झाशीची राणी – १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं – भाग १

Moonfires
झाशीच्या राणीचा पूर्ववृत्तांत 
झाशीची राणी लक्ष्मीबाई! – मराठेशाहीत झाशीचे शासक हे पुण्याच्या पेशव्यांच्या अंकित राहणारे जहागीरदार होते. त्यांना राजा हा किताब मिळाला होता. सन १८१७ साली झाशीचे राजे रामचंद्रराव यांच्या बरोबर इंग्रजांनी मित्रत्वाचा तहनामा केला. त्यात झाशीचे राज्य वंशपरंपरेने रामचंद्ररावांच्या  कुळातच ठेवले जाईल असे आश्वासन इंग्रज सरकार तर्फे देण्यात आले होते.

शूर झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे नाव प्रत्येक भारतीयांच्या जिव्हाग्रावर नाचत आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य- संग्रामातील तिच्या धडाडीने, पराक्रमाने प्रतिस्पर्धी इंग्रजी सेनापतीनाही  मुग्ध करून टाकले होते. झाशीच्या राणीच्या योग्यतेचे पाच -दहा सेनापती जर क्रांतीकारकांच्या पक्षात असते तर या युद्धात इंग्रजी सत्तेचा कायमचा विनाश झालेला दिसला असता.

रामचंद्रराव यांच्या पाश्च्यात त्याचे पुत्र गंगाधरराव हे गादीवर बसले. त्यांच्याशीच लक्ष्मीबाईचा विवाह झाला होता. शेवटच्या बाजीराव पेशव्याच्या बरोबरच लक्ष्मीबाईचे वडील   मोरोपंत तांबे हे हि ब्राम्हवार्तास येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांच्या या कन्येला, धोंडोपंत, रावसाहेब, तात्या टोपे आदी तिच्या समकालीन मंडळींबरोबर घोड्यावर बसणे, शस्त्र संचालन करणे आदी युद्धोपयोगी विद्या व कलांचे शिक्षण मिळालेले होते  व अल्पवयातच ती निपुण बनली होती.
झाशीची राणी लक्ष्मीबाईचे पती गंगाधरराव लवकरच दिवंगत झाले. त्यावेळी तिचे वय फक्त १८ वर्षाचे होते. गंगाधररावांनी आपल्या कुळातील दामोदर नावाच्या एका बालकाला दत्तक घेतले होते.  ” एम्पायर इन इंडिया” नामक पुस्तकात लेखक मेजर इव्हान्स वेल यांनी हे नमूद केले आहे. कि – ” दत्तक घेण्याचा संस्कार हिंदू धर्माश्स्त्रास अनुसरून यथोचित रीतीने करण्यात आला होता. त्यावेळी इंग्रज अधिकारीही तेथे उपस्थित होते. आपण दत्तक मुलगा घेतला आहे याची सूचना गंगाधरराव यांनी मरणापूर्वी इंग्रज सरकारला दिली होती. “
 पण इतके सर्व असूनही १८५४ साली आपणास दत्तक नामंजूर असल्याचे Governor General Lord Dalhousie याने कळवले.  ईतकेच करून तो थांबला नाही तर त्याने झाशीचे राज्य खालसा करून टाकले व झाशीचे जडजवाहर  व सर्व संपत्ती जप्त करून खजिन्यात जमा केली. त्याच वेळी राणी लक्ष्मीबाईच्या मनात इंग्रजी शासनाबद्दल द्वेशाग्नी भडकून उठला.
इंग्रजांचा नीचपणा आणखीही पुढे गेला होता. तिचे राज्य खालसा करूनच तो थांबला नव्हता तर प्रजेच्या मनावर तिच्या संबंधीचा विलक्षण प्रभाव त्यांना नष्ट करायचा होता. त्यासाठी झाशीची राणी च्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास त्यांनी प्रारंभ केला. पण झाशीची राणी च्या चारित्र्याचा पूर्ण परिचय असलेल्या Major Malkam नामक एका विद्वान इंग्रजानेच परस्पर या आरोपाचे जोरदार खंडन केले.
१६ मार्च १८५५ Governor General ला लिहिलेल्या सरकारी पत्रात त्याने नि: संदिग्ध भाषेत कळविले कि – ” राणीचे चारित्र्य” अत्यंत उच्च प्रतीचे आहे आणि झाशीतील प्रत्येक मनुष्य तिच्याविषयीच्या आदराने भारावून गेलेला आहे.”
राणी लक्ष्मीबाई
झाशीची राणी
केवळ १८ वर्षाच्या कोवळ्या वयात विधवा झालेल्या या वीर महिलेने तिच्या हक्कावर, राज्यावर, संपत्तीवर व चारीत्र्यावरही इंग्रजांनी जो घोर अन्याय चालवला होता त्याखाली मान न वाकवता, त्याचा प्रतिकार करण्याचा अलौकिक धैर्य अंगी बाणवले. तिचं कर्तृत्वाचा काळ १८५४ ते १८५८ हा होता. तिच्या दिव्या गुणांच्या आविष्काराने दिपलेल्या इंग्रजानाही लाजेने मान खाली घालावी लागली.
दत्तक नामंजूर करून झाशीचे राज्य व संपत्ती खालसा केल्यावर इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईला दरमहा रुपये  ५००० /- पेन्शन देऊ केली, पण इंग्रजांनी फेकलेला हा भिकेचा तुकडा राणीने ठोकरीने उडवून लावला. ” मै अपनी झाँसी नही दूंगी” असे तिने इंग्रज अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. राणीने झाशीला स्वत:ची संघटना उभारली. झाशीतील स्त्रियांना तिने स्वत: युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. भावी स्वातंत्र्य युद्धासाठी प्रजेची माने तिने अनुकूल करून घेतली.
४ जून  १८५७ रोजी कानपूरला  नानासाहेबांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्याच दिवशी राणीनेही झाशीचे स्वातंत्र्य घोषित केले. १२ नंबरची इंग्रजांची फलटण तिला येऊन मिळाली. कानपूर प्रमाणे झाशिनेही इंग्रजांच्या खजिन्यावर, दारूखान्यावर,  प्रथम ताबा मिळवला. दि. ७ जूनला राणीने झाशीच्या किल्ल्यावर हल्ला चढवून तो जिंकून घेतला.
स्वातंत्र्याचा  ध्वज उभारून त्याची सर्वत्र द्वाही फिरविण्यात आली कि, ‘ खल्क खुदा का, मुल्क बादशहा का और हुकम राणी लक्ष्मीबाई का’  ८ जून १८५७ पासून २४ मार्च १८५८ पर्यंत झाशीवर राणी लक्ष्मीबाईचाच  अधिकार नांदत होता. ती झाशिलाच पक्के ठाण मांडून बसली होती. झाशी हे मध्य बर्तातल्या सर्व क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले.
१८५८ च्या जानेवारीपासून इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईवर आक्रमण सुरु केले. झाशीच्या आजूबाजूचा प्रदेश काबीज करीत हि सेना झाशीच गळा आवळीत पुढे सरकत होती. राणीने त्यावर उपाय म्हणून ‘दग्धभू रणनीती’ अवलंबिली. दि. २४ मार्च १८५८ ला तो झाशीला पोहोचला व झाशीला वेढा दिला. आपल्या गोटात स्वैर संचार करणारा व गोड गळ्याने सुस्वर गाणी म्हणणारा भिक्षेकरी फकीर म्हणजे एक स्त्री आहे आणि राणीच्या हेर खात्याची प्रमुख आहे हे इंग्रजांना कळलेच नाही.
मोतीबाई फक्त नातीच नव्हती तर युद्धकलेतही निपुण होती. झाशीच्या वेढ्यातही वेळी महिलांच्या नगर रक्षक पाल्तानीची तीच सेनानी होती.  मोतीबाई प्रमाणे राणीची दुसरी महत्वाची सरदार ललिताबाई बक्षी हि होती घोड्यावर स्वारी करण्यात ती निपुण होती झाशीच्या लढ्याच्या वेळी मोठ्या धाडसाने तटावरून किल्ल्यात चढून येणाचा प्रयत्न करणाऱ्या २ इंग्रज अधिकाऱ्यांना ललिता बक्षीने अश्वसंचालनात ती जितकी निपुण होती तितकीच तोफांची बिनचूक गोलंदाजी करण्यात हि तिचं हातखंडा होता.
ललिता प्रमाणेच झलकारी हि एक राणीच्या विस्वसातली सेविका होती. “LieutenantBone” जेव्हा किल्ल्याच्या तटावर चढू लागला. तेव्हा मोठा धोंडा त्याच्यावर घालून झालकारीनेच त्याचा कपाळमोक्ष केला होता. लालीताप्रमाणेच तोफांची गोलंदाजी  करण्यात निष्णात असलेली सुंदर नावाची एक दासी राणीजवळ होती. झाशीच्या वेढ्याच्या वेळी पुरुष गोलंदाज मारले गेल्यावर ललिता व सुंदर यांनीच तोफा चालवल्या. त्यांचे कर्तृत्व पाहून इंग्रज गोलंदाजांनी लज्जित होऊन आपले मोर्चे बदलले.
झाशीच्या लढवय्या महिलांची फौज 
राणी हे जाणून होती. तिनेही वेध लढवण्याची पूर्वतयारी केली होती. दिवस राणीची फौज लढत होती. तिच्या सैन्यात स्त्रियांचा भरणा होता. प्रसंगी तोफा चालविण्याचेहि काम त्यांनी केले. किल्ल्याला इंग्रज फौजांनी पडलेली भगदाडे त्या महिला फौजेने रात्रीत बुजवून टाकली.
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात शेकडो वीर महिला आघाडीवर पुरुष योद्धयांच्याहि अग्रभागी तळपल्या. मोतीबाई नावाची एक स्त्री राणीच्या हेर खात्याची प्रमुख होती. ती धर्माने मुसलमान असून नाटकात स्त्री भूमिका करायची. एव्हढेच  नव्हे तर सर्व प्रकारच्या बेमालूम भूमिका वठवायची. तो तिचं व्यवसाय होता.
ती मुसलमान फकिराचा वेष बेमालूम वठवून शत्रूच्या गोटात प्रवेश करी व सर्वत्र संचार करून शत्रूकडील बातम्या काढून आणत असे. या कमी राणीला तिची मोलाची मदत मिळत होती.
राणी लक्ष्मीबाई प्रमाणे दिसणारी तिची काशी नावाची एक दासी होती. तीही शूर व धाडशी होती महिला होती. झाशीच वेढा लढविणे अशक्य झाल्याने वेढा फोडून काल्पीस निघून जाण्याचा राणीने निश्चय केला. प्रसंग आणीबाणीचा होता. इंग्रज शहरात घुसले होते .
अशा प्रसंगी लढत – लढत जाण्याखेरीज मार्ग नव्हता. पण त्यामुळे राणी इंग्रजांच्या हाती लागण्याची शक्यता होती, अशा प्रसंगी राणीसारख्याच दिसणाऱ्या काशीने राणीचा पोशाख केला व काही स्वार बरोबर  घेऊन घोडा दौडवीत ती तटाच्या बाहेर पडली.
‘अरे, हि पहा राणी चालली’ असे म्हणून इंग्रज फौज तिच्यावर तुटून पडली. या संधीचा फायदा घेऊन खरी राणी सध्या पोशाखात आपल्या निवडक आणि विश्वासू स्वारांसह किल्ल्याबाहेर निघून गेली. राणी दूर निघून गेल्यावर इंग्रजांना आपली चूक कळली.
तितक्यात काशिनेही त्यांना झुकांडी दिली व ती अगदी वेगाने घोडा दौडवीत लवकरच काल्पीच्या रस्त्यावर आपल्या परमप्रिय स्वमिनीच्या तुकडीत येवून मिळाली. अशा प्रकारे तेलही गेले तूपही गेले आणि भग्न व दग्ध झाशीचे धुपाटणे इंग्रजांच्या हाती लागले.
काशिप्रमाणेच मुंदर हि एक पराक्रमी व धाडशी युवती राणीच्या पदरी होती. झाशीहून निघाल्यापासून ती अखेर पर्यंत सावलीप्रमाणे राणीच्या बरोबर काशी व मुंदर यांनी राणीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला व त्यात स्वताचे बलिदान केले.
झाशीच्या राणीची अखेरची लढाई 
झाशी सोडून राणी एका दिवसात १०८ मैलाची मजल मारून काल्पीला पोहोचली झाशीच हा १२ दिवसांचा संग्राम युद्ध इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला आहे. राणी झाशीहून निघून गेलेली पाहून सर ह्यु रोज काल्पीवर चालून गेला व ती स्वताच आपली फौज घेवून रोज वर चालून गेली काल्पी पासून ४२ मैलावर कांचागावत तिने इंग्रजी फौजेला गाठले.
घनघोर लढाई झाली. पण तिला हवी तशी मदत ना मिळाल्यामुळे शेवटी पराभव पत्करावा लागला. पण पुन्हा फौज सुसंघटीत करून ती काल्पीला परतली आता तर सर ह्यु ने काल्पिवरच आक्रमण केले. तेव्हाही लक्ष्मीबाईच पुन्हा त्याच्याशी लढली. इंग्रजांची उजवी बाजू पार मोडून पडली त्यामुळे इंग्रज गोलंदाज तोफा सोडून पळाले. क्रांतीवाद्यांच्या फौजेत सुव्यवस्था, स्वामीनिष्ठा, नसल्याने शेवटी काल्पी इंग्रजांच्या हाती गेले.
काल्पीचा पराभव झाल्यावर क्रांतीवादी फौजा पुन्हा गोलापूरला एकत्र आल्या. राणी लक्ष्मीबाई, रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, बांद्याचा नबाब आदी पुन्हा एकत्र आता फारशी फौज त्यांच्यापाशी उरली नव्हती. एकट्या राणीचेच पथक संघटीत होते. राणीने सर्वाना ग्वाल्हेरला जाण्याचा आणि तो सर्वांनी ऐकला.
दि. २८ मे १८५८ ला हि सर्व मंडळी ग्वाल्हेरला पोहोचली. तेथे शिंद्यांची सुसज्ज फौज त्यांना मिळाली. दारुगोळा युद्धसामुग्रीहि त्यांना मिळाली. आता ग्वाल्हेर  क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले १५ जून १८५८ रोजी सर ह्यु रोज ग्वाल्हेरवर चालून आला यावेळ राणीनेच रोजला प्रतिकार केला. त्यावेळी General स्मिथ रोज च्या सहाय्याला आला १५-१७ जून  हे तीनही दिवस राणी इंग्रज फौजेवर तुटून पडली.
राणी आता संपूर्ण घेरली गेली तिच्याजवळ १५-१६ च घोडेस्वार उरले होते. पण ती रणरागिणी इंग्रज सेनेला कापीत पुढे निघाली. फळी फोडून ती भरधाव    निघाली तिच्या मागावर इंग्रज तुकडी निघाली त्याच्याशी राणीच्या चकमकी चालू झाल्या त्यात मुंदर कामी आली दोन्ही कडील मनुष्यबळ कमी होऊ लागले. राणी नाल्याच्या काठावर आली.
तिचं घोडा यावेळी कच्छ होता तो उडी मरेना, तर अडलाच व जागीच रिंगण करू लागला तेव्हढ्यात  इंग्रजांनी राणीला घेरले तर तिने त्यांना जमीनदोस्त केले. पण एक घाव तीच्या मस्तकावर बसला एक डोळा लोंबकळू लागला. रामचंद्रराव नावाच्या एका विश्वासू सेवकाने तिला उचलून  जवळ असलेल्या एका साधूच्या झोपडीत नेले. आणि तेथेच १७ जून १८५८ रोजी हि धगधगती ज्यात मालवली गवताच्या गंजीत तिच्या शवाला अग्नी देण्यात आला तिच्या निर्जीव देहालाहि शत्रूचा स्पर्श होऊ शकला नाही. ” सर्व क्रांतीवादी नेत्यात राणी लक्ष्मीबाईची योग्यता अत्युच्च  प्रकारची होती” असे  General व्हिसेंट स्मिथ ने तिचे वर्णन केले आहे.
https://moonfires.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88/

The short URL of the present article is: https://moonfires.com/yczj
Share This Article
Follow:
राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं। Founder Of Moonfires.com
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *