मराठी ब्लॉग

शिवाजी महाराजांच्या विषयी महत्वाची माहिती

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

एखाद्या मध्ययुगीन काळातील राजाऐवजी आधुनिक काळातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार वाटावा असे शिवाजी महाराज रंगवणाऱ्या स्वयंघोषित इतिहासतज्ञांसाठी शिवाजी महाराजांच्या विषयी महत्वाची माहिती / तथ्ये थोडक्यात.

शिवाजी महाराजांच्या विषयी महत्वाची माहिती
शिवाजी महाराजांच्या विषयी महत्वाची माहिती

१) शिवाजी महाराजांचे कट्टर शत्रूच त्यांचे व्याही (शिर्के,जाधव,निंबाळकर) आहेत कारण त्याकाळातील व्यक्तींना जात व्यवस्था तोडण्याचे आधुनिक नीतिमूल्य ठाऊकच नव्हते.

२) वैदिक हिंदुत्व जपण्यासाठी स्वतःचे व स्वतःच्या मुलांचे मौजी बंधन केले तसेच त्यांची नावे हिंदूंच्या प्रमुख देवता शंकर व राम यांच्यावरून शंभू व राजाराम ठेवली. (खुद्द शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीवरून ठेवलेले आहे हे हिंदू देवतांना शिव्या देणाऱ्या किंवा शिवाजी महाराज विरुद्ध हिंदू देव अशी लढाई लावणाऱ्या भीकमंग्यांनी लक्षात ठेवावे.)

३) 'शिवाजी मशिदी भ्रष्ट करतो व मुसलमानांना त्रास देतो' म्हणूनच शिवाजी महाराजांना धडा शिकवण्यासाठी आदिलशहाने अफजलखानाला पाठवले. (अस्सल पत्र उपलब्ध)

४) बळजबरीने मुसलमान बनवलेल्या हिंदूंची घरवापसी केली. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकर यांचे १९ जून १६७६ आणि संभाजी महाराजांनी गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांचे १६८४.

५) मुसलमानी आक्रमणामुळे कैक शतके बंद पडलेला हिंदू राजांचा राज्याभिषेक विधी पुन्हा चालू केला.

६) मुसलमानी फारसी, अरबी भाषेला विरोध म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत भाषेत मुद्रा निर्माण करून स्वभाषेच्या उन्नतीसाठी राज्याभिषेकावेळी 'राज्यव्यवहार कोष' निर्माण केला.

७) मंदिर पाडून मशीद निर्माण केलेल्या ठिकाणीच पुन्हा मंदिरं निर्माण केली. संदर्भ : तिरुवन्नमलईचे शिव मंदिर व समुत्तीर पेरूमल विष्णू मंदिर.

८) शिवाजी महाराजांनी योग्य त्या ठिकाणी शत्रू स्त्रियांचा देखील आदर ठेवला परंतु शाहिस्तेखानावर छापा घालताना स्त्री पुरुष भेद न करता रस्त्यात आलेल्या सरसकट शत्रूला कापून काढण्याचे व्यवहार ज्ञान ठेवले.

९) मंत्रिमंडळात कसलेही जातीय आरक्षण,सर्वधर्मसमभाव न ठेवता ८ पैकी ७ मंत्री ब्राह्मण व सेनापती मराठा नेमला. (हीच परंपरा त्यांच्या वंशजांनी देखील सुरूच ठेवली)

१०) 'सैन्यात मुसलमान ठेवून विजय कसा मिळेल' असा प्रश्न व्यंकोजी राजांना म्हणजे त्यांच्या भावाला विचारला.( अस्सल पत्र उपलब्ध)

११) शिवाजी महाराजांनी मशिदीला नव्याने इनाम दिल्याचे एकही उदाहरण नाही, त्याउलट मंदिर व मठांना नव्याने इनाम दिल्याची अनेक उदाहरणे.

१२) स्वतः संभाजी महाराज बुधभूषण या ग्रंथात आपल्या वडिलांचे वर्णन प्रभू श्रीरामाच्या कुळातील व श्रुती,स्मृती मानणारे व 'म्लेंच्छक्षयदीक्षित' असाच करतात.

१३) १६६७ च्या दरम्यान गोव्याच्या व्हाइसरॉयने बारदेशात फक्त कॅथॉलिक ख्रिश्चन राहतील, असा आदेश काढला. त्यामुळे बारदेशात फक्त तीन हजार हिंदू शिल्लक राहिले होते, परंतु शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली तेव्हा मराठयांच्या तावडीत चार ख्रिश्चन पाद्री सापडले, शिवाजी महाराजांनी त्यांना हिंदू होता का ? असे विचारल्यावर ख्रिश्चन पादर्यांनी नकार देताच त्यांची गर्दन मारून शिवाजी महाराजांनी ती मुंडकी व्हाईसरॉयला भेट म्हणून पाठवली व त्यानंतर व्हाईसरॉयने बारदेशात फक्त ख्रिश्चन राहतील ही आज्ञा मागे घेतली.

शिवाजी महाराजांच्या विषयी महत्वाची माहिती
शिवाजी महाराजांच्या विषयी महत्वाची माहिती

अवांतर :

१) संभाजी महाराज दिलेरखानाच्या छावणीतून पुन्हा परतले तेव्हा मागे राहिलेल्या त्यांच्या मुलींची लग्न औरंगजेबाने मुसलमानांशी लावून दिली.

२) राजाराम महाराज जेव्हा जिंजीच्या वेढ्यातुन निसटले तेव्हा त्यांच्या दोन मुलींची लग्न औरंगजेबाने मुसलमानांशी लावली.

३) संभाजी महाराजांचा मुलगा शाहू याला मुसलमान करण्यासाठी औरंगजेबाने प्रयत्न केला तेव्हा शाहूने त्याला ठाम नकार दिला. शाहू मृत्युमुखी पडला तर मराठयांमध्ये भांडणे लावता येणार नाही म्हणून औरंगजेबाने शाहूला मुसलमान बनवण्याचा हट्ट सोडला.

(औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळणाऱ्या व त्याला सौम्य दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी)

 

लेखक - तुषार दामगुडे

 

छत्रपति शिवाजी महाराज : धाडसी आणि दृढ योद्धा

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker