Newsबातमीमराठी ब्लॉगराजकीय

‘हिज मास्टर्स व्हॉईस’ : एका शब्दात अनेक शिकार!

देवेंद्र फडणवीस

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

‘एचएमव्ही’ या शब्दाचा अर्थ काय? असे विचारताच देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा ‘फुल फॉर्म’ सांगितला. ‘हिज मास्टर्स व्हॉईस.’ खरंतर, या शब्दाचे विश्लेषण करण्याच्याऐवजी नेहमीप्रमाणे, मराठी पत्रकारांपैकी स्वतःला ‘व्हेटरन’ किंवा ‘फ्लॅग बेअरर्स’ म्हणणार्‍या काही ठरावीक पत्रकारांनी आवाज काढायला सुरुवात केली.

देवेंद्र फडणवीस जे बोलले ते कसं लोकशाहीच्या विरोधात होतं, असं म्हणत हे ठरावीक पत्रकार जणू स्वतःवरच आरोप झाला आहे, अशा पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागले. पण, तिर्‍हाईत व्यक्ती म्हणून, या सगळ्या गोष्टींकडे पाहता, देवेंद्र फडणवीस जे काही बोलले, त्यात काही चुकीचं आहे, असं वाटत नाही.
 
महाराष्ट्राचे राजकारण कायमच रंजक राहिले आहे आणि गेली काही वर्षे या रंजकतेच्या सगळ्या सीमा पार झालेल्या आहेत. राजकारण आणि पत्रकार हे समीकरण किती जुने आहे, हे वेगळे सांगणे आवश्यक आहे, असे वाटत नाही. अरुण साधू, जब्बार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतीमुळे निर्माण झालेल्या ’सिंहासन’ या चित्रपटात या नात्याचे महत्त्व अगदी स्पष्टपणे आणि नेटकेपणाने दाखवले आहे.

एक दोन दिवसांपूर्वी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत ’एचएमव्ही’ असा शब्द काही पत्रकारांच्या संदर्भात वापरला आणि हा शब्द वापरताच योग्य ठिकाणी सुरुंग पेटला. ’एचएमव्ही’ या शब्दाचा अर्थ काय? असे विचारताच देवेंद्र फडणवीसांनी त्याचा ‘फुल फॉर्म’ सांगितला.

’हिज मास्टर्स व्हॉईस.’ खरंतर, या शब्दाचे विश्लेषण करण्याच्याऐवजी नेहमीप्रमाणे, मराठी पत्रकारांपैकी स्वतःला ’व्हेटरन’ किंवा ’फ्लॅग बेअरर्स’ म्हणणार्‍या काही ठरावीक पत्रकारांनी आवाज काढायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस जे बोलले ते कसं लोकशाहीच्या विरोधात होतं, असं म्हणत हे ठरावीक पत्रकार जणू स्वतःवरच आरोप झाला आहे, अशा पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागले. पण, तिर्‍हाईत व्यक्ती म्हणून, या सगळ्या गोष्टींकडे पाहता, देवेंद्र फडणवीस जे काही बोलले, त्यात काही चुकीचं आहे, असं वाटत नाही.
 
 कोरोनाच्या काळात सगळी राज्यं स्वतःच्या रहिवाशांना कोरोनातून बाहेर कसे काढता येईल, यासाठी कष्ट करत होती, पण महाराष्ट्रात तसे घडताना दिसले नाही. काही ठरावीक पत्रकार आणि त्यांच्याशी संबंधित असलेले अनेक पत्रकार सरकारचे अर्थात उद्धव ठाकरे आणि संलग्न असलेल्या नेत्यांचे अपयश दाखवण्याच्याऐवजी त्यांना ’बेस्ट सीएम’ची उपाधी देण्यात व्यस्त असताना दिसले.

ज्या बातम्या प्रामाणिकपणे जनतेला कळायला हव्या होत्या, त्या या गोष्टींमुळे समोर आल्याच नाहीत आणि दुर्दैवाने या सगळ्यात जनतेची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्यात आली. ही दिशाभूल घडल्यामुळे सत्तेतील अनेक ‘मास्टर्स’ला फायदाच झाला, हे वेळोवेळी झालेल्या अटकांमुळे आपल्याला दिसलेच.

अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या, नवाब मलिक यांचा दाऊद सोबत असलेला थेट संबंध, संजय राऊत यांची वाचाळवीरता या विषय हे ठरावीक तथाकथित ‘फ्लॅग बेअरर’ पत्रकार आवाज उठवताना कधीही दिसले नाहीत, या उलट यांना ‘डिफेन्ड’ करताना दिसले.
  
 
या पलीकडे, महाराष्ट्रात होत असलेल्या औद्योगिक घडामोडींवर त्या वेळेला कोणालाही प्रकाश टाकावासा वाटला नाही. आत्ता, जेव्हा देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आहे, तेव्हा ‘फॉक्सकॉन-वेदांता’ किंवा ‘टाटा-एअरबस’ यांसारखे प्रकल्प गुजरात ला आत्ताच्या सरकारमुळेच गेले आहेत, अशा पद्धतीचे एक अर्धवट रंगवलेलं चित्र जनतेसमोर, निःसंशयपणे ’मास्टर्स च्या सांगण्यावरून दाखवलं जात आहे.

यालाच देवेंद्र फडणवीसांनी ’फेक नरेटिव्ह’ म्हणूनदेखील संबोधले. मुळात ‘फॉक्सकॉन-वेदांता’ चा महाराष्ट्रासोबत करार झाला होता की नाही, याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 2020 मध्येच दिले होते. अगदी स्पष्टपणे नमूद केले होते की,‘फॉक्सकॉन-वेदांता’ला महाराष्ट्रात येण्यासाठी काहीही रस नाही.

ही बातमी त्या वेळेला दाखवली गेली किंवा ज्या तीव्रतेने आत्ता दाखवली जात आहे, तशी दाखवली गेली असे माझ्यातरी आठवणीत नाही. असे का असेल, याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या ’एचएमव्ही’ या शब्दांत दिले आहे. या पलीकडे, आत्ता जेव्हा केंद्र सरकारने ‘सेमीकंडक्टर क्लस्टर’साठी महाराष्ट्र सरकारला प्लांट उभा करण्यास मंजुरी दिलेली आहे, तेव्हा हा प्रकल्प कसा छोटा आहे आणि अनेक हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प कसे केंद्र सरकारने विशेषतः मोदींनी गुजरातला नेले म्हणून महाराष्ट्राची केलेली दिशाभूल आहे, असे सांगण्यात हेच काही ठरावीक पत्रकार आघाडीवर दिसले.
 
  
महाराष्ट्रातून एवढे मोठे प्रकल्प गुजरातला का गेले, यामागची कारणे सांगणारा एकही ’प्राईम टाईम शो’ किंवा एकही विश्लेषणात्मक ‘आर्टिकल’ या पत्रकारांनी लिहिले नाही, महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात परिसीमा पार केलेला भ्रष्टाचार, गुंडागर्दी, दडपशाही या सगळ्या गोष्टींमुळे गुंतवणूक झाली नाही आणि ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांनीही माघार घेतली.

हे न सांगण्यासाठी या पत्रकारांना कदाचित यांच्या ’मास्टर्स’नेच दाबले असावे. पालघर साधू हत्याकांड, कोरोनाच्या काळात झालेला प्रचंड भ्रष्टाचार, वैद्यकीय व्यवस्थेची झालेली दुरवस्था, एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न आणि यांसारख्या असंख्य महत्त्वाच्या गोष्टी, महाराष्ट्राच्या जनतेला का दाखवल्या गेल्या नाहीत, हा प्रश्न उद्भवतो आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला दिलेल्या ’एचएमव्ही’ या शब्दात याचे उत्तर सापडते.
 
 

 

अफजल खान कबरी भोवतीचे अतिक्रमणे पाडले

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker