजकता घेऊन आले. एका बहुसांस्कृतिक देशात, अल्पसंख्याकांच्या मनात राष्ट्रविरोधी भावना निर्माण करणे हे सर्वात सोपे काम असते, मिशनऱ्यानी हेच केले आणि छोटे- मोठे दहशतवादी गट बनवले.
देश कधी ईशान्येकडील राज्यांची फारशी दखल घेत नाही. मात्र ह्या अशा घडामोडी संघाच्या नजरेतून सुटत नसतात, 1990 ते 2000 ह्या काळात संघाचे अनेक कार्यकर्ते या भागात आले. त्यांचे ध्येय होते – नागालैंडला पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रवाहात आणणे आणि आदिवासीमध्ये राष्ट्रीय भावनेचे पुनरुज्जीवन करणे आणि देशाचे एक राज्य भीषण अराजकतेपासून वाचवणे.
याच महान कार्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून संघाचे स्वयंसेवक या भागात उतरले. प्रसंगी स्वतः चा जीव धोक्यात घातला अगदी गोळीबाराला सुद्धा निधड्या छातीने तोंड दिलं. मात्र, निष्पाप नागा आदिवासींची साथ त्यांनी कधीही सोडली नाही. ते त्यांच्यातीलच एक बनून राहिले. त्यांना जाणीव करून दिली की, तुमची संस्कृती ह्या देशात अबाधित आहे. त्यांनी जागोजागी नागा आदिवासींसाठी शाळा, वस्तिगृहे बांधली. आणि नव्या नागा पिढीवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार केले.
आज नागालँडचा बहुतेक प्रदेश दहशतवादी कारवायांपासून मुक्त झाला असून पर्यटक, व्यापारी त्या भागात मुक्त संचार करताना दिसतात. आणि ह्या शांततेचे श्रेय किंवा त्यातला एक वाटा निश्चितच जनजाती विकास समितीचा आहे.
त्यांच्या या राष्ट्रनिष्ठेला माझा कडक सॅल्युट !
प्रसाद शरदराव जोशी
7559177351